Search This Blog

Saturday 23 October 2021

शनिवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 1 बाधित

 शनिवारी जिल्ह्यात कोरोनामुक्त, 1 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 25

चंद्रपूरदि. 23 ऑक्टोबर : गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात शनिवारी मृत्यू संख्या शून्य आहे .

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसारबाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर येथे 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर महानगरपालिका  क्षेत्र,  भद्रावती,  बल्लारपूरब्रम्हपुरीनागभीडसिंदेवाहीमुलसावलीपोंभूर्णागोंडपिपरीराजूराचिमूरवरोरा,  कोरपनाजिवती व इतर  ठिकाणी बाधित रुगांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 802 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 235 झाली आहे. सध्या 25  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत लाख 26 हजार 13 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी लाख 35 हजार 885 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment