Search This Blog

Wednesday 4 November 2020

गेल्या 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू नाही

 


गेल्या 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू नाही ; 157 नव्याने पॉझिटीव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत 13304 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 2783

Ø जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 16329

चंद्रपूरदि. 4 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू झाला नाही तर 169 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच 157 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 157 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 16 हजार 329 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 169 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 13 हजार 304 झाली आहे. सध्या 2 हजार 783 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 23 हजार 46 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 5 हजार 246 नमुने निगेटीव्ह आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 242 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 226, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली सातयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टंसिंग पाळावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 157 बाधितांमध्ये 92 पुरुष व 65 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 34,  बल्लारपूर तालुक्यातील आठचिमूर तालुक्यातील पाचमुल तालुक्यातील पाचगोंडपिपरी तालुक्यातील चारकोरपना तालुक्यातील आठब्रह्मपुरी तालुक्यातील 24, नागभिड तालुक्यातील पाचवरोरा तालुक्यातील 19, भद्रावती तालुक्यातील 22सावली तालुक्यातील तीनसिंदेवाही तालुक्यातील 9, राजुरा तालुक्यातील सातगडचिरोली येथील तीन तर यवतमाळ येथील एक असे एकूण 157 बाधित पुढे आले आहे.

याठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील उत्तम नगरऊर्जानगरकृष्णनगरसिव्हिल लाईनगंजवार्डतुकूमनगिना बागताडालीजेबी नगरबगड खिडकी परिसररयतवारीसंजय नगरगजानन महाराज मंदिर परिसरपत्रकार नगरघुग्घुस भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील राणी लक्ष्मी वार्डबालाजी वार्डसंतोषी माता वार्डमौलाना आजाद वार्डश्रीराम वार्डरयतवारी कॉलनी परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील चक लोहारा भागातून बाधित पुढे आले आहे.

मुल तालुक्यातील वार्ड नंबर सहावार्ड नंबर आठवार्ड नंबर 14, वार्ड नंबर 15, बोरचांदली परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधीबस स्टँड परिसरातुन बाधित ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील गडचांदूरआवारपूरपळसगाव भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगरपटेल नगरसिव्हिल लाइनविदर्भ इस्टेट परिसरटिळक नगरशिवनगर उदापूरगुजरी वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

नागभीड तालुक्यातील तलोढीबाळापुर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील बोर्डायात्रा वार्डअभ्यंकर वार्डकॉलरी वार्डनेहरू चौकजिजामाता वार्डटेमुर्डाशेगाव भागातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील पांडव वार्डसुमठाणामहात्मा फुले नगरदरबार सोसायटी परीसरझिंगोजी वार्डपंचशील नगरचंडिका वार्डशिवाजीनगरकिल्ला वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील मोखाळा भागातून बाधित ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील नवरगावमिनघरी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. राजुरा तालुक्यातील रामनगररामपूरदेशपांडे वाडी परिसरातून बाधित पुढे आले आहे.

00000

No comments:

Post a Comment