धान व भरडधान्याची 31 मे पर्यंत खरेदी
चंद्रपूर, दि. 15 : पणन हंगाम 2023-24 रब्बी मधील शासकीय आधारभुत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदी/भरडधान्य (मका) खरेदी केंद्रावर 30 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी सुरू होती. परंतु मागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामामध्ये अल्प प्रमाणात शेतकरी नोंदणी झालेली असल्याने आता शेतकरी नोंदणीला व खरेदीला 31 मे 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी शेतकरी नोंदणी करताना हंगाम 2023-24 पासून ज्या शेतकऱ्याचा 7/12 आहे, त्याच शेतकऱ्याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्याच शेतकऱ्यांने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहून दिलेल्या कालावधीत म्हणजे 31 मेपर्यंत आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर धान खरेदी/ भरडधान्य (मका) खरेदीसाठी नोंदणी पूर्ण करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी तिवाडे यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment