Search This Blog

Friday 6 November 2020

गेल्या 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू नाही

 


गेल्या 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू नाही ; 151 नव्याने पॉझिटीव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत 13692 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 2713

Ø जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 16654

चंद्रपूरदि. 6 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू झाला नाही तर 119 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच 151 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 151 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 16 हजार 654 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 119 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 13 हजार 692 झाली आहे. सध्या 2 हजार 713 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 24 हजार 745 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 6 हजार 589 नमुने निगेटीव्ह आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 249 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 233, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली सातयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 151 बाधितांमध्ये 85 पुरुष व 66 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 49, पोंभुर्णा तालुक्यातील एक,   बल्लारपूर तालुक्यातील एकचिमूर तालुक्यातील आठमुल तालुक्यातील पाचगोंडपिपरी तालुक्यातील चार, जिवती तालुक्यातील एक,    कोरपना तालुक्यातील आठब्रह्मपुरी तालुक्यातील 19नागभिड तालुक्यातील एकवरोरा तालुक्यातील आठभद्रावती तालुक्यातील 12, सावली तालुक्यातील तीनसिंदेवाही तालुक्यातील 25राजुरा तालुक्यातील तीन तर नागपूर,यवतमाळ व गोंदीया येथील प्रत्येकी एक असे एकूण 151 बाधित पुढे आले आहे.

याठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील घुग्घुसऊर्जानगरजीएमसी परिसरजलनगरतुकूमरामनगरपठाणपुरा वार्डजटपुरा गेट परिसरबाबुपेठवडगावअंचलेश्वर गेट परिसरदादमहलमहाकाली कॉलरीपडोली,  बगड खिडकीभिवापूर वार्डगजानन महाराज मंदिर परिसरलालपेठपठाणपुराविठोबा खिडकीबिनबा गेट भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

तालुक्यातून याठिकाणी आढळले बाधित:

पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा भागातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील मौलाना आजाद वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.चिमूर तालुक्यातील नेहरू वार्डठक्कर वार्डजवार बोडी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

मुल तालुक्यातील वार्ड नंबर 10, वार्ड नंबर 15 परिसरातून बाधित पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठल वाडा परिसरभंगाराम तळोधी भागातून बाधित ठरले आहे. जिवती तालुक्यातील नोकारी परिसरातून बाधित पुढे आले आहे.

कोरपना तालुक्यातील गडचांदूरआवारपुर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील सम्राट अशोक चौकविद्यानगरचांदलीशांतीनगरगुरुदेव नगरगुजरी वार्डटिळक नगरउदापूरचिचखेडारेणुका माता चौक परिसरातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील जनकापूर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील माढेळीमाता मंदिर वार्डराजीव गांधी वार्डबोर्डाटेंमुर्डा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील आनंदनगर सुमठाणामाजरीनेताजी नगरविजासन परिसरशिवाजीनगरगौतम नगरसावरी परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील कडोली परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडीनवरगावगांधी चौक भागातुन बाधित ठरले आहे. राजुरा तालुक्यातील गौरी कॉलनी परिसरभारत चौक परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment