Search This Blog

Monday, 20 May 2024

हरविलेल्या मुलाबाबत संपर्क करण्याचे आवाहन

 हरविलेल्या मुलाबाबत संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 20 :  चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट येथील रहिवासी 13 वर्षीय रोहनकुमार अविनाश नवके हा बालक बेपत्ता असून त्याचा शोध महाकाली मंदिर वार्डचंद्रपूर शहररेल्वे स्टेशनबसस्टॉप व नातेवाईकाकडे घेतला असलता तो कुठेही   मिळून आला  नाही. त्यामुळे 10 मे 2024 रोजी रोहन बेपत्ता असल्याची तक्रार चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. हरविलेल्या या बालकाबाबत काही माहिती असल्यास पोलिसांसोबत संपर्क करावा. 

            वर्णन : रोहनकुमार अविनाश नवके  (वय 13 वर्ष)बांधा सळपातळ, रंग-सावळाउंची-अंदाजे 4 फुटकेस काळेअंगात – लाल रंगाची टी शर्ट व काळया रंगाचा नाईट पॅन्टपायात स्लिपर  चप्पल,  सोबत लाल रंगाची छोटी सायकल अशा वर्णनाचा मुलगा,आढळल्यास नजिकच्या सहा.पोलिस निरीक्षक पो.स्टे. चंद्रपूर शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे पोलिस विभागाने कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment