Search This Blog

Wednesday 26 June 2024

जिल्हास्तरीय तपासणी समितीद्वारे जिल्ह्यातील बालगृहांना भेट


जिल्हास्तरीय तपासणी समितीद्वारे जिल्ह्यातील बालगृहांना भेट

            चंद्रपूरदि. 26 : महिला व बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय तपासणी  समितीने शासकीय मुलांचे बालगृह / निरीक्षणगृह, शासकीय मुलींचे बालगृह/ निरीक्षणगृह आणि महिला ‍विकास मंडळ  द्वारा संचलित किलबिल प्राथमिक बालगृह  दत्तक योजना येथे भेट दिली.

            जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत वरील तिनही बालगृह चालविल जात असून उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय तपासणी समितीद्वारे सदर तपासणी करण्यात आली. यावेळी  बालकांना मिळणाऱ्या सोयी सुविधाआरोग्य विषयक काळजीस्वच्छताजेवणाची सुविधा व गुणवत्तासमुपदेशन सेवादैनंदिन लागणाऱ्या वस्तु  आदी विषयी संस्थेच्या पदाधिका-यांसोबत चर्चा करून माहिती घेण्यात आली. याव्यतिरिक्त्त काही मदत लागल्यास किंवा काही अडचण असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय चंद्रपूरयेथे माहिती देण्यास सांगितले. जिल्हास्तरीय तपासणी समितीने जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत बालगृह विषयी माहिती पोहचवणे व जनजागृती करणे बाबत सुचना दिल्या.

            यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवारनायब तहसिलदार प्रियंका मानकरबालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲङ क्षमा बासरकरमनोविकृती तज्ज्ञ संदीप भटकरमानसोपचार तज्ज्ञ प्रियंका मूनजिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकरशशिकांत मोकाशेदिवाकर महाकाळकरप्रभावती मुठाळ, नंदा अल्लूरवारनिलेश जक्कुलवारहेमंत कोठारेअभिषेक मोहूर्ले आदी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment