Search This Blog

Thursday 20 June 2024

मतदार नोंदणी, दावे व हरकती स्विकारण्याकरिता 29 व 30 जून रोजी विशेष शिबीर

 

मतदार नोंदणी, दावे व हरकती स्विकारण्याकरिता

29 व 30 जून रोजी विशेष शिबीर

चंद्रपूरदि. 20 : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांचे मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे, मतदार यादीत नाव तपासणी करणे, आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे, स्थानांतरण करणे आदी करीता नागरिकांना / मतदारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी 29 व 30 जून 2024 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्र पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत वरीलप्रमाणे दावे व हरकती प्राप्त करून घेण्यासाठी 29 व 30 जून 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत विशेष शिबीर घेण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (राजूरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपूरी, चिमूर, वरोरा) यांना पत्राद्वारे सुचित केले आहे की, आपापल्या कार्यक्षेत्रात अधिनस्थ सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्र पर्यवेक्षक यांना, नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर शिबिराच्या कालावधीत उपस्थित राहून दावे व हरकती प्राप्त करण्याबाबत निर्देशित करावे.

तसेच या विशेष शिबिरात नवमतदारांनी नाव नोंदणी, यादी तपासणी, आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment