Search This Blog

Friday, 31 May 2024

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याचा तिसरा क्रमांक


राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याचा तिसरा क्रमांक

चंद्रपूर, दि. 31 : राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याने महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. याबाबत 29 मे 2024 रोजी राज्य तंबाखु नियंत्रण कक्ष, मुंबई येथे झालेल्या बैठकीत जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर यांचा सत्कार करण्यात आला.

मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांची आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी 1 मे  ते 31 मे 2024 दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेल्या तसेच वर्षभर केलेल्या उत्कृष्ट कार्याची पडताळणी करण्यात आली. यात जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूरने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक पटकवला आहे. सदर कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येतो. मुंबई येथे सत्कार समारंभाला जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा सल्लागार डॉ.श्वेता सावलीकर ,कौन्सिलर श्री निरांजने उपस्थित होते.

००००००

Thursday, 30 May 2024

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना चिखली येथील बोर तलाव खोलीकरण कार्याचा शुभारंभ



 गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना चिखली येथील बोर तलाव खोलीकरण कार्याचा शुभारंभ

Ø महाराष्ट्र शासननाम फाउंडेशनटाटा मोटर्सचा संयुक्त उपक्रम

चंद्रपूर, दि. 30 : महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चिखली येथील बोर तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज गुरुवारी (ता. 30) जिल्हा जलसंधारण अधिकारी नीलिमा मंडपे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी गिरीश कालकरचिखलीचे ग्रामपंचायत सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लहू कडस्करउपसरपंच दुर्वास कडस्करगुरुभाऊ गुरूनुले प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका रायपुरेजिल्हा जलसंधारण अधिकारी नीलिमा मंडपे यांच्या नेतृत्वात नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील विविध तलावांचे खोलीकरणाचे कार्य प्रस्तावित आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या कामाचा शुभारंभ आज झाला.

चिखली येथील कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांनी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जेसीबी आणि जमिनीचे पूजन करून खोलीकरण कार्याचा शुभारंभ केला. शुभारंभ नंतर तलावातील गाळ काढून तो शेतकऱ्यांना देण्यात आला. ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकरी हा गाळ शेतात टाकणार आहे. शासनाच्या या योजनेमुळे शेतीची गुणवत्ता वाढण्यासोबतच तलावाची पाणी साठवण क्षमता वाढेल. पर्यायी जमिनीमधील पाणी पातळीत वाढ होईल. गाव विकासाच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया उपस्थित गावकऱ्यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्यराजेश जोलमवारपोलिस पाटील पूनम मडावीग्राम विकास अधिकारी प्रीती चिमुरकरमाजी उपसरपंच संजय गेडामसचिन बोर्डावारप्रभाकर कडस्करराकेश कडस्कर तसेच गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

काय आहे योजना?

शासनाच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत शासनातर्फे तलावातील गाळ काढून देण्यात येतो. गावातील शेतकऱ्यांनी हा गाळ  आपल्या शेतात स्वतः वाहून न्यायचा आहे. हा गाळ शेतजमिनीवर टाकल्याने जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते. जमिनीचा पोत वाढतोतर दुसरीकडे तलावाचे खोलीकरण झाल्याने पाणी साठवण क्षमता वाढते. भूजल पातळीत वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना हा गाळ नेण्याचे आवाहन करण्यात येते जेणेकरून त्यांच्या शेतीची सुपिकता वाढल्याने त्यांच्या उत्त्पन्नात वाढ होऊन त्यांची आर्थिक स्थिति बळकट होईल.

०००००००

खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक प्रतिबंधाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा




खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक प्रतिबंधाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूरदि. 30 : जिल्ह्यात खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक तसेच करण्यात येणारी भेसळ, या बाबींना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली खनीकर्म विभागाच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज (दि.30) पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा खनीकर्म अधिकारी सुरेश नैताम, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात असलेल्या कोल माईन्सच्या आत आणि बाहेर जाणा-या दोन्ही प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही असणे आवश्यक आहे. याबाबत खनीकर्म विभागाने तात्काळ तपासणी करावी. तसेच या सीसीटीव्ही चा बॅकअप 90 दिवसांपर्यंत जतन असला पाहिजे. वाहतूक करणा-या वाहनांची नंबर प्लेट सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. प्रत्येक माईन्सचा वाहतूक आराखडा सुनिश्चित केला असतो. या आराखड्याप्रमाणेच वाहनांची वाहतूक होते काय, ते तपासावे. वाहतूक करणा-या वाहनांवर ताडपत्री घट्ट स्वरुपात बांधावी. सुरजागड माईन्समधून वाहतूक करणारी वाहनांची रस्त्यावर किंवा रस्त्याच्या बाजुला पार्किंग होत असेल तर कारवाई करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

तसेच खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत तक्रारी असल्यास खनीकर्म विभागाच्या जिल्हास्तरीय समितीकडे सादर कराव्यात, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

००००००

नुकसानग्रस्त पिकांच्या मोबदल्याकरीता ई-केवायसी आवश्यक

 नुकसानग्रस्त पिकांच्या मोबदल्याकरीता ई-केवायसी आवश्यक

Ø अन्यथा शासनाच्या मदतीपासून राहावे लागेल वंचित

चंद्रपूरदि. 30 :  नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना नुकसानबाबतची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 24 जानेवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार जमा करण्यात येत आहे. त्याकरिता प्रत्यक्ष पंचनाम्याअंती नुकसान भरपाईस पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रमाणित करून संबंधित तहसीलदार यांच्या मार्फत संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्यात येतात. अपलोड करण्यात आलेल्या यादीची शासन स्तरावरुन पडताळणी होऊन माहितीच्या आधारे लाभार्थ्यांचे नाव, बाधीत क्षेत्र. मदतीची रक्कम इ. तपशील दर्शविणारी विशिष्ट क्रमांक यादी (VKList) संगणकीय प्रणालीद्वारे तयार होऊन संबधीत तहसीलदार यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

            माहे जून 2023 ते डिसेंबर 2023 या कालवधीत शेतपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांची यादी संगणकीय प्रणाली (पोर्टल) वर अपलोड केल्यानुसार विशिष्ट क्रमांक यादी (VKList)  संबंधित तहसिल कार्यालयाच्या पोर्टलला उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अद्यापही चंद्रपूर जिल्ह्यातील  20939 शेतकऱ्यांनी ई-केवायसी  प्रक्रिया केली नसल्यामुळे शेतकऱ्यांची रक्कम त्यांचे बँक खात्यात जमा करण्यात आली नाही.  त्यामुळे पात्र शेतक-यांनी त्वरीत ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

तालुकानिहाय प्रलंबित  ई-केवायसी शेतकऱ्यांची संख्या : 28 मे 2024 पर्यंत जिल्ह्यातील एकूण 20939 शेतक-यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. यात बल्लारपूर -2217ब्रम्हपुरी - 1910नागभिड -2692चंद्रपूर-561चिमुर-538सिंदेवाही-713गोंडपिपरी-1036पोंभुर्णा-992मुल-2041, सावली-550जिवती-1300कोरपना-3036राजुरा-1376भद्रावती -328 आणि वरोरा-1649.

जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांनी विशिष्ट क्रमांक यादीतील (VKList) आपल्या नावासमोर नोंदविण्यात आलेला विशिष्ट क्रमांक संबंधित ग्रामसेवक तलाठीकृषी सहायक यांचेकडून प्राप्त करून आपले सरकार सेवा केंद्रास संपर्क साधावा तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावीजेणेकरून शासनामार्फत शेतीपीकांच्या नुकसानीबाबतची रक्कम थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करणे सोईचे होईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

Wednesday, 29 May 2024

मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे व अचूक करा – जिल्हाधिकारी गौडा




मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे व अचूक करा – जिल्हाधिकारी गौडा

Ø अधिकारी, कर्मचारी, सुपरवायझर व सहायकांचे प्रशिक्षण

चंद्रपूरदि. 29 : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एम.आय.डी.सी. परिसर, पडोली येथे होणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील हा अतिशय महत्वाचा आणि शेवटचा टप्पा आहे. कोणतीही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे व अचूक करा, अशा सुचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे मतमोजणीकरीता नियुक्त अधिकारी, कर्मचारी, सुपरवायझर, सहायक, सुक्ष्म निरीक्षकांच्या प्रशिक्षण दरम्यान ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, सहायक निवडणूक अधिकारी डॉ. सुहास गाडे (आर्णि), नितीनकुमार हिंगोले (वणी), विशालकुमार मेश्राम (बल्लारपूर), संजय पवार (चंद्रपूर), रविंद्र माने (राजुरा) आणि शिवनंदा लंगडापुरे (वरोरा) उपस्थित होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच मतमोजणीची प्रक्रिया राबवावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जलदगतीने मतमोजणी पेक्षा अचूकपणे मतमोजणी करा. संबंधित सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी मतमोजणी केंद्रात गोपनीयता व नि:स्पक्षता राखणे आवश्यक आहे. कोणताही निष्काळजीपणा होऊ देऊ नका. आपल्याकडून थोडी जरी चूक झाली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, याची सर्वांनी जाणीव ठेवावी. त्यामुळे आपले वर्तन हे अत्यंत जबाबदारीचे असावे. सहायक निवडणूक अधिकारी स्तरावर सुद्धा प्रशिक्षणाची माहिती द्यावी. मतमोजणी करतांना उमेदवार, त्यांचे निवडणूक प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधींना प्रक्रियेबाबत अवगत करा व त्यांना प्रक्रिया दाखवा.

नियुक्त अधिकारी – कर्मचा-यांनी मतमोजणी केंद्रावर ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेपेक्षा आधीच पोहचावे. प्रवेशासाठी दिलेले ओळखपत्र सोबत ठेवा. कोणत्याही स्टाफला मोबाईल, कॅमेरा, आयपॅड, लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तु मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये नेण्यास मनाई आहे, याची प्रत्येकाने नोंद घ्यावी. यापूर्वीसुध्दा मतमोजणी प्रकियेत भाग घेतला असला तरी अतिआत्मविश्वास बाळगू नका. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणखी उजळणी करून घ्यावी. यानंतरचे शेवटचे प्रशिक्षण 3 जून रोजी मतमोजणी केंद्रावर होणार आहे, याचीसुध्दा सर्वांनी नोंद घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

यावेळी मतमोजणी संदर्भात कायदेशीर प्रक्रिया आणि ईव्हीएम मतमोजणीबाबत उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी तर पोस्टल बॅलेट आणि सर्व्हिस मतपत्रिका मोजणीबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. तत्पूर्वी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष पवार यांनी प्रास्ताविक केले.

००००००

 

Tuesday, 28 May 2024

व्यवसाय करतांना नियमांचे काटेकोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी विनय गौडा



 

व्यवसाय करतांना नियमांचे काटेकोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø अनुज्ञप्ती परवानाधारकांसोबत जिल्हा प्रशासनाचा संवाद

चंद्रपूरदि. 28 : अनुज्ञप्तीचा परवाना देतांनाच शासनाने अटी व शर्तीसुध्दा घालून दिल्या आहेत. आपल्या व्यवसायामुळे इतरांना त्रास होईलअशी कृती न करता परवानाधारकांनी नियमानुसारच वागणे अपेक्षित आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करानियमांचे उल्लंघन किंवा अवैध व्यवसाय करणा-यांविरुध्द सक्त कारवाई करण्यात येईलअसे मत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केले.  जिल्हा प्रशासनपोलिस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात अनुज्ञप्ती परवानाधारकांसोबत संवाद साधतांना ते बोलत होते. बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवारराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सुरजकुमार रामोड उपस्थित होते.

अनुज्ञप्ती विक्रीवाहतूक व साठवणूक संदर्भात कायद्याचे पालन होणे आवश्यक आहेअसे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेकुठेही नियमांचे उल्लंघन आढळले तर कारवाईसाठी तुम्हीच जबाबदार रहाल. नियमांचे गांभिर्य समजावून सांगण्यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुकानदारांनी दर्शनी भागात कमालकिरकोळ विक्री व वेळेबाबतचा फलक लावावा. तसेच नोकरनामाआवश्यक अभिलेखस्टॉक रजिस्टर अपडेट ठेवा. ज्या दिवशीचे रजिस्टर त्याच दिवशी भरून पूर्ण करा. जेणेकरून कोणत्याही वेळेस प्रशासनाकडून पडताळणी झाली तर अडचण होणार नाही.

अनुज्ञप्ती विक्री संदर्भात नियमानुसार दिलेल्या वेळा गांभिर्याने पाळा. ज्या परवानाधारकांकडे सीसीटीव्ही नाहीत्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्रात 21 वर्षांखालील नागरिकांना मद्यविक्री करता येत नाही. 21 ते 25 वयोगटातील नागरिकांना सौम्य मद्यविक्री तर 25 वर्षांवरील नागरिकांना सर्व प्रकारची मद्यविक्री करता येते. त्यामुळे खरेदीदाराच्या ओळखपत्रावरुन वयाची पडताळणी करूनच मद्य विक्री करा. अन्यथा विनाकारण एखादी घटना घडली तर त्यात तुम्हीसुध्दा अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गोष्टीकडे गांभिर्याने लक्ष द्या. दुकानावर असलेल्या इतर कामगारांनासुध्दा सर्व नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. अवैध व्यवसाय करणा-यांची माहिती प्रशासनाकडे द्या व स्वत:चा व्यवसाय नियमानुसार कराअसे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी केले.

पैसे कमाविण्याच्या नादात कायद्याच्या कचाट्यात अडकू नका : एसपी सुदर्शन

अटी व शर्तीनुसारच अनुज्ञप्ती परवानाधारकांनी व्यवसाय करावा. अवैध व्यवसाय करणा-यांवर प्रशासनातर्फे नियमित कारवाई सुरूच आहे. याव्यतिरिक्त अवैध विक्रीबाबत काही माहिती असल्यास पोलिस प्रशासनाला त्वरीत कळवा. नियमांचे उल्लंघन करून पैसे कमावण्याच्या नादात विनाकारण कायद्याच्या कचाट्यात अडकू नकाअसे जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले.

ठरवून दिलेल्या नियमानुसार आपली दुकाने वेळेवर सुरु करा व वेळेवर बंद करा. दारू पिऊन गाडी चालवू नये’ अशा आशयाचे फलक आपल्या दुकानांसमोर लावा. राज्यातील इतर घटनांची चंद्रपूरमध्ये पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नियमांचे पालन करण्यासंदर्भात ही बैठक बोलाविण्यात आली आहे. असामाजिक तत्वांकडून त्रास होत असेदारूकरीता कोणी जबरदस्ती करीत असेल तर पोलिस विभागाला कळवा किंवा 112 क्रमांकावर थेट कॉल करापोलिसांकडून नक्कीच कारवाई करण्यात येईलअशी ग्वाही श्री. सुदर्शन यांनी दिली.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक श्री. रामोड यांनी प्रास्ताविकातून नियमांबद्दल माहिती दिली. तसेच याप्रसंगी अनुज्ञप्ती परवानाधारकांनी सुध्दा आपले म्हणणे / सूचना प्रशासनाला सांगितल्या. बैठकीला जिल्ह्यातील परवानाधारक अनुज्ञप्ती व्यवसाय करणारे उपस्थित होते.

00000000

मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात उमेदवार व राजकीय पक्षाची बैठक

 


मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात उमेदवार व राजकीय पक्षाची बैठक

Ø आयोगाच्या सुचनांबाबत जिल्हाधिका-यांनी केले अवगत

चंद्रपूरदि. 28 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एम.आय.डी.सी. परिसर, पडोली येथे होणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाच्या सुचनांबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी उमेदवार व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना अवगत केले. तसेच मतमोजणी केंद्रात उमेदवार, त्यांचे निवडणूक प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश राहणार असून याव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यासाठी नियोजन सभागृह येथे राजकीय पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

4 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष सकाळी 7 वाजता सुरक्षा कक्ष उघडण्यात येईल. तसेच मतमोजणी केंद्रात उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना सकाळी 7 वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्हा कोषागार कार्यालयात असलेल्या टपाली मतपत्रिका सकाळी पोलिस बंदोबस्तात कोषागार कार्यालयातून मतमोजणी केंद्राकडे पोहचविण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता टपाली मतपत्रिका व सर्व्हिस मतदारांच्या मतपत्रिकांच्या मोजणीला सुरुवात होईल. तर प्रत्यक्ष ईव्हीएम मतमोजणी प्रक्रिया सकाळी 8.30 वाजता सुरू होणार आहे. सुरक्षा कक्ष ते मतमोजणी कक्षादरम्यान मतदान यंत्र व पाकिट क्रमांक 1 यांच्या वाहतुकीबाबत व त्याचे चित्रीकरण, मतमोजणी केंद्रात प्रदर्शित करण्यात येणार असून संपूर्ण परिसर सीसीटीव्ही नियंत्रणाखाली राहणार आहे.

अशा राहणार विधानसभानिहाय मतमोजणीच्या फे-या : 70- राजुरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 24 फे-या, 71 – चंद्रपूर मतदारसंघात 28 फे-या, 72- बल्लारपूर करीता 26 फे-या, 75- वरोरा करीता 25 फे-या, 76 -वणीकरीता 25 फे-या आणि 80 – आर्णि विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 27 फे-या राहणार आहेत.

मतमोजणी प्रतिनिधी नियुक्ती व आवश्यक कागदपत्रे : मतमोजणी प्रतिनिधीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. तसेच सदर प्रतिनिधी लोकसभा मतदारसंघातील मतदार असावा. 31 मे 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रतिनिधींची नियुक्तीची मुदत आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघाकरीता 14 टेबलसाठी (प्रति उमेदवार) 14 प्रतिनिधी, टपाली मतमोजणीकरीता 9 प्रतिनिधी आणि सर्व्हिस मतपत्रिकाकरीता 1 प्रतिनिधी. मतमोजणी प्रतिनिधींजवळ ओळखपत्र, मतमोजणी प्रतिनिधी ‍नियुक्तीबाबत पत्राची प्रत आणि घोषणापत्र असणे आवश्यक आहे.

मतमोजणी केंद्रात परवानगी असलेले साहित्य : मतमोजणी केंद्रात पेन / पेन्सील, पांढरा कागद / नोटपॅड आणि 17 – सी ची दुय्यम प्रत असणे आवश्यक आहे. तसेच मतमोजणी केंद्रात मोबाईल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

००००००

मतमोजणी केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू

 मतमोजणी केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू

            चंद्रपूरदि. 28 :  13-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य वखार महामंडळपडोली येथे दिनांक  4 जून 2024 रोजी पार पाडली जाणार असून मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2 ) मधील कलम 144 व 144(1)(3) लागू  करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात 4 जून रोजी सकाळी 6 वाजतापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खालील बाबी करण्यास जिल्हाधिका-यांच्या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात आला आहे.

मतमोजणी केंद्राच्या बाहेरील 100 मीटर परीसरात सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध असेल तसेच मतमोजणी केंद्राचे बाहेरील 100 मीटर परीसरातील  सर्व दुकाने / आस्थापना  व्यवसाय केंद्र बंद राहतील. मतमोजणी केंद्राचे परीसरात मतमोजणी कामावर नेमणुक झालेल्या अधिकारी व कर्मचा-यांकरीता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतमोजणी करीता नियुक्ती झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांची वाहनेपोलीस विभागविद्युत विभाग,अग्नीशमन विभाग व सुरक्षा व्यवस्थेकरीता असलेली वाहने यांनाच प्रवेश राहील. इतर सर्व प्रकारच्या वाहनांस प्रतिबंध असेल. 

भारत निवडणूक  आयोगाचे वतीने  वितरीत  केलेल्या अधिकृत ओळखपत्राशिवाय इतर व्यक्तिंना मतमोजणी परिसरात  प्रवेश प्रतिबंध असेल.  मतमोजणीच्या दिवशी केंद्राच्या बाहेरील 100 मीटर परिसरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहात जमा होण्यास प्रतिबंध असेल. उमेदवार व पत्रकार यांना ठरवून दिलेल्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करता येईल.  परंतू प्रत्यक्ष मतमोजणी  कक्षात मोबाईल  फोन  वा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नेण्यास/ वापरण्यास प्रतिबंध असेल. 

मतमोजणी केंद्र  महाराष्ट्र राज्य वखार महामंडळपडोलीच्या सभोवताल 1कि.मी. चे क्षेत्रात /परिसरात ड्रोन वा ड्रोन सद्दश्य  वस्तु (Flying Objects) उडविण्यास 4 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजतापासून मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंध असेल, असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या आदेशात नमुद आहे.

००००००

उष्मालाटेच्या अनुषंगाने 29 व 30 मे रोजी जिल्ह्याकरीता यलो अलर्ट जारी


उष्मालाटेच्या अनुषंगाने 29 व 30 मे रोजी जिल्ह्याकरीता यलो अलर्ट जारी

Ø उष्माघाताबाबत खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूरदि. 28 : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून उष्मालाटेच्या अनुषंगाने 29 आणि 30 मे रोजी जिल्ह्याकरीता येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जे नागरीक घराबाहेर बराच वेळ घालवतात त्यांना उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत असतील तर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास उष्णता जीवघेणी ठरु शकते. जेव्हा शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते आणि शरीराची शीतकरण यंत्रणा योग्यरित्या कार्य करण्यास अपयशी ठरते तेव्हा ही स्थिती उद्भवू शकते.

उष्माघाताची लक्षणे : शरीराचे उच्च तापमानअनेकदा १०४°F (४०°C) पेक्षा जास्त असते. यामुळे गोंधळचक्कर येणे आणि मळमळ होऊ शकते. नाडीचे ठोके वाढणे आणि डोकेदुखी ही देखील सामान्य लक्षणे आहेत. त्वचा उष्ण आणि कोरडी किंवा ओलसर आणि घाम वाटू शकते. गंभीर प्रकरणांमध्ये बेशुद्ध पडणे किंवा झटके येऊ शकतात. स्वतःला किंवा इतर कोणाला ही लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

उष्माघात टाळण्यासाठी काय करावे : उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहणे टाळावे. घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी टोपीरुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. हलकीपातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावेसोबतच ओआरएसचा वापर करावा. पाणीयुक्त फळे खावीत. नागरीकांनी सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे असून वृद्धलहान मुले तसेच पूर्व- अस्तित्वात असलेली वैद्यकीय परिस्थिती ज्यांची चांगली नाही त्यांनी अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे.

काय करु नये : उन्हात अतिकष्टाची कामे करु नये. दारुचहाकॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये. दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडदघट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्या. चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये.

००००००

Monday, 27 May 2024

रस्ते अपघात नियंत्रणाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा



रस्ते अपघात नियंत्रणाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूरदि. 27 : रस्ते अपघात नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आढावा घेऊन जिल्हा रस्ता सुरक्षा समिती तसेच इतर संबंधित विभागाला सुचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला मनपा आयुक्त विपीन पालीवाल, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता श्री. बोबडे उपस्थित होते.

शहरातील वरोरा नाका येथे चारही बाजूंनी येणा-या भरधाव वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गतीरोधक लावून त्याला वारंवार पेंटींग करणे. तसेच सोलर ब्लिंकर आणि प्लॅस्टिकचे डेलीनेटर्स लावणे. शहरातून जाणा-या मार्गावर वेग नियंत्रण, गतीरोधक, चालकांसाठी सूचना आदी बाबींचे माहितीचे फलक स्पष्टपणे निदर्शनास येईल, अशा जागांवर लावावे. शहरातील अनेक चौकात हिरवा सिग्नल संपण्यापूर्वीच दुस-या बाजूचे वाहनचालक गाड्या चालवितांना दिसतात. हे अतिशय धोकादायक असून अपघाताची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच वाहतूक नियंत्रण व अपघात कमी करण्याबाबत नागरिकांच्या काही सुचना असल्यास त्यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडे सादर कराव्यात, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

००००००

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

            चंद्रपूरदि. 27 : भारतीय सैन्यदलनौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना संघ लोकसेवा आयोग (UPSC)  या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे  10 जून  ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. 63 आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवासभोजनआणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

            चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयचंद्रपूर येथे 6 जून 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department 0f Sainik Welfare, pune (DSW) डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअरपुणे डीएसडब्लू (DSW) यांची वेबसाईट www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other-PCTC NashikCDS-63) कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सौनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या ) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

             अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारीछात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा 9156073306 (प्रवेश पत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावाअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण  अधिकारीयांनी केले आहे.

००००००

मृतकाची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

 मृतकाची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 27 :  दुर्गापुर हद्दीतील  तुकुम परीसरातील डॉ. गंधे हॉस्पीटल समोर एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 45 ते 50 वर्षे  वयोगटातील इसम हा मृत अवस्थेत मिळून आल्याने पोलिस स्टेशन दुर्गापूर येथे नोंद असून पुढील प्रक्रिया तपासावर आहे.

            मृतकाचे वर्णन : वय 45 ते 50 वर्षे,  वर्ण- काळाउंची -5 फुट 2 इंच बांधा- सडपातळडोक्यावरील केस बारीक  काळे पांढरेदाडी मिशी जाडअंगात मेहंदी रंगाची हाप टी-शर्ट व काळया रंगाचा जिन्स घातला आहे. वरील वर्णनाचे मृतकाबाबत माहिती असल्यास पोलिस स्टेशन दुर्गापुर मो.क्र.7887891003 तसेच पोलीस निरीक्षक – लता वाढीवे 9923029083पोलिस निरीक्षक गिरीश मोहतुरे 9823184879 येथे संपर्क करावा.

००००००

Sunday, 26 May 2024

दारू विक्री संदर्भात अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करा

 दारू विक्री संदर्भात अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करा

Ø जिल्हाधिकाऱ्यांचे दारू दुकानदार व बारमालकांना सक्त निर्देश

चंद्रपूरदि. 26 : पुणे येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्री व परवानाबाबत जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून दारू विक्री संदर्भात सर्व अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करावे.  अन्यथा सक्त कारवाई करण्यात येईलअसा इशारा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दुकानदार व बारमालकांना दिला आहे.

एफएल -3  अनुद्यप्तीधारकांनी कुठल्याही संबंधित किरकोळ मद्य विक्री अबकारी अनुद्यप्तीतून 21 वर्षाखालील व्यक्तीस मद्य विक्री करू नये. तसेच 21 ते 25 वर्ष वयोगटात असलेल्या व्यक्तीस सौम्य बियर /सौम्य मद्य विक्री करावी. 25 वर्षापेक्षा कमी वयोगटात असलेल्या व्यक्तीस तीव्र मद्य देऊ नये.अनुद्यप्तीच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करावे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनुद्यप्ती सकाळी 11.30 ते रात्री 11.30 या वेळेतच सुरू राहीलयाची दक्षता घ्यावी.

मद्य सेवन करणाऱ्या व्यक्ती जवळ मद्य सेवनाचा परवाना असणे आवश्यक आहे. अनुद्यप्तीच्या जागेत कोणत्याही असमाजिक तत्व / गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती आढळल्यास त्याबाबत त्वरित पोलीस विभागाला कळवावे. अनुद्यप्तीच्या परिसरात येणाऱ्या व जाणाऱ्या ग्राहकांच्या हालचालीवर नजर ठेवण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे. मंजूर जागेच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींना अनुद्यप्तीच्या ठिकाणी प्रवेश देऊ नये. परवाना कक्ष अनुद्यप्ती कामकाजाच्या वेळेबाबतचा फलक आस्थापनेच्या आत दर्शनी भागात लावावा. वरील सर्व बाबींचे अतिशय काटेकोरपणे पालन करावेअन्यथा सक्त कारवाई करण्यात येईलअसे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.

०००००००

Friday, 24 May 2024

12 वी च्या परीक्षेत बालगृहातील विद्यार्थ्यांचे यश

 12 वी च्या परीक्षेत बालगृहातील विद्यार्थ्यांचे यश

चंद्रपूरदि. 24 :  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय व स्वयंसेवी बालगृहामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके जसे अनाथबेवारसपरित्यागीतहरवलेलेबालकांना बाल कल्याण समितीचंद्रपूर यांचे आदेशान्वये दाखल करण्यात येते. सदर बालगृहात 0 ते 18 वर्षे  वयोगटातील प्रवेशित बालिकांना शासनाद्वारे निवासपोषण आहार तसेच शैक्षणिक  सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते. उपलब्ध संसाधनाचा

            जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयअतंर्गत जिल्ह्यातील जिजामाता बालगृहगडचांदुर येथिल 2 बालिका तसेच स्वामी विवेकानंद बालगृह राजुरा येथिल 2 बालकांनी कुठलेही ट्युशन न लावता 12 वी च्या परीक्षेत घवघवित यश संपादन केले आहे. या यशाकरिता बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ॲङ क्षमा बासरकर,  सदस्य वनीता घुमेॲड.अमृता वाघडॉ ज्योत्स्ना मोहितकर तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दिपक बानाईतजिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकरकायदा व परिविक्षा अधिकारी सचिंद्र नाईक प्रिती उंदीरवाडेव जिल्हा बाल संरक्षण कक्षजिल्हा चाईल्ड लाईनचंद्रपूर येथिल अधिकारी व कर्मचा-यांनी बालकांचे अभिनंदन केले.

००००००

आधारकार्ड अद्ययावतीकरण करण्याचे आवाहन



 आधारकार्ड अद्ययावतीकरण करण्याचे आवाहन

Ø दिव्यांग व अंध नागरीकांनीही आधारकार्ड अद्ययावत  करावे

चंद्रपूरदि. 24 : विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी आधारकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज असून त्याचे अद्यावतीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी आधारकार्डचे बायोमेट्रीक अद्ययावतीकरण करून घ्यावे. तसेच दिव्यांग आणि अंध नागरिकांनीही आधारकार्ड अद्ययावत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे जिल्हास्तरीय आधार नियंत्रण समितीची बैठक पार पडली. सदर बैठकीत जिल्ह्यातील आधारकार्ड वितरण व दुरुस्तीबाबत आढावा घेण्यात आला. वय 0 ते 5 वर्ष व 5 ते 15  वर्ष गटातील बालकांचे आधार अद्ययावतीकरण करण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ मिळण्यासाठीस्पर्धा परीक्षा अर्ज भरणे व शिष्यवृत्ती आदी बाबींकरीता आधारकार्ड आवश्यक दस्तऐवज आहे.

त्याकरिता जवळच्या शासकीय कार्यालय (पंचायत समितीतहसिल कार्यालयमनपा/ नगर परिषद नगर पंचायत इतर) बँक किंवा पोस्ट ऑफीस येथे उभारलेल्या आधार केंद्रावर जावून आधारकार्ड अद्ययावतीकरण करुन घ्यावे. तसेच जिल्ह्यातील दिव्यांग व अंध नागरिकांनीसुध्दा कोणत्याही शासकीय योजनेकरिता केवायसी करावयाचे असल्यास त्यांनी सदर केवायी ही एम-आधार ॲप द्वारे किवा ई-आधारद्वारे  करावीजेणेकरून अद्ययावत आधारकार्डमुळे सर्व शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळू शकेलअसे आवाहन जिल्हाधिकारीचंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

जिल्ह्यातील 39 अनधिकृत होर्डींग्ज निष्कासीत



 जिल्ह्यातील 39 अनधिकृत होर्डींग्ज निष्कासीत

Ø अनधिकृत होर्डींग्ज त्वरीत काढण्याच्या जिल्हाधिका-यांच्या सुचना

चंद्रपूरदि. 24 : मुंबई येथील होर्डींग्ज दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून आतापर्यंत अनधिकृत असलेले 39 होर्डींग्ज निष्कासीत करण्यात आले आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 26 होर्डींग्जचा समावेश आहे.

मुंबई येथे होर्डींग्ज दुर्घटना घडताच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी तातडीने मनपा प्रशासन, नगर पालिका प्रशासन, जिल्हा परिषद, रेल्वे विभाग, जिल्हा माहिती कार्यालय व इतर संबंधित यंत्रणेची बैठक घेऊन अनधिकृत होर्डींग्जवर कारवाई करण्याच्या सुचना यंत्रणेला दिल्या. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 39 अनधिकृत होर्डींग्ज काढण्यात आले असून उर्वरीत होर्डींग्जवर कारवाई सुरू आहे. यात सर्वाधिक 26 अनधिकृत होर्डींग्ज चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील असून नगर पालिका प्रशासन विभागामार्फत वरोरा येथील 1, गडचांदूर येथील 2, राजुरा येथील 2, ब्रम्हपूरी येथील 2, नागभीड 3 आणि चिमूर येथील 3 होर्डींग्ज निष्कासीत करण्यात आले आहे.

आपापल्या क्षेत्रात जे अनधिकृत होर्डींग्ज आहेत, ते तातडीने काढावे तसेच ज्या होर्डींग्जना परवानगी आहे, ते सर्व नियमानुसार व नियमित आकारात आहे की नाही, तेसुध्दा तपासावे, अशा सुचना जिल्हा‍धिकारी यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

जिल्ह्यातील अधिकृत जाहिरात फलकांची संख्या : रेल्वे विभाग 35, चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र 124, नगर पालिका प्रशासन क्षेत्र 83, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय 49 आणि ग्रामपंचायत क्षेत्र 19 असे एकूण 310 अधिकृत होर्डींग्ज आहेत.  

०००००००