Search This Blog

Sunday, 1 March 2026

जगात शांततेसाठीचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो - योगगुरू रामदेव बाबा



 

जगात शांततेसाठीचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो -   योगगुरू रामदेव बाबा

 

मुंबईदि. 28 : वेदवाणी आणि गुरुवाणी मानवतेला मार्गदर्शन करणाऱ्या असून आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात शांततेचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतोअसा विश्वास योग गुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केला.

खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमात योगगुरू रामदेव यांनी गुरु परंपरेच्या त्यागशौर्य आणि अध्यात्मिक वारशाचे स्मरण करून राष्ट्र एकतेचा संदेश दिला. गुरुंनी समाजासमोर महान आदर्श ठेवला असून आपण त्या परंपरेचे वारसदार आहोतअसे सांगत त्यांनी गुरुंच्या मार्गावर श्रद्धा आणि कृतज्ञतेने चालण्याचे आवाहन केले.

अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समिती यांच्या वतीने खारघर येथे आयोजित हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात बाबा रामदेव बोलत होते. यावेळी जत्थेदार ग्यानी बलदेव सिंग जीबाबू सिंग महाराज,  शरदचंद्र ढोलेबाबा रामसिंग महाराजबाबा हरिनाम सिंग जी,  ज्ञानी गुरुदयाल जी,  रघुवीर बाबा,  ग्यानी हरमिंदर साहेब,  प्रधान गुरुविंदर सिंगहिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईकपनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरपरभणीचे आमदार राहुल पाटील आदिसह विविध संत ग्यानी उपस्थित होते.

या सोहळ्यात सिख समाजासह बंजारालबानावारकरीसिंधीवाल्मीकि आणि उदासीन परंपरेतील संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हा केवळ मेळावा नसून गुरु परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि समाज एकतेचा संकल्प दृढ करण्याचा उपक्रम असल्याचे नमूद केले.

         श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहादत वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व असून धर्मसंस्कृती आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी गुरुंनी दिलेले बलिदान अतुलनीय असून त्यागामुळेच सनातन परंपरा आजही टिकून आहे. गुरु नानक देवांपासून गुरु गोविंद सिंह महाराजांपर्यंतची परंपरा ही शौर्यत्याग आणि अध्यात्माची असल्याचे बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले.

रामेश्वर नाईक यांनी सांगितले कीमहाराष्ट्र शासन आणि गुरु नानक नाम संगत यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहादत वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे विदर्भ व छत्तीसगडच्या संगतीच्या उपस्थितीत शहीदी समारंभ झाला. त्यानंतर २४ व २५ जानेवारीला नांदेड मधील तख्त श्री हजूर साहिब येथे मराठवाडाउत्तर महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेशकर्नाटक आणि तेलंगणातील भाविकांच्या सहभागातून कार्यक्रम पार पडला. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी कोकण विभागासह राज्यभरातून आणि देश-विदेशातून आलेले भाविक या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग घेत आहेत . विविध समाजघटकउदासीन संप्रदाय आणि वारकरी परंपरेतील भक्तांनी एकत्र येत धार्मिक एकतेचा संदेश दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

शीख गुरु तेग बहादुर यांच्या बलिदानाची गाथा सांगताना त्यांच्या शौर्याचा आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाचा उल्लेख करून काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेली शहादत ही मानवतेच्या इतिहासातील अद्वितीय घटना असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले. यानिमित्ताने राज्य शासनाच्या वतीने शैक्षणिक संस्थाग्रामसभा आणि विविध उपक्रमांतून गुरुंचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले.

श्री रामराव महाराज यांनी महाराष्ट्र सरकार गुरु गोविंद सिंह महाराजांचा इतिहास घराघरांत पोहोचवत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी भगवान संत सेवालाल महाराज यांच्या कार्याचाही गौरव त्यांनी केला. संत सेवालाल महाराजांनी देशभर भ्रमंती करून समाजजागृती केलीव्यापार आणि संघटनाच्या माध्यमातून बंजारा समाजाला बळ दिलेअसे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित संताचागुरूंचा सन्मान करण्यात आला.

००००

खारघर येथील हिंद दी चादर कार्यक्रमास देश-विदेशातून संत- महंत आणि भाविकांची उपस्थिती

 

खारघर येथील हिंद दी चादर कार्यक्रमास देश-विदेशातून संत- महंत आणि भाविकांची उपस्थिती

 

नवी मुंबईदि. 28 : खारघर येथे आयोजित हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी देश विदेशातून विविध संतमहंत आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि कीर्तनात भाविक रममाण झाल्याचे दिसत होते.

अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य समागमामुळे गुरु तेग बहादुर यांच्या बलिदानाचा संदेश देश-विदेशात अधिक दृढपणे पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या ऐतिहासिक सोहळ्यास संत जत्थेदार ग्यानी बलदेव सिंग जीबाबू सिंग महाराजशरदचंद्र ढोलेबाबा रामसिंग महाराजबाबा हरिनाम सिंग जीसिंधी समाजाचे गुरु छोटू सिंगजसकरन सिंगज्ञानी गुरुदयाल जीरघुवीर बाबाग्यानी हरमिंदर साहेबप्रधान गुरुविंदर सिंगराज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईकपनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरपरभणीचे आमदार राहुल पाटीलसरदार जसपाल सिंग सिद्धूसरदार अमृपाल सिंगसरदार अवतार सिंग शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. विविध समाजघटकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त झाले.

विदेशातील भाविकांचाही सहभाग

लंडनकॅनडाअमेरिका तसेच न्यूयॉर्क येथूनही भाविकांनी विशेष उपस्थिती दर्शविली. विदेशातून सरदार हरभजन सिंग ढिल्लोसंत बाबा प्रेमसिंगसरदार रणजीत सिंगसरदार जगजीत सिंगसरदार सुखदेव सिंगसरदार गुरुप्रित सिंगसरदार जयपाल आदी सहभागी झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्व समाजातील भाविक एकत्र आल्याचे पाहून सरदार हरभजन सिंग ढिल्लो यांनी समाधान व्यक्त केले.

00000


हिंद-दी-चादर कार्यक्रमात भाविकांसाठी विविध सोयी–सुविधा उपलब्ध


 हिंद-दी-चादर कार्यक्रमात भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध

 

नवी मुंबईदि. २८ :  भव्य समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहतूकसुरक्षाआपत्ती व्यवस्थापनआरोग्य सेवास्वच्छता व पायाभूत सुविधांचे सूक्ष्म नियोजन  करण्यात आले आहे. भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक मार्गयोजना आखण्यात आली असूनपोलीस विभागामार्फत आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला  आहे. सीसीटीव्ही यंत्रणानियंत्रण कक्ष तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सायबर पोलीस व एटीएस यांचीही मदत घेण्यात आली आहे.

 

आरोग्य सेवांच्या दृष्टीने कार्यक्रमस्थळी  तात्पुरती वैद्यकीय केंद्रे व एक अतिदक्षता कक्ष उभारण्यात आला असूनजवळील रुग्णालयांमध्ये ३५० खाटा आणि ७५ आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत तात्पुरती वैद्यकीय पथकेरुग्णवाहिका व प्राथमिक उपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. एकूण १०० पेक्षा अधिक डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी तैनात राहणार आहेत.

 

ओवे मैदानाची एकावेळी सुमारे ५ लाख भाविकांची क्षमता असूनमुख्य मंडपात ८० हजार ते १ लाख भाविक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप उभारणी अंतिम टप्प्यात असूनपाणीपुरवठावीजपुरवठाप्रकाशयोजना व स्वच्छतागृहांची कामे प्रगतीपथावर आहेत. १ हजारांहून अधिक तात्पुरती स्वच्छतागृहे आणि ५०० पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचारी उपलब्ध असणार आहेत.

 

देशभरातून भाविक येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेसाठी ३० पार्किंग स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. जेएनपीए परिसरात दररोज होणाऱ्या सुमारे २५ हजार जड वाहनांची ये-जा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनपोलीस व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून वाहतूक नियोजन करण्यात येत आहे. भाविकांच्या सोयीसाठी १५० पेक्षा अधिक विशेष एनएमएमटी बस सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच ३८ स्वतंत्र पार्किंग स्थळे३ हेलिपॅड२५ हजार भाविकांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे.

 

लंगर व्यवस्थेसाठी सुमारे १ हजार गॅस सिलेंडरआवश्यक इंधन व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. दोन दिवसीय कार्यक्रमासाठी १० हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

 

कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती अधिकृत

https://gurutegbahadurshahidi.com/home संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असूनभाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 

00000

हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भव्य लंगर व्यवस्था




 

हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भव्य लंगर व्यवस्था

·         लाखो भाविकांनी घेतला लंगर सेवेचा लाभ

 

 नवी मुंबईदि. 28 : हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त खारघरनवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भाविकांसाठी भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. लाखो भाविक या लंगर सेवेचा लाभ घेत असून संपूर्ण परिसर सेवाभाव आणि समतेच्या संदेशाने भारावून गेला आहे. आज पहिल्या दिवशी अंदाजे दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी लंगर सेवेचा लाभ घेतल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर व्यवस्था सुरू असून सर्व धर्मीय भाविकांना भोजन दिले जात आहे. संपूर्ण परिसरात आठ ठिकाणी लंगर सुरू असून एका वेळेस एका लंगर मध्ये सुमारे दोन ते अडीच हजार भाविकांना एकत्रितपणे भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत अखंडपणे भोजन व्यवस्था सुरू असून स्वयंसेवक आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीने वाढपस्वच्छता व व्यवस्थापन सुरळीत पार पडत आहे.

    स्वयंसेवकसेवाभावी संस्था आणि गुरुद्वारातील सेवादार यांच्या संयुक्त प्रयत्नातून अन्न तयार करणेवाढपस्वच्छता आणि व्यवस्थापनाची चोख जबाबदारी पार पाडली जात आहे.

लंगरमध्ये पारंपरिक पद्धतीने रोटीभाजीडाळभात तसेच गोड पदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो स्वयंसेवक सेवेत सहभागी झाले असून सेवा’ हीच खरी श्रद्धा असल्याचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.

  या समागमात गुरु ग्रंथ साहिब यांच्या पावन उपस्थितीत कीर्तन सुरू असून वाहे गुरु  बोले सो निहाल सत श्री अकाल च्या जयघोषात भाविक दर्शन व लंगर सेवेचा लाभ घेत आहेत.

लंगर ही केवळ भोजन व्यवस्था नसून समताबंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग आणि धर्मनिष्ठेच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमातून समाजात एकात्मतेचा संदेश दिला जात आहे.

00000

शैलजा पाटील/संध्या गरवारे/कोकण भवन पथक

खारघर येथे श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद




 खारघर येथे श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

 

नवी मुंबई, दि. 28 : मानवतेसाठी सर्वोच्च बलिदान देणारे शिख पंथाचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त खारघर येथे भव्य जनकल्याण चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कोश यांच्या सौजन्याने आयोजित या उपक्रमास देशभरातून आलेल्या भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

समागमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांच्या आरोग्याची सर्वंकष काळजी घेत विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत बहुआयामी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिरात फिजिओथेरपी सेवा कक्षदंतरोग तज्ज्ञ कक्षअस्थिरोग तज्ज्ञ कक्षकान-नाक-घसा तज्ज्ञ कक्षहृदयरोग तज्ज्ञ कक्षमेडिसिन विभागतसेच ईसीजी व रक्तदाब तपासणी कक्ष यांचा समावेश होता.

विशेष म्हणजे कॅन्सर स्क्रीनिंग चाचण्या आणि मोफत केमोथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. रक्तदान शिबिराद्वारे सामाजिक बांधिलकी जपत अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. गरजू रुग्णांसाठी मोफत औषध वाटपाचीही सोय करण्यात आली होती.

या शिबिरात एमजीएम मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे डीन डॉ. जी. एस. नरशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्रदीप सावर्डेकरडॉ. नव्या बाबूडॉ. आदित्य ढाकणेडॉ. मोहिनी धर्मा आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा दिली. तसेच नवी मुंबई महानगरपालिकापनवेल महानगरपालिकाकल्याण डोंबिवली महानगरपालिकाउल्हासनगर महानगरपालिकाठाणे महानगरपालिका तसेच आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.

भाविकांनी मोठ्या संख्येने विविध तपासण्या करून घेत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतले. आरोग्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमामुळे समागमाला सामाजिक उत्तरदायित्वाची भक्कम जोड मिळाली. मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या महान बलिदानाच्या स्मरणार्थ आयोजित या आरोग्य शिबिराने “सेवा हीच खरी श्रद्धांजली” हा संदेश अधोरेखित करत समाजोपयोगी कार्याचा आदर्श निर्माण केला.

00000

 

शैलजा पाटील/संध्या गरवारे/कोकण भवन पथक

शीख समाजाचा इतिहास उलगडणारे 'विरासत-ए-सीख' प्रदर्शन ठरतंय भाविकांचे आकर्षण



 शीख समाजाचा इतिहास उलगडणारे 'विरासत-ए-सीखप्रदर्शन ठरतंय भाविकांचे आकर्षण

 

शीख योद्ध्यांनी वापरलेली शस्त्रात्रे पाहण्याची संधी

 

शीख समाजासह नऊ समाजातील महापुरुषांच्या इतिहासाची  सोप्या भाषेत आकर्षक सचित्र मांडणी

 

मुंबईदि.28: : खारघर ओवे मैदान येथे सुरू असलेल्या हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त शीख समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारे 'विरासत-ए-सीखहे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. हे प्रदर्शन भाविकांसाठी आकर्षण ठरत असून या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले भाविक आवर्जून प्रदर्शनाला भेट देत आहेत.

शीख धर्माच्या स्थापनेपासून ते गुरू गोविंद सिंग यांच्यापर्यंतच्या सर्व गुरूंचा इतिहासत्यांनी दिलेले योगदान सचित्र स्वरूपात मांडण्यात आला आहे. विशेषतः हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासोबत शीख योद्ध्यांनी वापरलेली विविध शस्त्रास्त्रे या प्रदर्शन दालनात ठेवण्यात आली आहेत. शीख धर्माचे पहिले गुरु श्री गुरु नानक जी ते शेवटचे गुरु गोविंद सिंगजी यांचा इतिहास व श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे कार्य तसेच शीख धर्मासोबतच सिकलीगरबंजारालबानासिंधीमोहयालवाल्मिकीउदासीन व भगत नामदेव समाजातील महापुरुषांचाही इतिहास या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आला आहे.

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 शहिदी समागमनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले भाविक आवर्जून 'विरासत-ए-सीखया प्रदर्शनाला भेट देत आहेत.

0000000

खारघरमध्ये ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी 350 वा शहिदी समागम निमित्त भव्य पार्किंग व्यवस्थेची तयारी


 

खारघरमध्ये हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी 350 वा शहिदी समागम निमित्त भव्य पार्किंग व्यवस्थेची तयारी

महामार्गापासूनच मार्गदर्शक फलक

कलर कोडिंग नुसार पार्किंगची व्यवस्था

खारघरदि. 28 : अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे 28 फेब्रुवारी व मार्च रोजी आयोजित हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमासाठी भाविकांच्या सोयीसाठी व्यापक आणि रंग-कोडनिहाय 33 ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन बसकार आणि दुचाकींसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक पार्किंग स्थळावरून कार्यक्रमाच्या ठिकाणी मोफत पिकअप आणि ड्रॉप सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वाहन पार्क केल्यानंतर भाविकांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. ओला-उबरसह सर्व टॅक्सी सेवांसाठी देखील स्वतंत्र पिकअप-ड्रॉप पॉइंट्स निश्चित करण्यात आले आहेत.

कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांची गर्दी टाळण्यासाठी ब्ल्यू, ‘ऑरेंज’ आणि पिंक’ अशा तीन रंगांमध्ये पार्किंगचे वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक रंगानुसार विशिष्ट मार्ग व जिल्हे निश्चित करण्यात आले असूनत्यानुसार वाहनचालकांना पार्किंग स्थळी मार्गदर्शन केले जाणार आहे.

ब्ल्यू पार्किंग (नाशिकधुळेजळगावनंदुरबारछत्रपती संभाजीनगरअहमदनगर आदी मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी)

ओवे कॅम्प मैदानइनामपुरी क्रिकेट मैदानश्री सत्य साई हॉस्पिटल परिसरमेट्रो स्टेशनजवळील मैदाने आदी ठिकाणी बस व कार पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या विभागात सुमारे 550 बसेस आणि 1135 कार पार्किंगची क्षमता उपलब्ध आहे.

ऑरेंज पार्किंग (रायगडरत्नागिरीसिंधुदुर्गपुणेसांगलीसाताराकोल्हापूरसोलापूर आदी जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांसाठी)

पापडीचा पाडा सर्कलसेक्टर 35 ईसेक्टर 333227 आणि 23 मधील विविध मैदाने येथे मोठ्या प्रमाणावर पार्किंगची व्यवस्था आहे. या विभागात 400 बसेस आणि तब्बल 4990 कार पार्किंगची क्षमता उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पिंक पार्किंग (मुंबई शहरमुंबई उपनगरठाणेपालघर येथून येणाऱ्या वाहनांसाठी)

सेक्टर 24141116748 आणि 10 मधील मैदाने तसेच लिटल वर्ल्ड मॉल परिसर येथे वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. या विभागात 200 बसेस आणि 2560 कार पार्किंगची सुविधा आहे.

याशिवायकार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी सेंट्रल पार्कसेक्टर 6 परिसर आणि गुरुद्वारामागील टनेल रोड येथे स्वतंत्र पार्किंग राखीव ठेवण्यात आले आहे. येथे सुमारे 1450 कार आणि 1000 मोटारसायकली उभ्या करण्याची क्षमता आहे.

महामार्गपासून मार्गदर्शक फलक

कार्यक्रमादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सुलभ प्रवेश मिळावा यासाठी प्रशासनकडून मार्गदर्शक फलकस्वयंसेवक आणि पोलीस बंदोबस्ताचीही व्यवस्था करण्यात आली. आयोजकांनी भाविकांनी दिलेल्या रंग-कोडनुसार पार्किंगचा वापर करावाअसे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

वाहतूक व्यवस्था व पार्किंग व्यवस्थेबद्दल नवी मुंबई वाहतूक शाखेचे उपायुक्त (वाहतूक ) तिरुपती काकडे यांनी सांगितले कीखारघर येथे हिंद दी चादर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या परिसरामध्ये जवळपास 33 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी पिकअप आणि ड्रॉप सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेम्हणजेज्या ठिकाणी पार्किंगमध्ये आपण वाहन लावालतिथून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोफत पिकअप आणि ड्रॉपची सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबरया ठिकाणी येणारे ओलाउबर आणि टॅक्सी यांच्यासाठीसुद्धा पिकअप आणि ड्रॉपची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून, 28 फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही दिवशी सकाळी 6:00 वाजल्यापासून ते रात्री 11:00 वाजेपर्यंत नवी मुंबईच्या आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये जड आणि वाजड वाहनांना प्रवेश करण्यास आणि पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबरखारघरमध्येसुद्धा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणूनकाही ठिकाणी रस्तेपर्यायी रस्ते निर्माण केलेले आहेत आणि काही रस्त्यांवरती वाहतूक प्रतिबंधित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणूनवाहतूक शाखेकडून एक डीसीपीएक एसीपी, 20 अधिकारी आणि 500 अंमलदार यांच्यासोबत 500 वार्डन नेमण्यात आलेले आहेतज्यामुळे वाहतूक जी आहेती सुव्यवस्थित राखण्यासाठी मदत होईल.

 काही ठिकाणी वाहनं बंद पडण्याची संभावना लक्षात घेतापुरेशा प्रमाणात क्रेन नेमण्यात आलेले आहेत. टोइंग व्हेईकल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सर्व पार्किंगच्या वाहनतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या रस्त्यावर सर्वत्र साइन बोर्ड्स  लावण्यात आलेले आहेत. एकंदरीतया कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था अबाधित राहील यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाहीयासाठी वाहतूक पोलीस आणि नवी मुंबई पोलीस सज्ज आहेतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

00000

शैलजा पाटील/संध्या गरवारे/कोकण भवन पथक