Search This Blog

Wednesday 13 October 2021

(सुधारीत दौरा) पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 


(सुधारीत दौरा)

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि. 13 ऑक्टोबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दि. 13 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 8.30 वाजता दुर्गामाता मंदिर संस्थान, मूल येथे आगमन व सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन तसेच कोरोना योद्धा गौरव सोहळा कार्यक्रमास उपस्थित. रात्री 9.30 वाजता मूल येथून नागपूरकडे प्रयाण.

शनिवार दि. 16 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व सिंदेवाही शहरातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक व नगर पंचायतीच्या विकास कामांबाबत चर्चा. दुपारी 12.30 वाजता सिंदेवाही येथून सावलीकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता सिंचाई विश्रामगृह, सावली येथे आगमन व शहरातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक व नगर पंचायतीच्या विकास कामांबाबत चर्चा. दुपारी 3 वाजता सावली येथून ब्रम्हपुरीकडे प्रयाण. सायंकाळी 4 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे ब्रह्मपुरी शहरातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक व नगर परिषदेच्या विकास कामांबाबत चर्चा. सायंकाळी 7 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

No comments:

Post a Comment