19 आणि 20 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 03 : जिल्ह्यातील 15 ते 29 या वयोगटातील सर्व युवक युवतींसाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 19 व 20 नोव्हेंबर 2026 रोजी सांस्कृतिक सभागृह, नगर परिषद, बल्लारपुर येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
युवा महोत्सवातील प्रमुख बाबी : विकसीत भारत जिल्हा स्तर सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत लोकनृत्य, लोकगीत, पथनाट्य, कविता लेखन आणि चित्रकला यांचा समावेश राहील. समुह लोकनृत्याकरीता प्रथम पारितोषिक 7 हजार, द्वितीय 5 हजार आणि तृतीय पारितोषिक 3 हजार रुपये, समुह लोकगीताकरीता प्रथम पारितोषिक 5 हजार, द्वितीय 3 हजार आणि तृतीय अडीच हजार रुपये, पथनाट्यकरीता प्रथम पारितोषिक 5 हजार, द्वितीय 3 हजार आणि तृतीय अडीच हजार, कविता लेखनकरीता प्रथम पारितोषिक 3 हजार, द्वितीय 2 हजार आणि तृतीय दीड हजार रुपये तर चित्रकलाकरीता प्रथम पारितोषिक 3 हजार, द्वितीय 2 हजार आणि तृतीय दीड हजार रुपये आहे.
येथे करा नोंदणी : क्रीडा अधिकारी नंदू अवारे (मो. 9561226446), मोरेश्वर गायकवाड (मो. 9423673232) आणि क्रीडा मार्गदर्शक प्रतिक पाटील (मो. 8007765955) तसेच dsochandrapur01@gmail.com या मेल आयडीवर नोंदणी करावी. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे दिनांक 18 नोव्हेंबर 2026 च्या सांयकाळी 5.45 वाजेपर्यत नावे नोंदवावी
नावे नोंदवितांना पूर्ण नाव, मो.क्र., जन्मतारखेचा पुरावा, पूर्ण पत्ता व कलाप्रकार यांचा समावेश करावा. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी व्हावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी कळविले आहे.
०००००००

No comments:
Post a Comment