Search This Blog

Thursday 27 June 2024

मौखिक आरोग्य तपासणी व औषोपचार शिबीर

 



मौखिक आरोग्य तपासणी व औषोपचार शिबीर

चंद्रपूर, दि. 27 : राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गतजिल्हा सामान्य रुग्णालयातील दंत विभागाच्यावतीने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर झोन येथील घोसरी व किनाळा  येथे गावकऱ्यांकरिता मौखिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबिरामध्ये जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पिपरेयांनी मौखिक आरोग्याची घ्यावयाची काळजीतंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे होणारे दुष्परिणाम तसेच ज्यांना दात नाही, त्यांनी दाताची कवळी बसवून घ्यावे, याबाबत मार्गदर्शन केले. दंतचिकित्सक डॉ. दीपशिखा मुसळे  यांनी कशाप्रकारे दातांची काळजी घ्यावी व कीड लागल्यास कशाप्रकारे त्यावर उपचार केल्या जाते, याबाबत मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनानंतर घोसरी येथील 81 गावकऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण 56 लोक तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणारे तसेच फ्लोरोसिसचे 2 मुले आढळले. किनाळा येथील 24 गावकऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 5 लोक ही तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणारे तसेच फ्लोरोसिसचे 9 मुले आढळले. सदर शिबिरामुळे गावकऱ्यांना त्यांच्या राहते ठिकाणी तपासणी व औषधोपचार मिळाल्यामुळे शिबिराचा लाभ घेतला.

सदर शिबिरामध्ये दंतचिकित्सक डॉ.सुप्रिया वाघमारे,  डॉ प्रणय तुमसरेसमुपदेशक मित्रांजय निरंजने,  दंत सहाय्यक सचिन जुमडे उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment