Search This Blog

Sunday, 10 February 2019

मिशन सेवा सराव परिक्षा नोंदणीसाठी ऑनलाईन नोंदणी शेवटची तारीख 10 फेब्रुवारी


पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक व विक्री कर निरीक्षक पदासाठी सराव

      चंद्रपूर, दि.05 फेब्रुवारी  राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हयातील मुलांचा सरकारी नोकरीमध्ये टक्का वाढण्यासाठी सुरु झालेल्या अभियानातंर्गत दुस-या सराव परिक्षेला 26 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. यासाठी हॅलो चांदा या ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. शेवटची तारीख 10 फेब्रुवारी आहे.
पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक व विक्री कर निरीक्षक पदासाठी सराव सत्र आयोजित करण्यात आले असून या परिक्षेवर लक्ष केंद्रीत केलेल्या विद्यार्थ्यांनी या सराव परिक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी मर्यादित असून या काळात नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना 24 फेब्रुवारी, 3 मार्च, 10 मार्च व 17 मार्च या काळामध्ये सराव परिक्षा देता येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी अवघे 5 दिवस बाकी आहे.  या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सामान्य ज्ञान या विषयावर 11 ते 12 या वेळेत एक तासांचा पेपर सोडवून घेतला जाणार आहे. त्यानंतर 12.30 नंतर व्हिडीओ एक्सप्लेनेशन दिले जाणार आहे. त्यामुळे तज्ञ व्यक्तीकडून सेट करण्यात आलेल्या या सराव परिक्षांचा लाभ मुलांनी घ्यावा. तसेच त्यानंतरच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ सुध्दा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या परिक्षेसाठी यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना देखील पुन्हा नोंदणी गरजेचे आहे. हॅलो चांदा ॲपवर या संदर्भातील माहिती आपल्याला मिळणार आहे. याशिवाय https://goo.gl/forms/cZAG1s3w0QhCG8df1 या संकेतस्थळावर भेट देता येईल. याशिवाय मिशन सेवा संदर्भात कुठलीही अडचण असल्यास या उपक्रमाच्या सयोजक स्नेहा मेघावत यांच्याशी  मिशनसेवा18ॲटदीरेटजीमेलडॉटकॉम (missionseva18@gmail.comया ई-मेलवर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment