Search This Blog

Thursday 18 November 2021

ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

 

ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Ø पोटनिवडणूक असलेल्या संबंधित ग्रामपंचायतीमध्ये दि. 17 नोव्हेंबर पासून आदर्श आचार संहिता लागू

चंद्रपूर दि.18 नोव्हेंबर : राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक 17 नोव्हेंबर 2021 च्या पत्रानुसार रिक्त असलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम प्राप्त झाला आहे. पोटनिवडणूक असलेल्या संबंधित ग्रामपंचायतीमध्ये दि. 17 नोव्हेंबर 2021 पासून आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक 22 नोव्हेंबर 2021 आहे. तर नामनिर्देशन पत्र मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी मंगळवार दि. 30 नोव्हेंबर ते सोमवार दि.6 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील.

नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ नमुना अ-अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी मंगळवार, दि. 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजतापासून ते छाननी संपेपर्यंत राहील. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ नमुना अ-अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी गुरुवार, दि. 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहील.

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी गुरुवार दि, 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेनंतर राहील. आवश्यक असल्यास मतदान मंगळवार, दि. 21 डिसेंबर 2021 रोजी राहील. मतमोजणी करण्याचा दि. 22 डिसेंबर 2021 राहील. तसेच मतमोजणी ठिकाण व वेळ जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या मान्यतेने तहसीलदार यांनी निश्चित करण्याबाबत कळविण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक  सोमवार,27 डिसेंबर 2021 राहील. ग्रामपंचायत पोटनिवडणूक असलेल्या रिक्त पदांची माहिती संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे असे चंद्रपूर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

00000


No comments:

Post a Comment