व्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि.10 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय वसतिगृहाकरीता सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.
जिल्ह्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर लवकरात लवकर ऑनलाईनरित्या अर्ज नोंदणी करावे तसेच सदर अर्जाची प्रत संपूर्ण कागदपत्रासह संबंधित वसतिगृह कार्यालयामध्ये सादर करावी. जे विद्यार्थी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करणार नाहीत व वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहिल्यास त्याला विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील.
अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर व वसतिगृह कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.
००००००

No comments:
Post a Comment