मॅट्रिकपूर्व शिष्यवृतीकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
चंद्रपूर, दि. 19 : जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर कार्यालयामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाडीबीटी 2.0 या नविन प्रणालीवर शासनामार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याने, अचूक माहिती अर्जामध्ये भरावी
महाडीबीटी 2.0 पोर्टलद्वारे ऑनलाईन राबविण्यात येणाऱ्या योजना : साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणा-या पालकांच्या पाल्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, इ. 9 ते इ. 10 वी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती (अनुसूचित जाती), महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (परीक्षा फी /शिक्षण फी) (अनुसुचित जाती), इ. 5 ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई शिष्यवृत्ती (अनुसूचित जाती), माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना (गुणवत्ता) शिष्यवृत्ती (अनुसूचित जाती).
शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपरोक्त शिष्यवृत्ती करिता लागणारे कागदपत्रे विद्यार्थ्यांकडुन जमा करण्यात यावे. उदा. जात प्रमाणपत्र, बीपीएल दाखला, वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र व योजने संबंधित आवश्यक कागदपत्रे तपासुन पोर्टलमध्ये काळजीपूर्वक भरावी.
महाडीबीटी 2.0 पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शाळांना सूचना : https://mahadbt2.maharashtra.
अधिक माहिती करिता फोन नंबर : 022-49150800 / 18001025399 ईमेल आयडी : helpdesk@mahadbt.gov.in, तक्रार निवारण : तांत्रिक अथवा प्रशासकीय तक्रारीकरिता आपल्या लॉगिन मधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
०००००

No comments:
Post a Comment