क्रीडा प्रबोधिनीत सरळ व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश
चंद्रपूर, दि. 11 : महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी, राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरविण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.
सन 2026-27 साठी शिवछत्रपती क्रीडापीठाअंतर्गत 8 क्रीडा प्रबोधिनीत मे 2026 मध्ये सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणी प्रक्रियेअंतर्गत प्रवेश अंतिम करण्यात आले होते. पुनश्च एकदा राज्य स्तरावर निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे.
राज्यस्तर सरळ प्रवेश चाचणी कार्यक्रम अंतर्गत 17 ते 18 ऑगस्ट 2026 रोजी हँडबॉलची चाचणी होईल. खेळाडूंनी सकाळी 10 वाजता चाचणी स्थळी उपस्थित राहावे. तसेच विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, कोराडी रोड, नागपूर येथे 18 ते 19 ऑगस्ट रोजी हँडबॉल चाचणी होईल. खेळाडूंनी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथे उपस्थित राहावे
खेळाडूंसाठी सुचना : 1) सदर चाचणीकरिता येणाऱ्या खेळाडूंनी निवास व भोजन व्यवस्था वैयक्तिक स्तरावर स्वतः करावयाची आहे. 2) संबधित स्पर्धेचे प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा उदा. जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड व इतर अनुशंगिक सर्व मुळ कागदपत्रे व सुयोग्य स्पोर्ट कीटसह चाचणी स्थळी उपस्थित राहावे 3) सरळ प्रवेश चाचणीकरिता राज्यस्तर पदक किंवा राष्ट्रीयस्तर सहभाग प्रमाणपत्र आवश्यक आहे. 4) खेळनिहाय कौशल्य चाचणीकरिता किमान राज्यस्तर सहभाग प्रमाणपत्र आवश्यक आहे. 5) खेळाडू 19 वर्षे वयोगटातील असावा.
अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक (हँडबॉल) भूषण इंगळे (मो. 7447654989) यांच्याशी संपर्क साधावा. चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र हँडबॉल खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने सदर चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी केले आहे.
००००००

No comments:
Post a Comment