21 ऑगस्ट रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
चंद्रपूर,दि. 19 : जिल्हयातील 10 वी, 12 वी, पदविका, पदवी इत्यादी युवक व युवतींकरीता विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच जिल्हातील उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या हेतूने, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रच्या वतीने 21 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, चंद्रपूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येत आहे.
तरी प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी दोन प्रती) उपस्थित राहावे. तरी अधिक माहीतीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दुरध्वनी क्रमांक 07172-252295 येथे संपर्क करावा. जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये भाग घेण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in/ https://www.cmykpy.mahaswayam.
००००००

No comments:
Post a Comment