Search This Blog

Friday 13 November 2020

जिल्ह्यात मागील 24 तासात 175 कोरोनामुक्त


 जिल्ह्यात मागील 24 तासात 175 कोरोनामुक्त

106 नव्याने पॉझिटिव्ह सात बाधितांचा मृत्यू

Ø आतापर्यंत 14,850 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 2,367

चंद्रपूरदि. 13 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 175 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 106 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये नागाडाचिचपल्ली येथील 40 वर्षीय पुरुषचिचपल्ली येथील 58 वर्षीय महिलालालपेठ कॉलनी येथील 53 वर्षीय पुरुषपद्मापूर येथील 81 वर्षीय पुरुषसिंदेवाही तालुक्यातील गोविंदपुर येथील 65 वर्षीय पुरुषघुगुस येथील 46 वर्षीय पुरुषतर गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 267 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 250, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली आठयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 106 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 17 हजार 484 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 175 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 14 हजार 850 झाली आहे. सध्या 2 हजार 367 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 29 हजार 607 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 10 हजार 700 नमुने निगेटीव्ह आले आहे.

नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये. मास्क लावणेहात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 106  बाधितांमध्ये 67 पुरुष व 39 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 40,बल्लारपूर तालुक्यातील एकचिमूर तालुक्यातील एकमुल तालुक्यातील 8गोंडपिपरी तालुक्यातील 4कोरपना तालुक्यातील 8ब्रह्मपुरी तालुक्यातील 4, वरोरा तालुक्यातील 8,भद्रावती तालुक्यातील 21, सावली तालुक्यातील एकसिंदेवाही तालुक्यातील 4, राजुरा तालुक्यातील 6 असे एकूण 106 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील जल नगर वार्डतुकुमपायली भटाळीबाबुपेठऊर्जानगरघुगुस,सिव्हील लाईन परिसरजटपुरा वार्डदुर्गापुरशक्तिनगरबालाजी वार्डउत्तम नगररामनगरघुटकाळा वार्डसरकार नगरनिर्माण नगरनगीना बागस्वावलंबी नगरबंगाली कॅम्प परिसरपडोलीसमाधी वार्डसुंदर नगरतुकडोजी वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

चिमूर तालुक्यातील राजीव गांधी वार्डवडाळा भागातून बाधित पुढे आले आहे.  मुल तालुक्यातील चक दूगाळाकन्नमवार वार्डवार्ड नंबर 8 परिसरातून बाधित ठरले आहे. सावली तालुक्यातील कापसी भागातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील बिबीगडचांदुरवैशाली नगरवनसडीकन्हाळगावभागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

वरोरा तालुक्यातील पाझूंर्णी, अभ्यंकर वार्डशांतीनगरसरदार पटेल वार्डमालवीय वार्डटेमुर्डाशेगाव भागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील कपिल वास्तू नगरदेलनवाडी परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील गुरु नगरऑर्डनन्स फॅक्टरी चंदा परिसरआंबेडकर वार्डकिल्ला वार्डघोडपेठभंगाराम वार्डविजासन रोड परिसरपंचशील नगरसुरक्षा नगरझाडे प्लॉट परिसरसमता नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. 

राजुरा तालुक्यातील नगर परिषद वॉर्डदेशपांडे वाडीआंबेडकर वार्डआदर्श चौक परिसरनिंबाळा भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

00000

No comments:

Post a Comment