Search This Blog

Monday 23 November 2020

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व फ्रीशिपबाबत सूचना

 विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व फ्रीशिपबाबत सूचना

चंद्रपूर दि. 23 नोव्हेंबर: महाडीबीटी पोर्टलवरील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाविद्यालय व जिल्हास्तरावरून शिष्यवृत्ती व फ्रीशिप या दोन योजनांचे अर्ज समाज कल्याण आयुक्तालयास प्राप्त झालेले आहेत. तथापि त्यामधील काही दोषपुर्ण अर्ज महाविद्यालयाकडे त्रुटी पुर्ततेसाठी परत पाठविण्यात आले आहेत.  संबंधीत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देवून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी.

त्याचप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवरील मंजूर झालेल्या मागासवर्ग विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती प्रोफाईल आधार लिंक नसल्यास पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. विद्यार्थी लॉग इन मधील ‘प्रोफाइल’ वर क्लिक करणे. ‘अपडेट प्रोफाईल ॲजपर आधार’ यावर क्लिक करणे. आपला आधार क्रमांक बॉक्समध्ये नोंदवून सेंड ओटीपी’ यावर क्लिक करणे, तद्नंतर आपल्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठविण्यात येईल. सदर ओटीपी बॉक्समध्ये नोंदवून माहिती सेव करण्यात यावी.

जर आपल्या आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक नसल्यास ‘फेल टु सेंड ओटीपी’ असा मेसेज येईल. याकरिता आपले सरकार सेवा सेतू केंद्रावर जाऊन आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक करून घ्यावे. आधार क्रमांक ‘ऑलरेडी एक्झिट इन द सिस्टीम’ असा मेसेज येत असल्यास आपला आधार क्रमांक आणखी एका यूजर आयडीशी लिंक आहे असे समजावे. करिता सध्या वापरत असलेला यूजर आयडीला आधार लिंक होणार नाही. तसेच भविष्यात या यूजर आयडी चा वापर शिष्यवृत्ती अर्जाकरिता करू नये. आधारशी लिंक असलेला युजरआयडी मिळविण्यासाठी फरगेट युजर नेम या बटनाचा तसेच पासवर्ड मिळविण्यासाठी फरगेट पासवर्ड या बटनाचा वापर करून नवीन युजर आयडी व पासवर्ड सेट करून घ्यावा वापरावा. मोबाईल क्रमांक रिसेट करून घेण्याची सुविधा महाविद्यालयाचे प्रिंसिपल लॉगइन मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तरी शिष्यवृत्ती प्राप्त करून घेण्यासाठी वरीलप्रमाणे त्रुटींची पुर्तता करून घ्यावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

000

No comments:

Post a Comment