Search This Blog

Tuesday, 2 June 2020

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना व रखडलेल्या योजना पुर्ण करा : ना. विजय वडेट्टीवार

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना व
रखडलेल्या योजना पुर्ण करा :ना.  विजय वडेट्टीवार
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेची आढावा सभा
चंद्रपूर, दि.2 जून: जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत जिल्ह्यात प्रस्तावित पाणीपुरवठा योजना तसेच रखडलेल्या योजना बाबत सर्व आकडेवारीसह माहिती घेऊन आगामी कालावधीमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन,  इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  विजय वडेट्टीवार यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
नियोजन भवन येथे पार पडलेल्या आढावा बैठकीस सुरेश उपाख्य बाळू धानोरकरआ.प्रतिभा धानोरकरआ.किशोर जोरगेवारजिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेतसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्व विभाग प्रमुखाकडून सविस्तर आढावा घेताना खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रस्तावित कामांचा या बैठकीत विशेषत्वाने आढावा घेतला. आतापर्यंत 27 यंत्रणांना निधी देण्यात आला आहे.या निधीअंतर्गत जिल्ह्याला 693 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून हा निधी प्रत्यक्ष बाधित क्षेत्रासाठी 66 टक्के तर अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रासाठी 34 टक्के खर्च करावयाचा असून हेच निकष ग्राह्य धरून या निधीचा पुरेपूर वापर होईल याची दक्षता घेत अधिकाऱ्यांनीही कामे जलदगतीने करतानाच निर्धारित वेळेत पूर्ण होतील याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना देखील यावेळी केल्या.
बफर झोन क्षेत्रातील शाळांचा सर्वे करून शाळेतील वॉल कंपाऊंड बांधकाममुला-मुलींसाठी शौचालायेसोलर पॅनल लावण्यासाठी तसेच शुद्ध पाण्याची व्यवस्था त्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाला दिल्या.ग्रामीण भागातील बंद पडलेल्या व रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे एक महिन्यात पूर्ण करावे.असे निर्देशही यावेळी पालकमंत्री ना.  विजय वडेट्टीवार यांनी दिलेत.
00000

चंद्रपूरमध्ये 7 रुग्णांना सुटी ; ॲक्टिव कोरोना रुग्णांची संख्या 3

चंद्रपूरमध्ये 7 रुग्णांना सुटी ॲक्टिव कोरोना रुग्णांची संख्या 3
Ø  आतापर्यंत 20 रुग्ण कोरोना मुक्त
Ø  ॲक्टिव 3 रुग्णांची प्रकृती स्थिर
चंद्रपूर,दि. 2 जून: चंद्रपूर जिल्ह्यातील 7 रुग्ण मंगळवार दिनांक 2 जून रोजी कोरोना आजारातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.आतापर्यंत एकूण 20 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 आहे. या तिनही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे,अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. आतापर्यंत हजार 13 स्वॅब नमुने तपासणीस पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह 23 नमुनेनिगेटिव्ह 906 नमुने तर 84 नमुने प्रतीक्षेत आहेत.
ग्रामस्तरावर 3 हजार 110 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर 306 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तर जिल्हास्तरावर 322 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहेतअसे एकूण जिल्ह्यातील 3 हजार 738 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 73 हजार 679 नागरिक दाखल झाले आहेत. तसेच, 65 हजार 672 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहेत. तर 8 हजार 7 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
जिल्ह्यामध्ये अन्य राज्यातून व अन्य जिल्ह्यातून रेडझोन मधून प्रवास करून आलेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे. नवी दिल्ली( एक रूग्ण )मुंबई( चार रुग्ण)ठाणे ( दोन रुग्ण)पुणे ( सहा रूग्ण )यवतमाळ ( दोन रुग्ण )नाशिक (तीन रुग्ण) तसेच कोणत्याही प्रकारच्या प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटीव्ह रूग्णांच्या सहवासातील संख्या 5 आहे.
चंद्रपूरमध्ये 2 मे ( एक रुग्ण ), 13 मे ( एक रूग्ण), 20 मे ( एकूण 10 रूग्ण ), 23 मे ( एकूण 7 रूग्ण ), व 24 मे ( एकूण रूग्ण 2 ), 25 मे ( एक रूग्ण ),31मे ( एक रुग्ण ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण 23 झाले आहेत.आता पर्यत 20 रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 23 पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या 3 आहे.
00000

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सर्व सेवा एका क्लिकवर

कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता
विभागाच्या सर्व सेवा एका क्लिकवर
महास्वयंम या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन
चंद्रपूरदि.2 जून: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता विभागाच्या सर्व सेवा आता www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने विनामुल्य पुरविण्यात येतात. यामुळे कोणीही कुठूनही अत्यल्प श्रम व कालावधीत विनामूल्य यांचा लाभ घेवू शकतो. हे संकेतस्थळ वापरकर्त्यासाठी समजण्यास अतिशय सुलभ असून पुरविण्यात आलेल्या सर्व सुविधा गरजू उमेदवार व उद्योजकासाठी निश्चितच उपयुक्त आहेत.
या संकेतस्थळाद्वारे उमेदवारांसाठी पुरविण्यात आलेल्या सुविधा प्रामुख्याने पुढील प्रमाणे :
नाव नोंदणी करणेआपल्या प्रोफाईलमध्ये शैक्षणिक पात्रतेतील वाढ/अनुभव नोंदविणेपत्ता,संपर्क क्रमांकई-मेल यामध्ये दुरुस्ती करणेनुतणीकरण करणेआधार कार्ड लिंक करणेपासवर्ड रिसेट करणे.शासकीय/खाजगी अधिसूचित रिक्तपदांची माहिती मिळविणेत्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करणे.
राज्यभरातील आयोजित विविध रोजगार मेळाव्याची माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता पसंती क्रम नोंदविणे.रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग नोंदविणे.
केंद्र व राज्य  शासनामार्फत राबविण्यात येणा-या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणा-या संस्था यांची माहिती प्राप्त करणे आणि सहभाग घेणे.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगारासाठी योजनांची माहिती मिळविणे व लाभ घेण्यासाठी उचित योजनेतर्गत प्रकरण सादर करणे.
उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा:
उद्योजक म्हणून नोंदणी करणेनवीन प्लांन्ट/शाखेची स्वतंत्र नोंद करणे.फाईल अद्यावत करणे (पत्ता,संपर्क अधिकारी,दूरध्वनी,भम्रणध्वनी क्रमांकई-मेल आयडी,यामध्ये दुरुस्ती करणे) पासवर्ड रिसेट करणे.वेळोवेळी निर्माण होणारी रिक्त पदे अधिसूचित करणे. त्या अन्वये नोंदविलेल्या मागणीनुसार सिस्टिमद्वारे पुरस्कृत पात्र उमेदवारांची यादी मिळविणेविनामूल्य या पदाची प्रसिद्धी देणे.
सदर यादी पीडीएफ किंवा एक्सल फॉर्मेट मध्ये डाऊनलोड करणेमुलाखती आयोजित करणे.
प्राथमिकरित्या निवडलेल्या उमेदवारांना सिस्टीमव्दारे विनामुल्य पाठवण्याची सुविधा.मुलाखत प्रक्रियेनंतर रुजू झालेल्या उमेदवारांचे प्लेसमेंट नोंदविणे.
सीएनव्ही अॅक्ट 1959 अंतर्गत बंधन कारक असलेले  त्रैमासिक मनुष्यबळ विवरणपत्र (ईआर-1) ऑनलाइन सादर करणे.विविध रोजगार मेळाव्यांची सर्वकष माहिती मिळविणे  त्यासाठी रिक्तपदे अधिसूचित करुन थेट सहभाग नोंदविण्याची सुविधा. रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेमध्ये सहभाग घेणेप्रशिक्षणार्थीची निवड करणेत्यांना योजनेमध्ये समाविष्ट होण्यास अनुमती देणे,उमेदवारांची मासिक उपस्थिती नोदविणे,विद्यावेतन प्रतिपूर्ती मागणी (क्लेम) सादर करणे,ही सर्व कामे ऑनलाईन पध्दतीने करता येतात. यासाठीचे विद्यावेतनाच्या प्रतिपूर्तीचे सर्व क्लेम आरटीजीएस पद्धतीने थेट उद्योजकांच्या खात्यात विनाविलंब जमा करण्यात येतात.

