Search This Blog

Sunday 8 November 2020

गेल्या 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू नाही

 

गेल्या 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू नाही ; 161 नव्याने पॉझिटीव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत 14016 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 2679

Ø जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 16947

चंद्रपूरदि. 8 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू झाला नाही तर 173 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच 161 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 161 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 16 हजार 947 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 173 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 14 हजार 16 झाली आहे. सध्या 2 हजार 679 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 26 हजार 404 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 7 हजार 923 नमुने निगेटीव्ह आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 252 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 236तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली सातयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 161 बाधितांमध्ये 90 पुरुष व 71 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 63, पोंभुर्णा तालुक्यातील एकबल्लारपूर तालुक्यातील एकचिमूर तालुक्यातील 16, मुल तालुक्यातील तीनगोंडपिपरी तालुक्यातील पाचकोरपना तालुक्यातील सहाब्रह्मपुरी तालुक्यातील 15नागभिड तालुक्यातील 9वरोरा तालुक्यातील 13भद्रावती तालुक्यातील 11सिंदेवाही तालुक्यातील सातराजुरा तालुक्यातील सहा, गडचिरोली चार तर भंडारा येथील एक असे एकूण 16बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील  भिवापुर वॉर्डगोपालपुरी,बालाजी वार्डजटपुरा वार्डपंचशील चौक परिसरपडोलीगणेश नगर तुकूमभानापेठ वार्डजगन्नाथ बाबा नगरखुटाळावृंदावन नगरनगीना बागवडगाव पद्मापूरधानोरा पिंपरीश्रीराम चौकअरविंद नगरकैलाश नगर नांदगावघुगुसगंजवार्डबाबुपेठसुभाष नगरऊर्जानगरद्वारका नगरसौगात नगरएकोरी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील दादाभाई नौरोजी वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.राजुरा तालुक्यातील  पेठ वार्डपांढरवणीरमाबाई वार्डआर्वी भागातून बाधित पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील आजाद वार्डगजानन नगरबामर्डापद्मालया नगरआशीर्वाद लेआउटविठ्ठल मंदिर वार्डइंद्रा नगरी बोर्डाजामखुलागाडगे नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील  विद्यानगररेणुका माता चौकदेलनवाडीझाशी राणी चौकविदर्भ इस्टेट परिसरपटेल नगरनान्होरीकपिल नगर परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील लोणाराघोडपेठराधाकृष्ण कॉलनी परिसरसुमठाणाचंदनखेडादेऊळवाडाडिफेन्स चंदा परिसरातून बाधित पुढे आले आहे.

 

सिंदेवाही तालुक्यातील गडबोरीकाटवलदेवाडारत्नापूर भागातून बाधित पुढे आले आहे.

नागभीड तालुक्यातील चिधिंचकशिवनगरवसुंधरा कॉलनी परिसरसुलेझरीसुंदर नगरदेवतकप्रगती नगर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

चिमूर तालुक्यातील  वडाळा पैकुगांधी वार्डनेरीतळोधीटिळक वार्डनेहरू चौक परिसरमासळमोटेगाव भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर 6परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील  जनता कॉलेज परिसरविठ्ठल वाडा भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूरगोरे लेआउटआवारपूरहॉस्पिटल वार्डमांडे लेआउट भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment