Search This Blog

Thursday, 29 April 2021

1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

केवळ जिल्हा मुख्यालयी साधेपणाने सकाळी 8 वाजता होणार ध्वजारोहण कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला 1 मे 2021 रोजी 61 वर्षे पूर्ण होत आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम केवळ जिल्हा मुख्यालयी अत्यंत साधेपणाने व कमीत कमी उपस्थित आयोजित करण्याच्या शासनाच्या सुचना प्राप्त झाल्या आहे. त्यानुसार शनिवार दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमीन विकास विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न होणार आहे.

0 0 0

Wednesday, 28 April 2021

गत 24 तासात 1026 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 1026  कोरोनामुक्त,

1224 पॉझिटिव्ह तर 20 मृत्यू

Ø  आतापर्यंत 40,344 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,712

चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1026 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1224 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 20 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 56 हजार 904 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 40 हजार 344  झाली आहे. सध्या 15 हजार 712 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 68 हजार 438  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 6 हजार 641 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील जयराज नगर, तुकुम येथील 53 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला,फुले चौक परिसरातील 72 वर्षीय पुरुष, ऊर्जानगर येथील 40 वर्षीय पुरुष, 67 वर्षीय पुरुष, बिनबा वार्ड येथील 34 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, घुगुस येथील 58 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 70 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील विरुर येथील 67 वर्षीय महिला, मुल तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष, कोरपना तालुक्यातील वनसडी येथील 68 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील 45 वर्षीय महिला, चिमूर  तालुक्यातील जामगाव येथील 48 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगर येथील 68 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील 70 वर्षीय महिला, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील 75 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 848 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 783, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1224 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 424, चंद्रपूर तालुका 65, बल्लारपूर 95, भद्रावती 143, ब्रम्हपुरी 50, नागभिड 42, सिंदेवाही 22, मूल 00, सावली 44, पोंभूर्णा 04, गोंडपिपरी 27, राजूरा 59, चिमूर 94, वरोरा 109, कोरपना 26, जिवती 07 व इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000000

रुग्णवाहिकांचे भाडेदर जाहीर जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार

 


रुग्णवाहिकांचे भाडेदर जाहीर

    जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार

- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे

चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या सुचनांच्या अनुषंगाने व परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशाप्रमाणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेऊन रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित केले  आहेत. यानुसार पहिले 25 किलोमीटर अंतर अथवा 2 तास यासाठी मारूती व्हॅन करिता 800 रुपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटर साठी 15 रुपये, टाटा सुमो व मॅटॅडोर सदृष्य वाहनाकरिता पहिल्या 25 किलोमीटरसाठी  900 रुपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटर साठी 15 रुपये, टाटा 407, स्वराज माझदा इ. साठी रु. 1200 व रु. 18 प्रती कि.मी., आय.सी.यू. अथवा वातानुकूलित वाहनाकरिता रु. 2000 व रु.25 प्रती कि.मी. याप्रमाणे रुग्णवाहिकेचे दर ठरविण्यात आले आहेत.

  जे वाहन चालक व मालक विहीत भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी करतील, त्यांचेवर पहिल्या गुन्ह्यासाठी रुपये पाच हजार, दुसऱ्या गुन्ह्यासाठी रुपये दहा हजार व तिसऱ्या गुन्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद घेण्यात येईल.

नागरिकांनीही उपरोक्त ठरविलेल्या दरापेक्षा अधिक भाडे देऊ नये व याबाबत काही तक्रारी असल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास लेखी स्वरूपात किंवा mh३४@mahatranscom.in या ई-मेल पत्त्यावर तक्रार सादर करण्यात यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

0000000

कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटरचे उद्घाटन

 

कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटरचे उद्घाटन

लसिकरण संदर्भात नोंदणी, मार्गदशन, शंकांचे करणार समाधान

चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : जिल्हयातील सर्व नागरिकांकरिता कोविड लसिकरणाबाबत काही शंका तथा माहिती व मार्गदर्शन करिता जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटर सुरु करण्यात आले असुन सदर केंद्राचे हेल्प लाईन क्र. 07172-254208 आहे.

 

आज दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी जिल्हा शल्य चिकीत्सक तथा कोविड-19 इंसिडंट कमांडर डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशिक्षण केंद्र रुम क्र. 8, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटर चे उद्घाटन जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ. सदिप गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले.

 राज्यात कोविड-19 आजारावर नियंत्रण व उपाययोजना म्हणुन वयोगट 45 व त्यावरील सर्व वयोगटातील व्यक्तींना कोविड लसिकरण करण्यात येत असुन दिनांक 1 मे 2021 पासुन वयोगट 18 व त्यावरील सर्व वयोगटातील व्यक्तींना कोविड लसिकरण करण्यात येणार आहे. सर्व जनतेकरिता कोविशिल्ड व कोव्हॉक्सीन असे दोन्ही लसिचे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कोविशिल्ड व कोव्हॉक्सीन ह्या दोन्ही लसींना भारत सरकारची मान्यता असुन दोन्ही लस पुर्णपणे सुरक्षीत व प्रभावी आहेत, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये व कोणत्याही प्रकारची शंका किंवा भीती बाळगता लस घ्यावी.

तसेच कोविड लसिकरण संदर्भात नोदंणी करिता मार्गदशन, शंका तथा काही समस्या उद्भवल्यास उपरोक्त हेल्पलाईन क्रमांकावर  सकाळी 9 ते सायंकाळ 6 या कालावधी दरम्यान संपर्क साधुन माहिती व मार्गदर्शन प्राप्त करुन घ्यावी, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष मोटे, सल्लागार रामेश्वर बारसागडे, तसेच आशा बावणे, अश्विन सावलीकर, योगेंद्र इंदूरकर व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

0000000

सावली येथील कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना.वडेट्टीवार



 सावली येथील कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना.वडेट्टीवार

यांची भेट ; ग्रामीण रुग्णालयाचीही केली पाहणी

Ø  कोरोना संकटाच्या काळात रुग्णांना वेळेत उपचार देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश

Ø  कोणत्याही रुग्णाचा ऑक्सिजन तसेच रेमडेसिविर अभावी मृत्यू होता कामा नये.

Ø  तालुक्यासाठी 4 खाजगी रुग्णवाहिका देणार

चंद्रपूर दि.28 एप्रिल: जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यावर पर्याय म्हणून सावली येथे 39 ऑक्सिजन काॅन्संट्रेटर लावण्यात येणार असून आवश्यकता पडल्यास ऑक्सिजन प्लांट सुद्धा  उभारण्यात येईल. त्यामुळे तालुक्यातील कोणताही रुग्ण ऑक्सीजन तसेच रेमडेसिविर इंजेक्शन अभावी दगावणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश देत ऑक्सिजनची सोय तालुक्याच्या ठिकाणी वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या जात असून पुढेही दिली जाईल अशी ग्वाही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिली.

पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सावली तालुक्यातील तहसील कार्यालय येथे आयोजित कोविड विषयक आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार  तहसीलदार परिक्षित पाटील, नगरपंचायत, मुख्याधिकारी मनीषा वाजळे, सिंदेवाही नगरपंचायतचे उपाध्यक्ष स्वप्नील कावळे, नगरपंचायतचे माजी उपाध्यक्ष नितीन दुधावर तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यात तसेच तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाधित पुढे येत आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ते प्रयत्न केल्या जात आहे. ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण वाढत चाललेले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला असून  तो काही प्रमाणात कमी करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले असून त्यामाध्यमातून कोविड रुग्णाची तालुकास्तरावरच योग्य वेळी, योग्य उपचार तातडीने करण्यात येत आहे. असे असतांनाही काही रुग्णांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला न्यावे लागत असते मात्र येथे एकच रुग्णवाहिका असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय लक्षात घेता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या स्वखर्चाने सावली येथे खाजगी तत्वावर चार रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत असून रुग्णाना विनामूल्य सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.  लसीकरणाचे काम सुरू असले तरी सुध्या 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात यावे तसेच 1 मे पासून 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना विनामूल्य लस देण्यात येणार असल्याने लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांनी दिलेत.

जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. रुग्णाचा मृत्यू ऑक्सिजन अभावी होऊ नये त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अतिरिक्त ऑक्सीजन बेड कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले असून याचे ही काम युध्द पातळीवर सुरू आहे. तसेच माझ्याही विभागाकडून कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन प्लॅंट यासह साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.

कोविड केअर सेंटरची पाहाणी:

आज पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांनी तालुक्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी शाळा येथे उभारण्यात आलेल्या कोविड  केअर सेंटरला भेट देत पाहणी केली व रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली.

याठिकाणी 48 आयसोलेशन बेड तर दोन ऑक्सीजन बेड असे एकूण 50 बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे.

ग्रामीण रुग्णालयाला भेट:

तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला भेट देत उपलब्ध खाटांची संख्या, औषध साठा, रुग्णालयाची स्वच्छता, कर्मचाऱ्यांची उपस्थिती याची माहिती घेत या संकटाच्या काळात रुग्णांना योग्य उपचार वेळेत द्यावे अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

सांत्वनपर भेट:

तसेच सावली तालुक्यातील चक विरखल येथे श्री. तांगडे यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट दिली.

0000000