Search This Blog

Thursday 5 November 2020

निवृत्ती वेतन धारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे

 निवृत्ती वेतन धारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे

चंद्रपूर दि. 4 नोव्हेंबर: चंद्रपूर कोषागार अंतर्गत  बँकेद्वारे निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्राची यादी संबंधित बँकेत माहे नोव्हेंबर अखेरपर्यंत पाठविण्यात येणार असून त्यावर आपल्या नावासमोरील रकान्यात दि. 15 डिसेंबर 2020 पूर्वी स्वतः उपस्थित राहून स्वाक्षरी करावयाची आहे. जेणेकरून हयात असल्याच्या प्रमाणपत्राची यादी कोषागाराला वेळीच प्राप्त होईल व त्यांचे माहे जानेवारी 2020 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे  पाठवता येईल.

जे निवृत्तीवेतनधारक मनीऑर्डर द्वारा निवृत्तीवेतन घेतात त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून दि. 15 डिसेंबर 2020 पर्यंत कोषागाराला पाठवावे.

जे निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतन घेत आहेत त्यांनी हयात असल्याचे प्रमाणपत्रासोबत ( पुरुष) पुनर्विवाह न केल्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच प्रशासकीय सेवेत असल्यास अथवा नसल्यास तसे प्रमाणपत्र पाठवावे.

निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी आपल्या नावाच्या समोर स्वाक्षरी करावी.

हयात प्रमाणपत्र दि.15 डिसेंबर 2020 पर्यंत कोषागारास प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे जानेवारी 2020 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे पाठविले जाणार नाही. तरी निवृत्तीवेतन धारकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रभारी कोषागार अधिकारी प्र.ए. वडेट्टीवार यांनी केले आहे.

000000


No comments:

Post a Comment