Search This Blog

Thursday, 2 September 2021

गुरुवारी जिल्ह्यात 5 कोरोनामुक्त, 7 पॉझिटिव्ह


गुरुवारी जिल्ह्यात 5 कोरोनामुक्त,  7 पॉझिटिव्ह

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 48

चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 5  जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 7 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 7 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 2, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 1,वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

            जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 658  वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 70 झाली आहे. सध्या 48 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 77 हजार 494 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 86 हजार 953 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1540 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

 परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

Ø 4 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा

चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब पूर्वपरीक्षा 4 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत चंद्रपूर मुख्यालयाच्या ठिकाणी विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. या केंद्राच्या ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परिसरात सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेत परीक्षार्थी व्यतिरिक्त दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होऊ शकणार नाही. सदर कालावधीत नियमित व रोजच्या वाहतुकीव्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. परीक्षेच्या दरम्यान केंद्राच्या 100 मीटर परिसरात झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी. बुथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणत्याही संपर्काच्या सवलतींना प्रतिबंध राहील.

असे आहेत परीक्षा केंद्र : विद्याविहार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय तुकूम, रफी अहमद किडवाई मेमो हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय घुटकाळा वॉर्ड, सरदार पटेल महाविद्यालय गंजवॉर्ड, सेंट मायकल इंग्लिश स्कूल नगिनाबाग, श्री. साई पॉलिटेक्निक नागपूर रोड, नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, मुरलीधर बागला कॉन्व्हेंट हायस्कूल बाबुपेठ, ज्युबली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कूल, ऑर्ट, कॉमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालय तुकूम, शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय ताडोबा रोड, जनता विद्यालय, पाणी टाकीजवळ चंद्रपूर, नारायणा विद्यालय, खुटाळा रोड, चंद्रपूर, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, एफ.ई.एस.गर्ल्स हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिव्हील लाईन, चंद्रपूर, चांदा पब्लिक स्कूल, रामनगर, बी.जे.एम. कार्मेल अकादमी, तुकुम, माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, जनता विद्यालय, सिव्हील लाईन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, मूल रोड, चंद्रपूर.

सदर आदेश दि. 4 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हादंडाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

0000000

Wednesday, 1 September 2021

चंद्रपूर जिल्हयातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार :- मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 

चंद्रपूर जिल्हयातील कोळसा  खाण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार :- मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई/चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील बरांज मोकासा, चेक बरांज, सोमनाला, बोन्थाला, कढोली, केसुर्ली आणि चिंचोर्डी या गावांमध्ये कोळसा खाणीसाठी  कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड ने जमिनीचे भुसंपादन केले आहे.या गावातील प्रकल्पग्रस्तांना कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये २०१६ मध्ये झालेल्या करारानुसार कार्यवाही करावी तसेच प्रकल्पबाधीत कुटूंबाचे जिल्हाधिकारी यांनी सर्वेक्षण करून फेरअहवाल शासनाकडे सादर करावा या कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही मदत व पनुर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड व्दारे चंद्रपूर जिल्हयातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या  विविध समस्येबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत श्री.वडेट्टीवार बोलत होते.यावेळी  मदत व पुनर्वसनचे प्रधानसचिव असिम गुप्ता, दूरदृश्यप्रणालीव्दारे नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लंवगारे,चंद्रपूरचे   जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड (केपीसीएलचे) व्यवस्थापकीय संचालक व्ही.होनराज,स्वागत उपाध्याय,बरांज ग्राम काँग्रेस कमिटी प्रकल्पग्रस्त विशाल दुधे,नितीन चालखुरे उपस्थित होते.

श्री.वडेट्टीवार म्हणाले,प्रकल्पबाधीत गावातील कुटूंबाचे जिल्हाधिकारी यांनी फेर सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे सादर करावा.प्रकल्पबाधीतांची यादी करताना  सर्व पडताळणी केली जावी. केपीसीएलने कामगारांचा २०१५ पासून ते २०२० पर्यंतचा उर्वरीत पगार त्वरीत दयावा.पुनर्वसन करारातील न्यूनतम वेतन कायदा १९४८ बाबत कामगार आयुक्तांसोबत चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.कुटूंबसंख्या निश्चीत झाल्यानंतर त्याची प्रसिध्दी करण्यात यावी.जमिनीचे भुसंपादन पूर्ण झाल्यानंतर कराराप्रमाणे कंपनीने योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

00000

बुधवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त, 9 पॉझेटिव्ह


बुधवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त, 9 पॉझेटिव्ह

Ø ॲक्टिव रुग्णांची संख्या 46

चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 9 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात बुधवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 9 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 2, चंद्रपूर तालुका 4, बल्लारपूर 0, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 1, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 1, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 651  वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 65 झाली आहे. सध्या 46 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 76 हजार 768 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 86 हजार 139 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1540 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

 

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

उद्योग समुहांनी रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी


उद्योग समुहांनी रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी

Ø व्हीसीद्वारे घेतला आढावा

चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर : जिल्ह्यात कोरोनासदृश्य परिस्थिती तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असल्यामुळे रक्तदान करण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. शासकीय रक्तपेढीत रोज जवळपास 50 रक्तपिशव्यांची मागणी होत असते. मात्र सद्यस्थितीत शासकीय रक्तपेढीत रक्ताची कमतरता भासत आहे. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या प्रगत असल्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या उद्योगसमुहांनी या संकटावर मात करण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीसीद्वारे जिल्ह्यातील उद्योग समुहांसोबत संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, रक्तदानासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमात जिल्ह्यातील उद्योग समुहांनी हातभार लावला तर रक्ताची कमतरता भासणार नाही. यावर सर्व उद्योग समुहांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून महिन्याकाठी 1500 ते 2000 रक्तपिशव्या संकलन करण्याबाबत आश्वस्त केले आहे. त्यानुसार वर्षभराचा कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी व्हीसीद्वारे चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मधूसुदन रुंगठा यांच्यासह माणिकगड सिमेंट उद्योग, अंबुजा सिमेंट, एसीसी सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंट, चंद्रपूर, वणी क्षेत्रातील वेस्टर्न कोल्ड फिल्ड, चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र, महा. इलेक्ट्रोस्मेल्ट लिमिटेड, जी.एम.आर. गृप लिमिटेड, धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमि., लॉयड्स मेटल ॲन्ड इंजिनियरींग लिमि., गोपानी आयर्न ॲन्ड पॉवर प्रा. लिमि., बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रॉडक्टस्‍, ग्रेस इंडस्ट्रिज लिमि., राजुरा स्टील प्रा. लिमि., मल्टी ऑर्गनिक प्रा. लि, चमन मेटॅलिक प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापक उपस्थित होते.

0000000