Search This Blog

Friday, 21 June 2024

जिल्हा न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन

 जिल्हा न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन

चंद्रपूर, दि. 21 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (प्रभारी) तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा सत्र न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

योगशिक्षक मिलिंद गिरी व लता चापले यांनी अनुलोमविलोम, प्राणायाम व विविध योग प्रात्यक्षिके करून दाखविली तसेच उपस्थितांकडून सदर आसने करून घेतली. यावेळी जिल्हा न्यायाधीश पांडुरंग भोसले, प्रवीण कुलकर्णी, आफताब पठाण, तुषार वाजे, ऋषिकेश हिंगणगावकर, उमाकांत शिंदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, नेहा गोरले, रमा कपिल, दीक्षा साहारे, हिना शुक्ला तसेच जिल्हा सरकारी वकील पी. जी. घट्टूवार, चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश मारलीवार, लोक अभीरक्षक कार्यालयाचे मुख्य अधिवक्ता विनोद बोरसे, अधिवक्ता महेंद्र असरेट, सर्व न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                              

००००००


No comments:

Post a Comment