Search This Blog

Wednesday 4 November 2020

पदवीधर मतदार संघ निवडणुकीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक


 पदवीधर मतदार संघ निवडणुकीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

आचारसंहिता अंमलबजावणीबाबत दिले निर्देश

चंद्रपूरदि. 4: भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदविधर मतदार संघ निवडणूक- 2020 चा कार्यक्रम दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी घोषित केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज नियोजन सभागृहात बैठक घेवून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याने तात्काळ प्रभावासह आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

            यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी आदर्श आचारसंहिता कालावधीत नवीन योजनांची घोषणा न करणेशासकीय संदेश प्रणालीवरील राजकीय नेत्यांचे छायाचित्रे काढून टाकणेनवीन निविदा प्रक्रीया न करणेनवीन कामांना तांत्रीक मंजूरीची शिफारस न करणेशासकीय वाहनाचा प्रचारासाठी वापर न करण्याबाबतराजकीय पदाधिकाऱ्यांकडील शासकीय वाहन शासनजमा करून घेणेकोणतेही उद्घाटनभूमिपूजन सोहळा आयोजित न करणे यासह इतर महत्वपुर्ण बाबीवर आचारसंहिता कालावधीत काय करावे व काय करू नये यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

जिल्ह्यात 36 मुख्य मतदान केंद्र तर 14 सहाय्यक मतदान केंद्र असे एकूण 50 मतदान केंद्र राहणार आहेत. जिल्ह्यात नोंदणीकृत पदवीधर मतदारांची एकूण संख्या 32 हजार 89 इतकी आहे. 5 नोव्हेंबरपासून सुरू होणारी निवडणूक प्रक्रिया 7 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी निवडणूक आयोगाच्या दिनांक 26 डिसेंबर 2016 परिपत्रकात नमूद बाबींचे पालन करण्याबाबत सांगितले.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरनिवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ,  उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटेजिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडेजिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमेमाविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगेपाटबंधारे मंडळाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता रा.च. कांबळे, लघु पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता क.सं सोनेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस.ए.गबाळे कनिष्ठ अभियंता डी.एन.कामडीराज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक एम.एस पाटीलप्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उप अभियंता पि.टी. जिवतोडे तसेच महानगरपालीकाआरोग्य व पोलीस विभागासह इतर संबंधीत कार्यालयाचे अधिकारी  प्रामुख्याने उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment