Search This Blog

Friday 28 June 2024

एक रुपयांत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा


एक रुपयांत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा

Ø जिल्हाधिका-यांचे शेतक-यांना आवाहन

Ø अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत

चंद्रपूरदि. 28 : विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणा-या नुकसानीपासून शेतक-यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2024 करिता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होता येईल. त्यामुळे शेतक-यांनी केवळ 1 रुपये प्रती अर्ज एवढी रक्कम भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शेतक-यांना केले आहे. योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 आहे.

केंद्र शासनाच्या ‘कप ॲन्ड कॅप मॉडेल’ (80 : 110) नुसार ही योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी  हंगाम 2025-26 या तीन वर्षाकरिता अधिसुचित पीकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे जास्तीत जास्त दायित्व एकूण विमा हप्त्याच्या 110 टक्यांपर्यंत असणार आहे. यापेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देईल. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणा-या शेतक-यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहे. भाडेपट्टीने शेती करणा-या शेतक-यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के आहे.

योजना कार्यान्वयीन यंत्रणा : चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2024 करीता ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या पीक विमा पोर्टलचा टोल फ्री क्रमांक 14447 हा असून पीक विमा कंपनीचा ई-मेल pmfby.१८००००@orientalinsurance.co.in हा आहे.

विमा योजनेत सहभागी होण्याकरीता : इतर बिगर कर्जदार शेतक-याने आले आधारकार्ड7/12 उताराबँक पासबुक, पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज द्यावा व हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोच पावती जपून ठेवावी. कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी), आपले सरकार सेवा केंद्राच्या मदतीने विमा योजनेत सहभागी होता येते त्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता.

विमा संरक्षित रक्कम : खरीप 2024 करीता चंद्रपूर जिल्ह्यासाठी पीकनिहाय निश्चित करण्यात आलेली विमा संरक्षित रक्कम पुढीलप्रमाणे आहे. ज्वारी 28000 रुपये, सोयाबीन 52750 रु., मुग 25817 रु., उडीद 26025 रु., तूर 36802 रु., कापूस 55750 रु. आणि भात 47750 रुपये आहे.

पीक विमा योजनेंतर्गत या जोखमींचा समावेश : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुढील कारणांमुळे शेतक-यांना टाळता न येण्याजोगे कारणांमुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळेल. तसेच हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी/लावणी/ उगवण न झाल्यामुळे होणारे नुकसानखरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी / लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहील.

पिकांच्या हंगामातील प्रतिकृल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान : हंगामातील प्रतिकुल परिस्थितीतमात्र सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यत पूरपावसातील खंडदुष्काळ इ. बाबीमुळे शेतक-यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मागील लगतच्या 7 वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसुचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण देय राहील. 

पीक पेरणीपासून काढणी पर्यतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी : दुष्काळपावसातील खंडपूरक्षेत्र जलमय होणेकिड व रोगांचा व्यापक प्रार्दुभावभूस्खलननैसर्गिक आगवीज कोसळणेवादळगारपीटआणि चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणा-या जोखमींमुळे पिकाच्या उत्पादनात येणाच्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाईल.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती : या बाबी अंतर्गत गारपीटभुस्खलनविमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यासढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निकश्चित करण्यात येईल.

काढणी पश्चात नुकसान : कापणी / काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकाचे काढणीनंतर 2 आठवड्याच्या आत (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्ति स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्ति केली जाईल.

नुकसान भरपाई मिळण्यासाठी : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अकस्मात नुकसान झाल्यास तसेच काढणीपश्चात नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत याबाबत, विमा संरक्षण घेतलेल्या शेतक-यांनी सर्व्हे नंबर नुसार सर्वप्रथम केंद्र शासन पीक विमा योजना ॲप (Crop insurance App) चा वापर करावा. तसेच संबंधित विमा कंपनी , संबंधित बँक, कृषी / महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे कळविण्यात यावे. तसेच नुकसान कळवितांना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे बंधनकारक आहे. विमा योजनेत सर्वप्रकारची नुकसान भरपाई रक्कम संबंधित शेतक-याच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. त्यामुळे बँक खाते योग्य नोंदवावे.

महत्वाच्या नवीन बाबी : या योजनेत जे पीक शेतात लावले आहेत्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल. या योजनेत सहभागी होण्याकरिता ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्यात यावी. त्यामुळे सर्व शेतक-यांनी आपल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी मध्ये वेळेवर करावी. भाडे कराराद्वारे पीक विमा योजनेत सहभाग घेणा-या शेतक-यांना नोंदणीकृत भाडे करार प्रत पीक विमा पोर्टल वर अपलोड करावी लागेल.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सन 2023-24 या वर्षात 3 लक्ष 50 हजार 969  शेतक-यांनी सहभाग घेवून 3 लक्ष 27 हजार 901 हे. क्षेत्र विमा संरक्षित केले होते. त्या अनुषंगाने एकूण 9162.92 लक्ष रकमेचा विमा संबंधित शेतकयांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे.

सद्यस्थितीत प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2024-25 अंतर्गत केवळ 1 रुपया प्रति शेतकरी या दराने जिल्ह्यातील 5878 शेतक-यांनी 10493 अर्जाव्दारे सहभाग नोंदविलेला आहे. या योजनेंतर्गत नोंदणीची अंतिम मुदत 15 जुलै2024 पर्यंत असल्याने जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता आपल्या नजिकच्या बँक शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये विहीत मुदतीत विमा हप्ता भरून सहभागी व्हावेअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडामुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले असून या योजनेबाबत अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारीतालुका कृषी अधिकारीउपविभागीय कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे संपर्क करावा.

००००००

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय दिन

 

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय दिन

चंद्रपूरदि. 28 : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 26 जून  रोजी सामाजिक न्याय दिन  तसेच आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सामाजिक न्याय भवनापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत रॅली काढण्यात आली. जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या संशोधन अधिकारी पुष्पलता आत्राम यांनी रॅलीला  हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली यानंतर सामाजिक न्याय भवनात  सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन अधिकारी पुष्पलता आत्राम तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे डॉ. संजीव निंबाळकरप्रा. विश्वानाथ राठोडप्रा. कल्पना कवाडे तसेच नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. 

या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन म्हणून शपथ घेण्यात आली. तसेच सदर कार्यक्रमात सामाजिक न्याय दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त राजू घोले व श्री. तेटेवार यांना सम्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष अधिकारी प्रतिभा भागवतकार यांनी तर आभार समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे यांनी मानले. यावेळी गणमान्य व्यक्ती व अधिकारीकर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येत उपस्थित होते.

००००००

तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

 तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 28 : जिल्हयातील तृतीयपंथीय व्यक्तींना नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून द्यावयाचे आहे. त्यासाठी तृतीयपंथीयांची  कागदपत्रासह माहिती आवश्यक आहे. त्याकरीता तृतीयपंथीयासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थातृतीयपंथीयांची मंडळे किंवा संघटना येथील प्रतिनिधीनी किंवा स्वत: तृतीयपंथी या व्यक्तींने सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपूर या कार्यालयाशी  कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन तृतीयपंथीय असलेबाबतची वैयक्तिक व रहिवाशी पुराव्याबाबतची माहिती त्वरित सादर करावी. जेणेकरून आपले माहितीचे आधारे नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या पोर्टलवर माहिती भरून तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येईल, असे सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी कळविले आहे.   

००००००

Thursday 27 June 2024

जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या समस्या सोडविणार




जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या समस्या सोडविणार

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

Ø भविष्यात नर्सिंगडेंटल आणि पॅरामेडीकल कॉलेज आणण्याचे नियोजन

चंद्रपूरदि. 27 : वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टर अभ्यासक्रमासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णसेवाही देत असतात. अशावेळी या डॉक्टरांना चांगली वागणूक मिळावी आणि त्यांच्या हातून चांगली सेवा घडावीयाची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे येथील निवासी डॉक्टरांच्या मुलभूत समस्या त्वरित सोडविण्यात येतीलअशी ग्वाही राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सर्वोत्कृष्ट करण्यासाठी भविष्यात चंद्रपुरात नर्सिंगडेंटल आणि पॅरामेडीकल कॉलेज आणणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या समस्यांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळेविशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोलेशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रणय गांधीनिवासी डॉक्टर संघटनेचे (मार्ड) डॉ. अक्षय वाघमारेडॉ. पल्लवी रेड्डीडॉ. प्रशांत मकदूम आदी उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयात लवकरच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडून सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी आपण व्यक्तिश: लक्ष देऊअसे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले175 सुरक्षा रक्षकांचे 1 कोटी 44 लक्ष 51 हजार 439 रुपये 30 मे 2024 रोजी महाराष्ट्र सुरक्षा मंडळाला देण्यात आले आहे. उर्वरीत रक्कम सुरक्षा मंडळाला त्वरीत देण्यात येईल. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीकरीता 450 सुरक्षा रक्षकांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकांचा निधी राज्य शासनाने थेट महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे देण्याबाबतचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आपण मांडणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

पुढे ते म्हणालेजिल्हा सामान्य रुग्णालयात एका रुग्णासोबत एक नातेवाईक असा नियम आहे. याबाबत रुग्णालयाकडून पास सुध्दा वितरीत करण्यात येते मात्र ब-याचवेळी नातेवाईक रुग्णालयात गर्दी करतात. नातेवाईकांमध्ये एखादा व्यक्ती जर दारु पिऊन असेल तर त्याची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्यासाठी 33 कोटी 65 लक्ष रुपयांचा फर्निचरचा प्रस्ताव आणि 42 कोटी 79 लक्ष रुपयांचा अत्याधुनिक साधनसामुग्रीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नवीन इमारतीमध्ये चांगल्या कंपनीचे फर्निचर लावा.

निधीची वाट बघणार नाही : विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. सामान्य रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यात्यांची स्वच्छता व शुध्दीकरण व इतर मुलभूत सुविधांसाठी शासनाच्या निधीची वाट न पाहता जिल्हा नियोजन समिती आणि खनिज विकास निधीतून पैसे उपलब्ध करून दिले जातीलअसा विश्वास देत येथील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोतअसेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. महिला रुग्णालय त्वरीत सुरू करण्याचे तसेच नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्गावरील अतिक्रमण काढण्याचे निर्देशही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

००००००  

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुढे सरसावले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार


चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुढे सरसावले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष भेटून केली मागणी

Ø पिक विमा योजनेअंतर्गत थकीत 51.31 कोटी रुपयांकडे वेधले लक्ष

चंद्रपूर / मुंबईदि. 27 : खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असून शेतकरी वेगाने कामाला लागला आहेबळीराजाला शासकीय योजनांचा योग्य व तात्काळ लाभ मिळावा, यासाठी मी प्रयत्नशील असून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली व त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यवन व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजना तसेच नमो किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया वेगाने व्हावी, यासाठी मनुष्यबळ वाढावे तसेच पीक विमा योजनेची उर्वरित 51.31 कोटी रुपयांची अप्राप्त रक्कम तातडीने मिळावी या मागण्यांसाठी  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली व निवेदन दिले.

या चर्चेदरम्यान श्री. मुनगंटीवार कृषिमंत्र्यांना म्हणाले कीखरीप हंगाम 2023 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार 969 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा काढला होता. खरीप हंगाम सन 2023 - 24 मध्ये सोयाबीन वरील "येलो मोझॅक  व बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. तसेच अवकाळी पावसामुळे कापसाचे नुकसान होऊन उत्पादन घटले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलणे भाग आहे.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे कीपिक विमा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 91.62 कोटी रुपये प्राप्त होणे अपेक्षित होते. त्यापैकी केवळ 40.31 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले असून उर्वरित 51.31 कोटी रुपये पीक विम्याची रक्कम पिक विमा कंपन्यांकडून प्राप्त झालेली नाही. सद्यस्थितीत खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांची पेरणी सुरू झाली असून मागील पीक विमा रकमेची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सदर उर्वरित पीक विम्याचे रक्कम तातडीने जमा होण्यासंदर्भात पीक विमा कंपन्यांना निर्देशित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

यासोबतच दिलेल्या दुस-या निवेदनात श्री. मुनगंटीवार यांनी पीक विमा योजनेच्या थकीत रकमेची शेतकऱ्यांसाठी मागणी केली. या निवेदनात त्यांनी म्हटले किपंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र शासनामार्फत पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अनुदान म्हणून जमा केला जातो. तसेच महाराष्ट्र शासनामार्फत नमो किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सदर निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची कारवाई कृषी विभागामार्फत सुरू असूनयामध्ये शेतकऱ्यांचे ई-केवायसी करणेआधार प्रमाणीकरण करणे, जमीन नोंदणी करणे इत्यादी कामे अंतर्भूत आहेतपरंतु कृषी विभागामध्ये कमी मनुष्यबळ असल्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण होण्यास त्रास होत आहे. पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून कृषी विभागाने यासंदर्भात योग्य कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

सदर कामे करण्यास संगणक ऑपरेटरची  मदत घेणे अपेक्षित असून त्या मार्फत ही कामे करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना केली. या चर्चेला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि योग्य पावले उचलण्याची ग्वाही दिली.

०००००००

चंद्रपूरच्या कॅन्सर रुग्णालय निर्मितीसाठी मुद्रांक शुल्क माफ!


चंद्रपूरच्या कॅन्सर रुग्णालय निर्मितीसाठी मुद्रांक शुल्क माफ!

Ø पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Ø मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील सहकार्यांचे मानले आभार 

चंद्रपूर / मुंबईदि. 27 : चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात 100 बेडच्या कॅन्सर रुग्णालयाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असूनयासाठी चंद्रपूर कॅन्सर फाउंडेशन या संस्थेला मुद्रांक शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने 26 जून च्या बैठकीत घेतला आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाच्या निर्मिती कार्याला गती प्राप्त होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सांस्कृतिक कार्यवन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने टाटा हॉस्पिटलच्या सहकार्याने भव्य कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर येथे होऊ घातले आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्रीवैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आभार मानले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील व लगतच्या आदिवासीबहुल क्षेत्रातील कर्क रुग्णांवर सहज उपचार करता येईल, असे विशेष रुग्णालय चंद्रपूरला व्हावे अशी श्री मुनगंटीवार यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरु होता. राज्य शासनजिल्हा खनीज प्रतिष्ठानटाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून खासगी भागीदारी तत्वावर 100 खाटांचे कर्करोग रुग्णालय चंद्रपूरसाठी कॅन्सर केअर फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हाधिका-यांनी प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावात त्यांनी रुग्णालयासाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली 10 एकर जमीन 30 वर्षांसाठी प्रति वर्ष एक रुपया नाममात्र दराने भुईभाड्याने प्रदान केलेल्या जागेच्या करारनाम्यास  मुद्रांक शुल्क भरण्यापासून सूट देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

26 जून रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीचा अतिशय संवेदनशीलतेने विचार करूनमंत्रिमंडळाने हा विषय चर्चेला घेतला आणि कर्करोगाने ग्रस्त गरीबमध्यमावर्गीय नागरिकांसाठी शंभर खाटांच्या या रुग्णालय निर्मितीसंदर्भात निर्णय घेत मुद्रांक शुल्क माफ करण्याच्या निर्णयास मंजुरी प्रदान केली. सदर रुग्णालयाच्या जमिनीचे बाजार मूल्य मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी 15 कोटी 62 लक्ष 14 हजार 200  रुपये निश्चित केले असूनया बाजार मूल्याच्या एकूण 90% प्रमाणे 14 कोटी 5 लक्ष 92 हजार 800 रुपये या रकमेवर 5% दराने 70 लक्ष29 हजार 640 रुपये एवढा मुद्रांक शुल्क आजच्या मंत्रिमंडळ निर्णयामुळे माफ होणार आहे.

चंद्रपूर या आदिवासीबहुल जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तींना आरोग्यविषयक  सर्व अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने सातत्याने श्री. मुनगंटीवार यांचा प्रयत्न राहिला आहे. या संदर्भात ते म्हणाले की,  ज्या ज्या वेळी मी चंद्रपूर जिल्ह्यातील विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडले आहेतत्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गांभीर्याने विचार करून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लोकहिताच्या कामासाठी राज्य सरकार सातत्याने पुढाकार घेत असून  चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्माण कार्यासाठी व कर्करोग रुग्णालय निर्मितीसाठी  आजचा निर्णय अतिशय महत्वाचा आहे.

०००००

‘मिशन शिखर’च्या माध्यमातून एमएस-सीईटी मध्ये आदिवासी विद्यार्थांचे घवघवीत यश


‘मिशन शिखर’च्या माध्यमातून एमएस-सीईटी मध्ये आदिवासी विद्यार्थांचे घवघवीत यश

चंद्रपूर, दि. 27 : एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प कार्यालय,चंद्रपूर अंतर्गत प्रकल्प विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली 2023-24 या सत्रात शासकीय /अनुदानित व एकलव्य रेसिडेंशियल स्कुल वसतीगृह येथील विद्यार्थ्यांकरीता  ‘मिशन शिखर’ सुरु करण्यात आले. यामध्ये जेईईनीट/एमएससीईटी/नर्सिंग च्या विद्यार्थ्यांकरीता सराव वर्गाचे आयोजन करण्यात आले. नुकत्याच जाहीर झालेल्या एमएससीईटी च्या निकालात आदिवासी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून 40 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. 

मिशन  शिखर अंतर्गत जेईई प्रवेश परीक्षेत यापूर्वी पाच विद्यार्थी पात्र झाले.  तर एमएससीईटी करिता एकूण 60 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 40 विद्यार्थी पात्र ठरले. पीसीएम ग्रुपमधुन आचल विजय मेश्राम (शासकीय आश्रमशाळा, देवाडा) हिने 75.52 टक्के गुण, किरण मंगल कुळसंगे 68.47 टक्के गुण तसेच पलक पुरुषोत्त्म कुळमेथे (शासकीय कन्या आश्रमशाळा, बोर्डा) हिने 67.68 टक्के गुण घेऊन यश संपादन केले. तसेच पीसीबी ग्रुपमधुन अनुक्रमे पायल बबन पुगांटी (अनुदानित आश्रमशाळा, राजुरा) 71.43 टक्के गुण , अमित दामु हिचामी (अनुदानित आश्रमशाळा, राजुरा) 62.79 टक्के गुणअजित मंगरु वडे (अनुदानित आश्रमशाळा, गडचांदुर) 60.43 टक्के गुण घेऊन यश संपादन केले. नर्सिंगमध्ये आचल विजय मेश्राम 50.08 टक्के गुणरुपा रामु कोवे यांनी 45.17 टक्के गुण घेतले.

विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेकरीता प्रकल्प अधिकारी विकास राचेलवारशिक्षण विभाग, एकलव्य देवाडा येथील शिक्षक, तज्ज्ञ मार्गदर्शक तसेच शासकीय/ अनुदानित आश्रमशाळेतील विषय शिक्षक यांचे सहकार्य लाभले.  यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची निवड करण्यात आली होती. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सराव वर्गाचे वेळापत्रक तयार करून विद्यार्थांना एमएस-सीईटी अंतर्गत पीसीएम/पीसीबी चे सराव वर्ग दररोज  घेण्यात येत होते. तसेच जेईईनीट/एमएससीईटी/बी.एसस्सी नर्सिंग च्या पात्र विद्यार्थांचे प्रकल्प कार्यालयाच्या वतीने समुपदेशन सत्र घेण्यात आले.

या यशाबदल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यात प्रकल्प कार्यालयाच्या सहकार्याने आणखी यश मिळविण्याचा संकल्प विद्यार्थांनी केला आहे. तसेच चालू शैक्षणिक सत्रातसुध्दा मिशन शिखरच्या माध्यमातून माहे सप्टे.2024 पासून विद्यार्थांची प्रवेश पूर्व परिक्षेची तयारी करण्यात येणार आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार : प्रकल्प कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शाळेतील मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणुन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तर प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी डी.के.टिंगुसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.एस.बोंगीरवार यांनी तर संचालन पी.बी.कुतरमारे यांनी केले. यावेळी वाय.आर चव्हाणपी.पी.कुळसेगेएस.डी.श्रीरामे, श्री. दाभाडे व गृहपाल श्री. पोहाणे आदी उपस्थित होते.

००००००