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी तसेच केंद्र शासनामार्फत जिल्हा कार्यालयाव्दारे राबविण्यात येत असलेले विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे किंवा त्यामध्ये सहभाग घेणे.
याशिवाय उद्योजकांसाठी विविध शैक्षणिक पात्रता व कौशल्य प्राप्त नोंदणीकृत होतकरु उमेदवारांचा नोंदणी पट तर उमेदवारासाठी सर्वच वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत उद्योग,उपक्रमातील नोंदणीकृत सक्षम उद्योजकांचा नोंदणीपट उपलब्ध  आहेच.
सर्वांनी तात्काळ www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा. किंवा याबाबत काही अडचणी असल्यासया कार्यालयास chandrapurrojgar@gmail.com तसेच asstdiremp.chandrapur@ese.maharashtra.gov.in या इमेल द्वारे कळवावेअसे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
00000

मनपा क्षेत्रातील रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा: पालकमंत्री ना. वडेट्टीवार


मनपा क्षेत्रातील रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा
: पालकमंत्री ना. वडेट्टीवार
चंद्रपूर महानगरपालिकेच्या कामकाजाचा पालकमंत्र्यांचा आढावा
चंद्रपूर, दि. 2 जून : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या प्रलंबित कामाची पूर्तता पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी. या कामाकडे अधिक लक्ष द्यावेतसेच कोरोना संसर्गाच्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये कोणतीच साथ उद्भवू नयेयासाठी शुद्ध पाण्याची वितरण व्यवस्था नेटकी करावीअसे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन,  इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.
पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर महानगरपालिकेतील कामकाजाचा आढावा घेतला.या बैठकीला महापौर राखी कंचर्लावार,आयुक्त राजेश मोहिते, यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मान्सून पूर्व तयारी संदर्भात चंद्रपूर महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली.जिल्ह्याच्या आणि महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर सध्या कोरोनामुळे प्रचंड दबाव आहे.या दबावामध्ये अन्य कोणत्याही साथ रोगाचा उद्रेक होणार नाही. याची काळजी घेणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने अमृत योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रस्त्याचे खोदकाम केलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात अशुद्ध पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात घनकचऱ्याची विल्हेवाटस्वच्छता व अशुद्ध पाण्यावर अधिक लक्ष देण्याची सूचनादेखील त्यांनी यावेळी केली. सोबतच महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यावेअसेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनापाणीपुरवठा योजनादलित वस्ती सुधारणा योजनापावसाळ्यापूर्वी सुरू असलेले नियोजनयासंदर्भातही आढावा घेतला.महापौर राखी कांचर्लावार यांनी या बैठकीमध्ये पालकमंत्री हे महानगरपालिकेचे देखील पालक असून त्यांनी महानगरपालिकेसाठी अतिरिक्त 20 कोटी रुपये द्यावे अशी मागणी केली. तसेच जिल्हा नियोजनमधून गेल्या वर्षी मिळालेला निधी या वर्षी देखील त्याच प्रमाणात मिळावा अशी मागणी देखील केली.
या बैठकीला सुरुवात करतांना महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी महानगरपालिकेमार्फत सुरू असणारे उपक्रम व कोरोना प्रतिबंधासाठी 1200 कर्मचाऱ्यांच्या चमूने गेल्या तीन ते चार महिन्यात केलेल्या कामकाजाचा आढावा सादर केला. यावेळी त्यांनी 537 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन संदर्भातील महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सद्यस्थिती सांगितली.याप्रसंगी महापौर राखी कंचर्लावारआयुक्त राजेश मोहितेसभागृह नेता वसंत देशमुखविरोधी पक्ष नेते डॉ.सुरेश महाकुलकरनगरसेवक संजय कंचर्लावारसंदीप आवारीरवी आसवानीनंदू नागरकरदीपक जयस्वाल,अमजद अलीनगरसेविका सुनीता लोढ़ियासंगीता भोयर, उपायुक्त विशाल वाघगजानन बोकडेसहायक आयुक्त धनंजय सरनाईकसचिन पाटीलशीतल वाकडे,  शहर अभियंता महेश बारईउपअभियंता विजय बोरीकरअनिल घुमडे उपस्थित होते.
00000

Monday, 1 June 2020

लॉकडाऊनमध्ये काही बाबींमध्ये शिथिलता जाणून घेवूया; काय सुरू,काय बंद राहणार

लॉकडाऊनमध्ये काही बाबींमध्ये शिथिलता
जाणून घेवूयाकाय सुरू,काय बंद राहणार

चंद्रपूरदि. 1 जून: जिल्ह्यामध्ये  लॉकडाऊनच्या काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज आदेश काढले आहे.जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूंचा प्रसार होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी संपूर्ण जिल्ह्यात  कलम 144 लागू असणार आहे.
या बाबी बंद राहतील:
प्रवास :
आंतरराज्य व आंतरजिल्हा विनापरवाना प्रवासी वाहतुकीकरिता बंद असेल.परराज्यात / राज्यातर्गत (चंद्रपूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात) प्रवासाकरिता http://covid19.mhpolice.in यावर ऑनलाईन अर्ज करावा.
चंद्रपूर जिल्हा बाहेरून सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊन जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना आरोग्य विभाग यांचेकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार 14 दिवस होम क्वारन्टाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल होम क्वारन्टाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेली व्यक्ती इतरत्र फिरताना आढळल्यास रुपये 2 हजार दंड व मास्कचा वापर न केल्यास रुपये 200 इतका दंड आकारण्यात येईल व संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिताचे कलम 188, 269,270 ,271 नुसार कार्यवाही करण्यात येईल.
65 वर्षावरील व्यक्ती,मधुमेह व्यक्ती व 10 वर्षाचे आतील बालके गर्भवती महिला यांनी अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी व वैद्यकीय उद्देशा शिवाय घराबाहेर निघू नये.
अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी/ अधिकारी व संबंधित व्यक्ती यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तींच्या हालचालीस रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत प्रतिबंध राहील.
सार्वजनिक स्थळी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होऊ नये.धार्मिक स्वरूपाचे समुपदेशन धर्मपरिषद धार्मिक गर्दीचे आयोजन करू नये.कोरोना विषाणुच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजात जनमानसात अफवा अपप्रचार व भीती व्हाट्सअप फेसबूक,ट्विटरवृत्तपत्रसोशल मीडिया व होर्डिंग इत्यादी वर प्रसारित करू नये तसेच अधिकृत माध्यमाद्वारे माहिती न घेता दिशाभूल करणारी माहिती प्रसारमाध्यमांवर प्रसारित करू नये.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने घोषित करण्यात आलेल्या क्वारटाईन स्थळांच्या 100 मीटर परिसरातर्गत एकत्रित येण्यास व हालचाल करण्यास निर्बंध घालण्यात येत आहे.
खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे मिरवणूक,रॅलीसामूहिक कार्यक्रम ,समारंभसांस्कृतिक कार्यक्रमसण-उत्सव ,उरूस ,जत्रामनोरंजनाचे कार्यक्रमक्रीडा व इतर सर्व स्पर्धाआंदोलने यांना मनाई राहील.
खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्येकार्यशाळा ,प्रशिक्षण वर्ग,देशांतर्गत व परदेशी सहल यांचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील.
शॉपिंग कॉम्प्लेक्समॉलसुपरमार्केटमनोरंजनाची ठिकाणे ,क्लब /पबक्रीडांगणेमैदाने,जलतरणतलावउद्यानेसिनेमागृहेनाट्यगृहे ,शाळामहाविद्यालयेखाजगी शिकवणी वर्गव्यायामशाळा ,संग्रहालये ,गुटखा तंबाखूपान विक्री इत्यादी बंद राहील.
निवासाची सोय असलेले सर्व हॉटेल /लॉज /खाजगी विश्रामगृह बंद राहतील. सामाजिक अंतर ठेवून दैनंदिन बाजार भरवता येईल परंतु आठवडी बाजार भरविता येणार नाही.तसेच,सलुन,स्पाबार्बरशॉप ,ब्युटी पार्लरकेस कर्तनालय बंद राहतील.
जीवनावश्यक असलेल्या पुढील बाबी कार्यरत राहतील:-
अत्यावश्यक किराणा सामानदुग्ध /दुग्धोत्पादनेफळे व भाजीपालापार्सल स्वरूपात काउंटर तसेच इतर मार्गांनी विक्री/ वितरण व वाहतूक करण्यास परवानगी राहील.
जीवनावश्यक खाद्यपदार्थ किराणादूध,दुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतूकब्रेडफळेभाजीपालाअंडीमांस मासे बेकरीपशुखाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील. परंतुआपले दुकान आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.
जीवनावश्यक वस्तु विक्री व वितरण इ. आस्थापना/दुकाने या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची आस्थापना/दुकाने सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 05 या वेळेत सुरु राहतील व रविवार ला सदर दुकाने पुर्णत: बंद राहतील. परंतुआपले दुकान/आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.
महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत/ग्रामपंचायत यांचेकडुन प्राप्त झालेले परवानाधारक फेरीवाले यांची ठेले/ दुकाने सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहतील व रविवारला सदर दुकाने पुर्णत: बंद राहतील.
खाद्य पदार्थकिराणादूधब्रेडफळे,भाजीपाला,अंडीमांस ,मासे यांची वाहतुक व साठवण.अत्यावश्यक वस्तूंची पुरवठासाखळी आणि वाहतूक. पार्सल स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देण्याचे अटीवर उपहारगृहेखाद्यगृहे घरगुती खानावळ स्वीट मार्केट फरसाण सेंटर व चहा नाष्टा सेंटर सुरू राहतील तथापि प्रत्यक्ष दुकानात ग्राहकांसाठी बैठक व्यवस्थेस मनाई असेल.
पावसाळी ऋतू संबंधित साहित्य जसे छत्रीरेनकोटप्लॅस्टिक शीटकव्हर यांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात येत आहे.त्यामुळे सदर साहित्याची विक्री व वितरणाबाबत वेळ सकाळी ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील.
लग्न समारंभाकरिता पुढीलप्रमाणे परवानगी राहतील:
लग्न समारंभ (50 लोकांच्या उपस्थितीत) सामाजिक अंतर राखून करण्यास परवानगी असेल. परंतुसदर परवानगीही उपविभागीय अधिकारी/ तहसिलदार यांचेकडून प्राप्त करणे बंधनकारक राहील.तसेच,अंत्यविधी करिता सामाजिक अंतर राखून 20 लोकांचे उपस्थितस परवानगी राहील.
प्रवास व प्रवासी वाहतूकी संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:
जिल्हांतर्गत प्रवासाकरिता बस सेवा व 50 टक्के प्रवासी क्षमतेचा सामाजिक अंतर राखून निर्जंतुकीकरण उपाय राबवून सुरू राहतील.
जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यात (दुचाकी /चारचाकी वाहनाने) नागरिकास कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही. परंतुचारचाकी वाहनाच्या बाबतीत वाहन चालकासह केवळ दोन प्रवासी वैद्य राहील आणि वाहनांमध्ये सँनीटायझर ठेवून प्रवास करणाऱ्या व्यक्तीस मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच दुचाकी करिता केवळ दुचाकीचालक यांनाच वाहन चालविण्यास परवानगी असेल.
महानगरपालिका ,नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्राकरिता प्रवासी वाहतूक करिता रिक्षा /ऑटोरिक्षा चालक व दोन प्रवाशांसह रिक्षा ऑटोरिक्षाची वाहतूक सुरू राहील
परंतु रिक्षा /ऑटोरिक्षा मध्ये सँनीटायझर ठेवणे व मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल सदर वाहतूक ही ग्रामीण क्षेत्राकरिता लागू राहणार नाही.
दुचाकी चारचाकी रिक्षा ऑटोरिक्षा याद्वारे सायंकाळी 9 ते सकाळी 5 या कालावधीत प्रवास करता येणार नाही.
शासकीय व खाजगी कार्यालय संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:
जिल्ह्यातील सर्व शासकीय,निमशासकीय महामंडळ कार्यालय शंभर टक्के कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती सुरू राहतील परंतु कोविड-19 संबंधाने राज्य शासनाकडून दिनांक 17 एप्रिल 2020 रोजीच्या अधिसूचनेत दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
शेतीविषयक उत्पादन/ सुविधा /आस्थापना संबंधाने पुढील बाकी कार्यरत राहतील:
सर्व प्रकारचे शीतगृहे /वखार ,गोदामा संबंधित सेवा /घाऊक वितरणासाठी आणि सदर बाबींशी संबंधित पुरवठा साखळी.कृषी उत्पादन व किमान आधारभूत किंमत यांच्याशी संबंधित कार्य करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य शासनातर्फे अधिकृत असलेले मंडी बाजार विशेषतः कापूसतुर व धान खरेदी,-विक्री आस्थापना /दुकाने कार्यरत राहतील.
शेतकरी व शेतमजूर यांचेकडून करण्यात येणारी शेतीविषयक कामे मासेमारी व मत्स्य व्यवसाय संबंधित सर्व कामे व शेती विषयक अवजारे /यंत्र विक्री व दुरुस्ती संबंधित मान्यताप्राप्त दुकाने /आस्थापना (किमान मनुष्यबळासह) सुरू राहतील.
शेती संबंधित यंत्रे /अवजारे चालविण्यासाठी आवश्यक असणारा मजूरवर्ग /केंद्र. खते कीटकनाशके व बियाणे यांच्याशी निगडित उत्पादन व पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग/ आस्थापना /दुकाने संपूर्ण जिल्ह्याकरिता सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील व रविवारला सदर दुकाने पूर्णता बंद राहील.
उपरोक्त प्रमाणे परवानगी देण्यात आलेले कामाचे ठिकाण,सार्वजनिक स्थळे,दुकाने आस्थापनाप्रतिष्ठाने येथे कार्यरत कामगारांस,कर्मचारी तसेच सुविधेचे लाभ घेणारे जिल्ह्यातील सर्व नागरिक  यांनी कायम मास्कचा वापर करणे तसेच आरोग्य सेतु अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील.
सदरील आदेशाचे पालन न करणारीउल्लंघन करणारी कोणतीही व्यक्तीसंस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा1897आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता कलम 188,269,270,271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
सदरचा आदेश संपुर्ण जिल्हयामध्ये दिनांक 1 जून  ते दिनांक 30 जून या कालावधीकरिता लागू राहील.तसेचप्रतिबंधीत क्षेत्राकरिता (कंटेनमेंट झोन) लागु राहणार नाही.
0000000