डॉ. आंबेडकर वैद्यकीय सहाय्यता योजना
चंद्रपूर, दि. 21 : डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान (सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार) मार्फत, अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) घटकांतील गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी ‘डॉ. आंबेडकर वैद्यकीय सहाय्यता योजना’ राबविली जात आहे. सन 2026 मध्ये या योजनेत सुधारणा करून पात्र आजार व आर्थिक मदतीची मर्यादा वाढविण्यात आली आहे. ज्यांची कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रु. 5 लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे, ते या योजनेस पात्र आहे.
यात हार्ट सर्जरी - 1.50 लक्ष, किडनी सर्जरी / डायलीसीस – 3.50 लक्ष, कॅन्सर / सर्जरी / केमोथेरेपी / रेडिओथेरेपी – 2.50 लक्ष, ब्रेन सर्जरी- 2 लक्ष, किडनी / ऑर्गन ट्रान्सप्लॅन्ट- 3.50 लक्ष, स्पिनल सर्जरी- 1.50 लक्ष आणि इतर जीवघेणे आजारासाठी 2 लक्ष रुपयापर्यंत मदत करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment