Search This Blog

Thursday, 2 April 2020

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज:आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना


चंद्रपूर,दि.1 एप्रिल: कोरोना (कोविड -19) विरुद्ध लढा देण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आणखी गती देण्यासाठी आणि  डॉक्टरआरोग्य सेवेतील कामगारांना त्यांचे कल्याण शासनाचे प्राधान्य आहे याची हमी देण्यासाठीकेंद्र सरकारने "प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज" जाहीर केले.
या पॅकेज नुसार कोरोना (कोविड -19) च्या लढाईसाठी काम करणाऱ्या आरोग्य कामगारांसाठी विमा योजना आहे90  दिवसांसाठी 50 लाख रुपयांचा विमा संरक्षण 22.12 लाख  सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवणाऱ्यासमुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांसहज्यांचा थेट संपर्क असू शकतो आणि कोरोना (कोविड -19)  रूग्णांची काळजी आणि ज्याचा  परिणाम होण्याचा धोका असू शकतो.  तसेचअभूतपूर्व परिस्थितीमुळेखासगी रूग्णालयातील कर्मचारीसेवानिवृत्त, स्वयंसेवकस्थानिक शहरी संस्था, करार, दैनंदिन वेतन, आउटसोर्स कर्मचारीराज्ये, केंद्रीय रुग्णालयेकेंद्र, राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या स्वायत्त रुग्णालयेएम्स आणि  कोविड-19 संबंधित जबाबदाऱ्यांसाठी एआयआयएमएस, एएनआय केंद्रीय मंत्रालयांची रुग्णालये तयार केली जाऊ शकतात. ही देखील विमा योजनेंतर्गत येतील.
30 मार्च2020 पासून न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड द्वारा प्रदान करण्यात येईल.  हे  विमा संरक्षण 90 दिवसांसाठी उपलब्ध असेल. अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सचिव आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार  प्रीती सुदन यांनी दिली आहे.
000000

परराज्यातील नागरिक व कामगारांसाठी जिल्हा व तालुका स्तरावर निवारा गृह



जिल्हा प्रशासनाकडून विशेष काळजी
चंद्रपूर,दि. 1 एप्रिल: कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी देशभर लॉगडाऊन आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये बाहेर राज्यातून अडकून पडलेले नागरिक व कामगार मोठ्या प्रमाणात आहे. यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने राहण्याची व्यवस्था केली आहे.
बाहेर राज्यातून अडकून पडलेले नागरिककामगार,मजूर यांनी कोणताही प्रवास न करता महानगरपालिकानगरपालिकाग्रामपंचायत तसेच जिल्हास्तरावर सुरू करण्यात आलेल्या शेल्टर हाऊस अर्थात निवारा गृहामध्ये राहण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर 2000 नागरिकांची क्षमता असलेले एकूण 33 निवारा गृह तयार करण्यात आले आहे. या निवारा गृह मध्ये राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहरांमध्ये लक्ष्मीनारायण मंदिर येथे 1 हजार नागरिकांची क्षमता असलेले कम्युनिटी किचन सुरु केले आहे.
याठिकाणी आहेत निवारा गृह:
चंद्रपूर तालुक्यातील महाकाली मंदिर येथे 200 नागरिकांसाठी निवारा गृह तयार केले आहे. मनपा शाळा जटपुरा गेट येथे 20 नागरिकांसाठीगंज वॉर्ड चंद्रपूर येथील रात्र निवारा येथे 20 नागरिकांसाठीरामचंद्र नागेर हिंदी शाळा जेटपुरा येथे 20 नागरिकांसाठीसरदार पटेल प्रायमरी स्कूल जेटपुरा येथे 25 नागरिकांसाठीलोकमान्य टिळक कन्या प्रायमरी स्कूल पठाणपुरा येथे 20 नागरिकांसाठीकर्मवीर प्रायमरी स्कूल बंगाली कॅम्प येथे 10 नागरिकांसाठीभारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर स्कूल आंबेडकर नगर येथे 25 नागरिकांसाठीसरदार पटेल कन्या शाळा नगीना बाग येथे 20 नागरिकांसाठीमहाकाली कन्याशाळा येथे 15 नागरिकांसाठी ‌ निवारा गृह तयार करण्यात आले आहेत.
बल्लारपूर तालुक्यातील राइनबसेरा नगर परिषद बचत भवन येथे 75 नागरिकांसाठी,राजुरा तालुक्यातील झाकीर हुसेन प्रायमरी स्कूल व सम्राट अशोक हायस्कूल देवाडा येथे 220 नागरिकांची क्षमता असलेल्या निवारा गृहाची स्थापना करण्यात आली आहे.
कोरपना तालुक्यातील भाऊराव कटप आश्रम शाळा कोरपना व जिल्हा परिषद शाळा गडचांदूर येथे 85 नागरिकांची क्षमता असलेले,जिवती तालुक्यातील फॉरेस्ट रेस्ट हाऊस येथे 50 नागरिकांची क्षमता असलेले निवारा गृह तयार करण्यात आले आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील गर्ल्स स्कूल व कन्यका मंदिर येथे 65 नागरिकांची क्षमता असलेले,पोंभुर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा येथे 100 नागरिकांची क्षमता असलेले निवारा गृह तयार करण्यात आले आहे.
मुल तालुक्यातील पीडब्ल्यूडी रेस्ट हाउस येथे 250 नागरिकांची क्षमता असलेले,सावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 80 नागरिकांची क्षमता असलेले निवारा गृह तयार करण्यात आले आहे.
नागभीड तालुक्यातील गव्हर्मेंट रेस्ट हाऊस व जनता विद्यालय येथे 100 नागरिकांची क्षमता असलेले,ब्रह्मपुरी तालुक्यातील पंचायत समिती व राजीव गांधी भवन येथे 100 नागरिकांची क्षमता असलेले निवारा गृह तयार करण्यात आले आहे.
चिमूर तालुक्यातील शहीद रायपूरकर सभागृहकॅनेल वसाहत जवळबोडी व जिल्हा परिषद शाळा उसेगाव येथे 150 नागरिकांची क्षमता असलेले निवारा गृह तयार करण्यात आले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील पीडब्ल्यूडी रेस्ट हाउसआर.एच सिंदेवाही येथे 100 नागरिकांची क्षमता असलेले,वरोरा तालुक्यातील भारत भूषण मालवीय प्रायमरी स्कूल व इंदिरा गांधी प्रायमरी स्कूल येथे 125 नागरिकांची क्षमता असलेले निवारा गृह तयार करण्यात आले आहे.
भद्रावती तालुक्यातील गव्हर्नमेंट गर्ल्स हॉस्टेल येथे  125 नागरिकांची क्षमता असलेले निवारा गृह तयार करण्यात आले आहे.

प्रत्येक महिन्यात त्याच महिन्याचे धान्य वितरण होणार : राजेंद्र मिस्कीन

चंद्रपूर,दि.2 एप्रिल: चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना याद्वारे सुचित करण्यात येते कीशासन आदेश दिनांक 19 मार्च 2020 अन्वये माहे एप्रिलमे व जून -2020 या 3 महिण्याचे धान्य माहे एप्रिल मध्ये एकाच वेळी देण्याचे निर्देश दिले होते.
परंतुपुढील 3 महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटप करावयाचे असल्याने 3 महिन्याचे धान्य वाटपाच्या कार्यवाहीत बदल करण्यात आलेला असुन नव्याने राज्य शासनाकडुन दिनांक 31 मार्च 2020 रोजी प्राप्त निर्देशानुसार माहे एप्रिल-2020 मध्ये फक्त माहे एप्रिल महिण्याचे धान्य वितरीत केले जाणार आहे.
हे धान्य वितरीत झाल्यानंतर माहे एप्रिल- 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ( ज्यांचेकडे अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेची शिधापत्रिका (रेशनकार्ड) आहे असे) प्रति मानसी 5 किलो तांदुळ मोफत वाटप केले जाणार आहे.
जे लाभार्थी विकतचे धान्य घेतील अशाच शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य वाटप केल्या जाईल याची सर्व शिधापत्रिका धारकांनी नोंद घ्यावी. अंत्योदय योजनेच्या कार्ड धारकांना सुध्दा त्यांचे शिधापत्रिकेत जेवढया व्यक्ती समाविष्ट आहेत त्या प्रत्येक व्यक्तीसाठी 5 किलो तांदुळ दिले जाईल.
ही योजना माहे एप्रिलमे व जुन-2020 या 3 महिण्यापुरतीच मर्यादीत राहील. याची चंद्रपुर जिल्हयातील सर्व अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेचे लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. लाभार्थ्यांनी त्यांना नेमुन दिलेल्या रास्तभाव दुकानातुनच दोन्ही योजनेच्या धान्याची उचल करावी. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी केले आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणु (कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासुन लागू केलेला असुन त्यानुषंगाने चंद्रपूर जिल्हयात फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये मनाई आदेश काढण्यात आलेला असल्यामुळे शिधापत्रिका धारकांनी रास्तभाव दुकानातुन धान्य घेतेवेळी दुकानात एका वेळेस 2 व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती हजर राहणार नाहीत तसेच 2 ग्राहकांमध्ये मीटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी. सदर आदेशाचा भंग झाल्यास संबंधीतांविरुध्द कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
00000

Wednesday, 1 April 2020

महसूल कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

चंद्रपूर,दि. 1 एप्रिल: राज्यामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतच आहे.यासाठी राज्यातील सरकारी यंत्रणा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस-रात्र लढा देत आहे.या लढ्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल कर्मचारी आपल्या नेतृत्वात सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव ठेवून जनतेची सेवा देण्यासाठी दिवस-रात्र व्यस्त राहून कामकाज करीत आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या उपाययोजनेसाठी सहभाग म्हणून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना जिल्हा शाखा चंद्रपूर कडून जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांचे 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
माहे एप्रिल 2020 चे  वेतनातून जिल्ह्यातील सर्व पदोन्नत नायब तहसीलदारअव्वल कारकूनकनिष्ठ लिपिक यांचे एक दिवसाचे वेतन कोरोना लढा निधी म्हणून देणार आहे.
शिपाई संवर्गातील कर्मचारी बांधव याकामी संमती देत असल्यास इच्छुक मदतीचे आवाहन देखील चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू धांडे यांनी केले आहे.
स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनांतर्गत केले जात आहे. मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. यामध्ये धनादेश,डीडी अथवा ऑनलाईन निधी देऊ शकता.
या खात्यामध्ये जमा करता येणार मदत :
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19,बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया,मुंबई मुख्य शाखाफोर्टमुंबई 400023,शाखा कोड 00300 आयएफएससी कोड SBIN0000300 या खात्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी मदत करता येणार आहे. सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (जी) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

00000

घरातच रहा...पुढचे 14 दिवस आणखी महत्त्वाचे : जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार

कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज
Ø  जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø  आतापर्यंत 123 प्रवासी कॉरेन्टाईन मुक्त
Ø  परदेशातून आलेले 32 प्रवासी सध्या निगराणी मध्ये
Ø  दिल्लीवरून आलेल्या 39 प्रवाशांच्या यादीचा पाठपुरावा सुरू
Ø  प्रत्येक तालुक्यात आपातकालीन प्रशिक्षण सुरू
Ø  33 शेल्टरहोम मध्ये बाहेर राज्यातील 3700 नागरिक
Ø  आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरु
Ø  आपात्कालीन परिस्थितीत दुध पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश
Ø  कॉरेन्टाइन करणे ही प्रतिबंधात्मक उपाययोजना
Ø  रेशन कार्डवर विकतचे अन्य धान्य घेणाऱ्यांना 5 किलो तांदूळ मोफत
Ø  निजामुद्दीन दर्ग्यातील कार्यक्रमात सहभागी झालेला एकच व्यक्ती
चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : 31 मार्च च्या पहिल्या टप्प्यातून आता दुसऱ्या टप्प्याकडे आपण वळत असून या काळात अधिक रुग्ण मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शासनाकडून देण्यात येणाऱ्या या निर्देशांचे पालन करावे व घरातून बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.
        जिल्ह्यात आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसून सध्या फक्त 32 प्रवासी निगराणी मध्ये आहे. सर्वांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून नागरिकांनी आता तिसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला अलिप्त ठेवणे महत्त्वाचे असून फारच अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हजरत निजामूद्दीन परीसरात गेल्या काही दिवसात आढळून आलेल्या 39 नागरीकांची यादी प्राप्त झाली आहे.यासर्व व्यक्तींशी संपर्क साधला असून यामधील एकाच व्यक्तीने दर्ग्यातील मरगजमध्ये सहभाग घेतला आहे.इतर व्यक्ती केवळ प्रवासी आहेत.त्यांचा मरगजशी संबंध नाही ज्या एका व्यक्तीचा संबंध आहे त्याला कॉरेन्टाईन करण्यात आले आहे.
      जिल्ह्यामध्ये 33 शेल्टर होम मध्ये 3700 वेगवेगळ्या राज्यातील नागरिक आश्रयाला आहेत. या सर्वांच्या खानपानापासून तर राहण्यापर्यंतची व्यवस्था जिल्ह्यातील विविध भागात करण्यात आली आहे. या सर्व नागरिकांनी कोणतीही काळजी न करता पुढील आदेशापर्यंत आपल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करु नयेअसे आवाहन त्यांनी केले.
      जिल्ह्यात विपुल प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध असून स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत येणाऱ्या मदतीला जिल्ह्यामध्ये महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत वितरण केले जात आहे. हे वितरण केवळ निराश्रित, बेघर, विमनस्क व ज्यांच्याकडे कोणताच आधार नाही अशा लोकांसाठी आहे. या भोजन व्यवस्थेचा लाभ गरीब गरजू आणि निराधार लोकांनाच मिळाला पाहिजे याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
       जिल्ह्यातील नागरिकांना अन्नधान्य देण्यासंदर्भात राज्य शासनाकडून 31 मार्च रोजी नवीन निर्देश प्राप्त झाले आहे. या निर्देशानुसार माहे एप्रिल 2020 मध्ये फक्त माहे एप्रिल महिन्याचे धान्य वितरित केले जाणार आहे. हे धान्य विकत घेणाऱ्या नागरिकांनाच याच एप्रिल महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत ज्यांच्याकडे अंतोदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेची शिधापत्रिका आहे अशा लोकांना प्रतिमानसी 5 किलो तांदूळ मोफत वाटप केले जाणार आहे. जे लाभार्थी विकतचे धान्य घेतील अशाच शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप केल्या,जाईल याची सर्व शिधापत्रिकाधारकांनी नोंद घ्यावीअसे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
        शिधापत्रिकेवरील अन्नधान्य घेताना एकाच वेळेस 2 पेक्षा जास्त व्यक्ती हजर राहणार नाही तसेच 2 ग्राहकांमध्ये 1 मीटरचे अंतर राहील याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
        दरम्यान, जिल्हा प्रशासनाने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दुचाकी गाड्या बाहेर पडायला लागल्यामुळे नागरिकांना आता दुचाकी गाडी सुद्धा चालविण्यासाठी परवानगी घेण्याचे निर्देश दिले आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनाच फक्त संबंधित पोलिस ठाण्याच्या  अधिकाऱ्याच्या पासेस वर परवानगी मिळणार आहे. त्यामुळे घराबाहेर दुचाकी सुद्धा घेऊन पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बँकेतील गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सींग राखली जाईल यासाठी पीएम किसान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात वर्गकरण्यासंदर्भात  बँक आता लाभार्थ्यांना एसएमएस'द्वारे माहिती देणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची बँकेतील गर्दी टाळल्या जाईल.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे तालुकास्तरावर प्रशिक्षण सुरू:
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे तालुकास्तरावर प्रशिक्षण सुरू आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत हे प्रशिक्षण आशा वर्कर पासून तर आरोग्य उपकेंद्रात प्राथमिक केंद्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे.
00000