Search This Blog

Monday 25 October 2021

युवा शक्ती होणार लसीकरणाने संरक्षित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेचे आयोजन

 


युवा शक्ती होणार लसीकरणाने संरक्षित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेचे आयोजन

चंद्रपूर, दि. 25 ऑक्टोबर: जिल्ह्यातील महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन 18 वर्षावरील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 चे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनामार्फत 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मिशन युवा स्वास्थ्य  मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे.

मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत महाविद्यालयामध्ये कोविड-19 लसीकरण विशेष सत्राचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये महाविद्यालयीन 18 वर्षावरील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकही डोस घेतला नसल्यास, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे व दुसरा डोससाठी पात्र आहे. अशांना दुसरा डोज देण्यात येईल. जे विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन लस घेऊ शकतात त्यांनी महाविद्यालयातून लस घ्यावी. किंवा घराजवळील लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात.

18 वर्षावरील सर्व नागरिकांनी मोफत कोविड-19 लसीकरण करून घेत संभाव्य तिसऱ्या लाटेपासून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, तसेच ही लसीकरण मोहिम 100 टक्के पूर्ण करून मिशन युवा स्वास्थ ही मोहिम यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment