पालकमंत्र्यांच्या हस्ते 9.05 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम
चंद्रपूर, दि. 13 : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शनिवार, दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.05 वाजता होणार आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. वुईके जनतेला उद्देशून संबोधित करतील. यानंतर त्यांच्या हस्ते, उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.
००००००

No comments:
Post a Comment