Search This Blog

Thursday 19 November 2020

मतदार फोटो ओळखपत्राव्यतिरिक्त इतर नऊ कागदपत्र मतदानासाठी ग्राह्य

 मतदार फोटो ओळखपत्राव्यतिरिक्त इतर नऊ कागदपत्र मतदानासाठी ग्राह

Ø  पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या सूचना

चंद्रपूर, दि. 19 नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधान परिषदेची द्विवार्षिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरीता मतदान करतांना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्राव्यतिरिक्त (ईलेक्टर्स फोटो आयडेन्टीटी कार्ड- ई-पिक) खालील कागदपत्र पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात येणार आहेत.

आधारकार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट,  केंद्र/राज्य शासन/ सार्वजनिक उपक्रम/ स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरित केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/ आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर मतदार संघातील शिक्षण संस्थेत  कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना वितरित केलेले सेवा ओळखपत्र, विश्वविद्यालयाद्वारे वितरित पदवी/पदवीका/ मळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मळ प्रमाणपत्र हे नऊ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात येणार आहेत. 

        छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात येणार आहे. छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे किंवा पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी  कागदपत्रापैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे दि. 10 नोव्हेंबर 2020 रोजीचे मुळ आदेश अंतिम राहतील. 

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरिता जिल्ह्यात नियुक्त सर्व संबंधित अधिकारी व सर्व मतदान केंद्राध्यक्षांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment