Search This Blog

Friday 6 November 2020

‘स्वस्थ चंद्रपूर किऑस्क’ उपक्रमामुळे चंद्रपूरच्या आरोग्य विकासात भर



 स्वस्थ चंद्रपूर किऑस्क’ उपक्रमामुळे चंद्रपूरच्या आरोग्य विकासात भर

एकाच छताखाली कॅन्सर स्क्रिनिंग व लवकर निदान

चंद्रपूरदि.6 नोव्हेंबर: एकाच छताखाली कॅन्सर स्क्रिंनिंग व निदान करण्याची सोय चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने चंद्रपूरच्या आरोग्य विकासात भर पडली असल्याचे मत  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे स्वस्थ चंद्रपूर किऑस्क’ उपक्रमाच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरअधिष्ठाता डॉ.अरुण हुमणेवैद्यकीय अधीक्षक डॉ भास्कर सोनारकरजिल्हा प्रकल्प व्यवस्थापक डॉ. श्वेता सावलीकरटाटा ट्रस्टचे जिल्हा समन्वयक सुरज साळुंके,आशिष सुपासेअदिती निमसरकारदिव्या पर्शिवेमनीषा दुपारे उपस्थित होते.

            टाटा ट्रस्ट च्या माध्यमातून असंसर्गिक रोगांच्या तपासणीसाठी रुग्णालयामध्ये कॅन्सर प्रिव्हेन्शन व वेळेत रुग्णांचे उपचार यासाठी नव्याने स्वस्थ चंद्रपूर किऑस्क’ हा उपक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय येथे राबविण्यात येत आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज उच्च रक्तदाबमधुमेहगर्भाशयाचे कॅन्सरस्तनांचा कॅन्सर व मुखाचा कॅन्सर याची नियमित प्रतिबंध तपासणी केली जाणार आहे. यासोबतच तंबाखू व्यसनाचे समुपदेशन तज्ञाच्या मार्गदर्शन द्वारे करण्यात येणार आहे. टाटा ट्रस्टच्या चमू मार्फत एएनएम व जिएनएम यांना प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment