Search This Blog

Saturday 7 November 2020

जिल्ह्यात मागील 24 तासात 151 कोरोनामुक्त


 जिल्ह्यात मागील 24 तासात 151 कोरोनामुक्त

132 नव्याने पॉझिटिव्ह तीन बाधितांचा मृत्यू

Ø  आतापर्यंत 13843 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 2691

Ø  एकूण बाधितांची संख्या 16786

चंद्रपूरदि. 7 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 151 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 132 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वार्ड येथील 46 वर्षीय पुरुषकोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील 70 वर्षीय पुरुष व भाकर्डी येथील 38 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 252 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 236, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली सातयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 132 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 16 हजार 786 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 151 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 13 हजार 843 झाली आहे. सध्या 2 हजार 691 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 25 हजार 628 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 7 हजार 239 नमुने निगेटीव्ह आले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 132 बाधितांमध्ये 87 पुरुष व 45 महिला आहेत. यात  चंद्रपूर शहर व परीसरातील 58, पोंभुर्णा तालुक्यातील तीनबल्लारपूर तालुक्यातील दोन,  चिमूर तालुक्यातील पाचमुल तालुक्यातील चारगोंडपिपरी तालुक्यातील चारजिवती तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील आठब्रह्मपुरी तालुक्यातील 14,  नागभीड तालुक्‍यातील 11, वरोरा तालुक्यातील दोन,भद्रावती तालुक्यातील 9, सिंदेवाही तालुक्यातील दोनराजुरा तालुक्यातील आठ तर गडचिरोली येथील एक असे एकूण 132 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील अंचलेश्वर वार्डऊर्जानगरघुग्घुसनानाजी नगरदेशपांडे वाडीशक्तिनगरमहेश नगरपत्रकार नगरपडोलीसमाधी वार्डनगीना बागबगड खिडकी परिसरमहाकाली कॉलरी परिसरदुर्गापुरशिवाजीनगर, वडगावरामनगरसरकार नगरसंजय नगरजटपुरा गेट परिसरइंदिरानगरसिस्टर कॉलनी परिसर जुनोना चौक, बाबुपेठ भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील शिवनगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील जवाहर नगरनगर परिषद परिसरसास्तीहनुमान नगरइंदिरा नगरधोपटाळारामनगर कॉलनी भागातून बाधित पुढे आले आहे.

वरोरा तालुक्यातील  साई मंगल कार्यालय परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील देलनवाडी, पिपर्डानवेगावगुजरी वार्डबालाजी वार्डतोरगाव खुर्दशांतीनगर परिसरातून बाधित ठरले आहे.

 

भद्रावती तालुक्यातील सुरक्षा नगरराधाकृष्ण कॉलनी परिसरडिफेन्स चांदा परिसरमाजरीआष्टाजैन मंदिर रोड,परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडवशिवनगरचावडेश्वरी मंदिर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील नेताजी वार्डवडाळा पैकु भागातून बाधित पुढे आले आहे.

मुल तालुक्यातील वार्ड नंबर 15, वार्ड नंबर 17, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील जनता कॉलेज परिसरशिवाजी चौकविद्या नगरी भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूरविद्यानगरी,माठा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

000000

No comments:

Post a Comment