पालकमंत्र्यांनी घेतला 21 विभागांचा आढावा
चंद्रपूर दि.13 फेब्रुवारी : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध योजनेतून सर्वाधिक घरे जनतेला मिळेल यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजनेच्या अंमलबजावणी व पाठपुरवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कोणत्याही परिस्थितीत आवास योजनेमध्ये चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक घरे बांधणारा जिल्हा झाला पाहिजे, यासाठी कामाला लागावे असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिले.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये पालकमंत्री यांच्या नेतृत्वात 21 विविध विभागावर आज चर्चा करण्यात आली. सकाळी बारा वाजता या चर्चेला सुरुवात करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना शहरी या योजनेवर प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीत बोलताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शहरे उत्तमरीत्या पुढील काळात उभी राहावीत यासाठी या आवास योजनेचा कल्पकतेने विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये पालकमंत्री यांच्या नेतृत्वात 21 विविध विभागावर आज चर्चा करण्यात आली. सकाळी बारा वाजता या चर्चेला सुरुवात करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना शहरी या योजनेवर प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीत बोलताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शहरे उत्तमरीत्या पुढील काळात उभी राहावीत यासाठी या आवास योजनेचा कल्पकतेने विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या बैठकीला आमदार नानाभाऊ शामकुळे, ॲड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त संजय काकडे,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, स्थाई समितीचे सभापती राहुल पावडे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर. वायाळ यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दुपारी बारा वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सकाळच्या सत्रात प्रधानमंत्री आवास योजना शहरी याबाबत आढावा घेताना त्यांनी आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे व मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी चर्चा केली. शहरात मोठ्या प्रमाणात आवास योजनेतून घरे देताना नदीच्या पात्रातील नागरिकांचे देखील पुनर्वसन महत्त्वाचे आहे. त्यामुळे चांगल्या जागेत घरे देण्यासाठी असणा-या अडचणी व त्यासंदर्भात काय उपाययोजना करता येईल यासाठी एका उच्चस्तरीय समितीचे गठण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यासंदर्भात लवकरच बैठक घेत असल्याचे सुद्धा सांगितले. याशिवाय कोणते आरक्षण हटवता येते व त्यासाठी कोण कोणत्या विभागाची आवश्यक परवानगी घ्यावी लागेल. या संदर्भातही अभ्यास करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. झरपट नदीच्या पात्रातील अवैध घरांच्या बाबतीत यावेळी चर्चा झाली.
प्रधानमंत्री आवास योजने मध्ये वेगवेगळ्या घटकांमधून अनेक नवनवीन योजना पुढे आल्या आहेत. नागरिकांना उत्तम घरे देण्याची ही संधी आहे. त्यामुळे जनतेच्या हिताकडे अधिक लक्ष देऊन याबाबतचा आराखडा तयार करण्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
कायदा हातात घेणार्यांवर कडक कारवाई करा
तत्पूर्वी पोलीस सारथी योजनेचा आढावा आज घेण्यात आला. जिल्हाभरात शाळा-कॉलेजेसमध्ये योग्य पद्धतीचा संदेश सर्वांना जाईल, अशी प्रचार यंत्रणा राबविण्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.
गरज भासल्यास कॉल सेंटर आणखी उघडण्यात यावे, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांच्या सुरक्षा संदर्भात अतिशय काटेकोरपणे या योजनेची अंमलबजावणी व्हावी, असे यावेळी त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांना सांगितले. शहरातील काही भागांमध्ये असामाजिक तत्त्वांचा टोळ्या स्टंटबाजी करण्यामध्ये सक्रिय झाल्याचे यावेळी अनेक समितीच्या सदस्यांनी लक्षात आणून दिले. यावर अशा घटकांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
तत्पूर्वी पोलीस विभागाच्या पुढाकाराने व आदिवासी प्रकल्प विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी मुलामुलींना महाराष्ट्र दर्शन घडविण्यात आले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या या महाराष्ट्र दर्शन कार्यक्रमाची सांगता पालकमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांचे प्रवासाबद्दलचे अनुभव सुद्धा ऐकले. जिल्हा माहिती कार्यालयाच्या विविध साहित्याचे प्रकाशन देखील या बैठकीत करण्यात आले.
No comments:
Post a Comment