Search This Blog

Friday, 21 August 2026

रस्ता सुरक्षा उजळणी शिबिराच्या तारखेत बदल

 

रस्ता सुरक्षा उजळणी शिबिराच्या तारखेत बदल

            चंद्रपूर, दि. 21 : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दर बुधवारी आयोजित करण्यात येणारे रस्ता सुरक्षा उजळणी शिबीर 26 ऑगस्ट 2026 रोजी सार्वजनिक सुटटी (ईद-ए-मिलाद) असल्याने अंशतः रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे सदर रस्ता सुरक्षा उजळणी शिबीर या आठवडयात बुधवार ऐवजी गुरुवार दि. 27 ऑगस्ट रोजी नियमित वेळेवर रस्ता सुरक्षा हॉल येथे आयोजित करण्यात येईल. पुढील आठवडयापासुन हे शिबीर पुर्ववत दर बुधवारीच आयोजित केले जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment