बाल धोरण कृती आराखड्याबाबत हरकती व सूचना आमंत्रित
चंद्रपूर, दि. 7 : महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आली आहे. सदर समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 मसुदा तयार केला आहे.
सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा हा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाचे https://womenchild.
प्रस्तावित महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 च्या संदर्भाने नागरीकांच्या हरकती व सूचना दिनांक 30 जून 2024 रोजी सांयकाळी 6.15 वा. पर्यंत महिला व बाल विकास आयुक्तालय, २८ राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ, पुणे – 01 या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com या ईमेल वर पाठविण्यात याव्यात, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment