Search This Blog

Thursday 2 May 2024

25 जून पर्यंत सुरू राहणार चना खरेदी व नोंदणी

 

25 जून पर्यंत सुरू राहणार चना खरेदी व नोंदणी

चंद्रपूर, दि. 2 : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत 2023-24 मध्ये 28 मार्च पासून चना खरेदीकरीता शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे. ही खरेदी 25 जून 2024 पर्यंत सुरू राहणार असून जिल्ह्यात पाच केंद्रावर चना खरेदी करण्यात येत आहे.

चंद्रपूर खरेदी केंद्राला पोंभुर्णा, सावली, मूल तालुका जोडले असून राजूरा केंद्रासोबत बल्लारपूर आणि गोंडपिपरी तालुका, गडचांदूर केंद्रासोबत कोरनपा, जीवती तालुका, चिमूर खरेदी केंद्रासोबत ब्रम्हपूरी, सिंदेवाही, नागभीड तालुका आणि वरोरा खरेदी केंद्रासोबत भद्रावती तालुका जोडण्यात आला आहे. या पाच खरेदी केंद्रावर नॅशलन को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन, नाशिक (एन.सी.सी.एफ.) मार्फत चना खरेदी व नोंदणी सुरू करण्यात आली आहे. एनसीसीएफ ने ठरवून दिलेल्या कालावधीत शेतक-यांनी आपल्या नजीकच्या केंद्रावर जावून चना विक्री व नोंदणी करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.एस.तिवाडे यांनी कळविले आहे.

नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : सातबारा, चालू खाते असलेले बँकेचे पासबुक, आधारकार्ड, आठ अ प्रमाणपत्र आवश्यक.

००००००

No comments:

Post a Comment