Search This Blog

Tuesday 3 November 2020

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 13135 कोरोनामुक्त

 

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 13135 कोरोनामुक्त

जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्यू ;182 नव्याने पॉझिटिव्ह

Ø बाधितांची एकूण संख्या 16172

Ø उपचार घेणाऱ्या बाधितांचे संख्या 2795

चंद्रपूरदि. 3 नोव्हेंबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे सहा मृत्यू झाले असून 182 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 16 हजार 172 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 134 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 13 हजार 135 झाली आहे. सध्या 2 हजार 795 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून एक लाख 22 हजार 254 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी एक लाख 4 हजार 563 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथील 72 वर्षीय पुरुषबालाजी वार्ड येथील 51 वर्षीय पुरुषसमाधी वार्ड येथील 42 वर्षीय महिलाबल्लारपूर शहरातील लक्ष्मी नगर वार्ड येथील 65 वर्षीय महिला,  भद्रावती येथील 71 वर्षीय पुरुष तर गडचिरोली येथील 68 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 242 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 226तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली सातयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 118 पुरूष व 64 महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 55,  बल्लारपूर तालुक्यातील 20चिमूर तालुक्यातील चारमुल तालुक्यातील तीनगोंडपिपरी तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील 10ब्रह्मपुरी तालुक्यातील 10नागभीड तालुक्यातील पाचवरोरा तालुक्यातील आठभद्रावती तालुक्यातील 35सिंदेवाही तालुक्यातील आठराजुरा तालुक्यातील 10गडचिरोली 11 तर यवतमाळ व गोंदिया येथील प्रत्येकी एक असे एकूण 182 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील गजानन मंदिर वार्डचव्हाण कॉलनी परिसरसरकार नगरतुकडोजी नगरकृष्णा नगरनगीना बागसाईबाबा वार्डबापट नगरगांधी नगरबाबुपेठदुर्गापुरताडाळीभिवापूरजयराज नगरहॉस्पिटल वार्डशिवाजीनगरतुकूमसुमित्रा नगरओम नगरजटपुरा गेट परिसरविठ्ठल मंदिर वार्डउत्तम नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील  लक्ष्मी नगर वार्डबिल्ट कॉलनी परिसरझाकीर हुसेन वार्डविसापूरविवेकानंद वार्डसुभाष वार्डगांधी वार्डदादाभाई नौरोजी वार्डगणपती वार्डबामणीसंतोषीमाता वार्ड भागातून बाधित ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्डडोंगरगाव रेल्वेजाजू हॉस्पिटल परिसरातून पाॅझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगरगुरुदेव नगरनागेश्वर नगरशेष नगरदेलनवाडी  परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील समता नगरमाजरीचंडिका वार्डकिल्ला वार्डऑर्दनन्स फॅक्टरी चांदा परिसरनेताजी नगरपंचशील नगरझाडे प्लॉटपांडव वार्डगुरु नगरराधाकृष्ण कॉलनी परिसरपावर ग्रिड कॉलनी परिसरलक्ष्मी नगरभागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

चिमूर तालुक्यातील वडाळा पैकुवेलकम कॉलनी परिसर भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील कूसराळा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील सोनुरली गडचांदूरआवारपूरआंबेडकर भवनमाणिक गड कॉलनी परिसरभागातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील पिक्चर कॉलनी परिसरसास्तीभारत चौकअमराई वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील लोनवाहीनवरगावलाडबोरी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील मंगरूळगिरगाव परिसरातून बाधित पुढे आले आहे.

00000

No comments:

Post a Comment