Search This Blog

Thursday 13 June 2024

बालगृहात व्यक्तिमत्व विकास शिबीर व मार्गदर्शन


बालगृहात व्यक्तिमत्व विकास शिबीर व मार्गदर्शन

चंद्रपूर, दि. 13 - शिक्षण विभाग व पोलीस विभागाद्वारे स्वामी विवेकांनद बालगृह,राजुरा येथे व्यक्तिमत्व विकास शिबीर व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन करण्यात आले.

            जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयचंद्रपुर अंतर्गत जिल्हयात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार शासकीय व स्वयंसेवी बालगृहामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके जसे अनाथबेवारसपरित्यागीतहरविलेलेबालकांना बाल कल्याण समितीचंद्रपूर यांचे आदेशान्वये दाखल करण्यात येते. बालकांना आता उन्हाळी सुट्टया लागल्या असून या वेळामध्ये बालकांना प्रत्येक आठवडयातून दोन ते तिन दिवस व्यक्तिमत्व  विकास कार्यक्रमसुप्त गुणांना चालना देणारे कार्यक्रमकला कार्यानुभव विषयक मार्गदर्शन मिळाले तर बालकांचे विषयातील अडचणी कमी होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढेल. तसेच त्यांचा वेळ योग्य कामासाठी उपयोगी पडेल यासाठी शिक्षण विभागाला विनंती करण्यात आली होती.

            त्यानूसार स्वामी विवेकांनद बालगृहराजुरा येथे राजुराचे गटशिक्षणाअधिकारी मनोज गौरकरशिक्षण विस्तार अधिकारी संजय हेडाऊविशेष साधन व्यक्ती राकेश रामटेके यांनी प्रवेशित मुलांना व्यक्तिमत्व विकासअभ्यास कसे करावे या बाबत मार्गदर्शन केले. मनोज गौरकर यांनी मुलांना लागणारे पूर्ण शालेय साहित्य व शिक्षणाकरीता इतर साहित्य लागल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयराजुरा येथुन मोफत पुरविण्यात येईल व प्रवेशित मुलांना इंग्लीश स्पीकिंग, संगीत, चित्रकला क्लासेसखेळांचे कोचिंग व अडचणी आलेल्या विषयाचे मोफत कोचिंग देण्यात येईल, असे सांगितले.

होमगार्ड तथा शारिरीक शिक्षक मार्गदर्शक नागेश जाधव यांनी मुलांना पोलिस भर्तीसाठी फिजीकल करीता मोफत प्रशिक्षण देणार असे सांगितले.  पोलिस उपनिरीक्षक नरेश उरकुडे यांनी मुलांना पोलिस भर्ती व स्पर्धा परिक्षा बाबत मार्गदर्शन  केले. शिक्षण विभागामार्फत असे शिबीर चंद्रपूर जिल्हयाचे इतर बालगृहात गटशिक्षणाधिकारी कार्यालय मार्फत घेण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल  संरक्षण अधिकारी अजय आर साखरकरप्रिती उंदिरवाडेसचिंद्र नाईकभाऊराव बोबडेप्रविण गेडाम आदी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment