Search This Blog

Wednesday, 3 November 2021

वसतीगृहासाठी इमारत किरायाने देणेबाबत इमारत मालकांनी प्रस्ताव सादर करावेत


वसतीगृहासाठी इमारत किरायाने देणेबाबत इमारत मालकांनी प्रस्ताव सादर करावेत

चंद्रपूर दि. 3 नोव्हेंबर: विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुलांसाठी 18 व मुलींसाठी 18 असे एकूण 36 शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने सद्यस्थितीत जिल्ह्याच्या ठिकाणी मुला-मुलींसाठी प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृहे भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू करण्यासाठी इमारत मालकांकडून इमारत किरायाने,भाड्याने देणेबाबत प्रस्ताव मागविण्यात येत आहे. सदर इमारतीमध्ये 100 विद्यार्थ्यांकरीता निवासी खोल्या, संगणक कक्ष, ग्रंथालय, भोजन गृह, स्वयंपाक गृह , 10 ते 15 स्वच्छतागृह तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुबलक प्रमाणात असणे आवश्यक असून मोकळी जागा असणे आवश्यक आहे.

तरी,वरील वर्णनाची इमारत भाड्याने द्यावयाची असल्यास त्यासंबंधीचे प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, शासकीय दुध डेअरी जवळ, जलनगर वॉर्ड चंद्रपुर येथील कार्यालयास दि. 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावेत किंवा कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.

00000

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) या संस्थेत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) या संस्थेत

प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर दि. 3 नोव्हेंबर: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) चंद्रपूर या संस्थेत ड्रेस मेकिंग, फ्रुट अँड वेजिटेबल प्रोसेसिंग, बेकर अंड कन्फेक्शनर, सेक्रेटरियल प्रॅक्टिस (इंग्लिश) बेसिक कॉस्मेटोलॉजी व स्युईंग टेक्नॉलॉजी या सहा व्यावसायिक कोर्सच्या जागा रिक्त आहेत.

प्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्ली यांनी सदर कोर्सच्या प्रवेशाची अंतिम तारीख दि. 18 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविली असल्याने, तसेच विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नव्याने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे तसेच प्रवेश अर्ज शुल्क भरणे याकरिता दि. 1 ते 7 नोव्हेंबर 2021 रोजी 11 ते 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत https://admission.det.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज सादर करावे व उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा. तसेच शासकीय प्रवेश पद्धती, नियमावली, प्रदेश संकेतस्थळाबाबत काही तांत्रिक अडचण व अनुषंगिक शंका असल्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), चंद्रपूर येथे संपर्क साधावा. असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या पी.एच दहाटे यांनी कळविले आहे.

00000 

कुष्ठरोगाने येणाऱ्या विकृतीवर मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन


कुष्ठरोगाने येणाऱ्या विकृतीवर मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

चंद्रपूर दि. 3 नोव्हेंबर:  जिल्हा कुष्ठरोग कार्यालयाच्या वतीने दि. 10 ते 12 नोव्हेंबर 2021 या कालावधीत चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील कुष्ठरोगाची विकृती असणाऱ्या रुग्णांवर तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करुन शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याकरीता शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, चंद्रपूर येथे मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

या शिबीरात विकृती रुग्णांची तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येणार असुन कुष्ठरोगामुळे डोळे, हात किंवा पाय शरिराच्या या भागावर असलेल्या विकृतीवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. विकृती रुग्णांची तपासणी व अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी भारत सरकारचे एम.एस.ऑर्थो सल्लागार,आर.एल.टी आर.आय रायपूर सी.जी , डॉ.कृष्णमृर्ती कांबळे व त्यांची टिम उपस्थित राहणार आहे.

विकृती रुग्णांना शिबीराच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. शिबीरातुन जास्तीत जास्त रुग्ण तज्ञांमार्फत तपासुन शस्त्रक्रिया करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे यांनी वैद्यकिय महाविद्यालयाकडून औषधी व साहित्याची सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. याकरीता अर्लट इंडिया, मुंबई या निमशासकिय स्वंयसेवी संस्थेकडूनही तज्ञ लोकांची टिम विकृती रूग्णास तपासण्यासाठी उपस्थीत असणार आहे. रुग्णांच्या तपासणीअंती, काही विकृती रुग्णास शस्त्रक्रियेची गरज नसल्यास अशा विकृती रुग्णांना त्यांना आवश्यक असणारे भौतिक उपचार साधणाचे वाटप करण्यात येणार आहे.

            आपल्या कुंटूबात किंवा आपल्या परिचयात विकृती कुष्ठरुग्ण असल्यास अशा रुग्णांना शिबीरात आणुन चंद्रपूर जिल्हा, कुष्ठरुग्ण मुक्त करण्यास आपले बहुमूल्य सहकार्य करावे. याबाबत आपणास काही अडचण असल्यास तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत कुष्ठरुग्ण कर्मचारी अथवा आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा.

तरी, या शिबीराचा लाभ घेण्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील सर्व तालुक्यातील विकृती रुग्णांना घेऊन येण्याचे आवाहन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, शासकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत व कुष्ठरोग कार्यालयाचे प्रमुख डॉ.संदिप गेडाम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी यांना केले आहे.

00000

Tuesday, 2 November 2021

मंगळवारी जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त, 1 बाधित

 

मंगळवारी जिल्ह्यात कोरोनामुक्त, 1 बाधित

Ø ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 14

चंद्रपूरदि. 2 नोव्हेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसारबाधित आलेल्या रुग्णांमध्ये कोरपना येथे 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रचंद्रपूरबल्लारपूरभद्रावतीब्रम्हपुरीनागभीडसिंदेवाहीमुलसावलीपोंभूर्णागाेंडपिपरीराजूराचिमूरवरोराजिवती व इतर  ठिकाणी बाधित रुगांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 815 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 259 झाली आहे. सध्या 14 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत लाख 36 हजार 377 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी लाख 46 हजार 244 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

जिल्ह्याधिका-यांच्या संकल्पनेतून 10 दिवसांत 2604 वनराई बंधा-यांची निर्मिती



जिल्ह्याधिका-यांच्या संकल्पनेतून 10 दिवसांत 2604 वनराई बंधा-यांची निर्मिती

Ø शेतकऱ्यांसाठी होणार संरक्षित सिंचनाची सोय

Ø लोकसहभागातून जिल्ह्यात पाच हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट

चंद्रपूरदि. 2 नोव्हेंबर : शेतकऱ्यांना खरीपासोबत रब्बी आणि उन्हाळी पिके घेण्याची सोय झाली तर त्यांचे उत्पन्न वाढेल. दोन पैसे हाती येईल. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्यास मदत होईलया जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाने यांच्या अभिनव संकल्पनेतून जिल्ह्यात " वनराई बंधारा" ची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत केवळ 10 दिवसात जिल्ह्यात लोकसहभागातून 2604 वनराई बंधारे बांधण्यात आले आहे.

जिल्ह्यात 5 हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट असून आतापर्यंत प्रत्येक दिवशी सरासरी 260 याप्रमाणे दहा दिवसांत 2604 बंधारे बांधण्यात आले आहे. जिल्ह्यात लोकसहभागातून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात स्थानिक प्रशासनलोकप्रतिनिधिनागरिकविद्यार्थी आदिंचा सहभाग आहे. बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता पाहून प्रति बंधारा कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 25 एकरापर्यंत सिंचनाची सोय होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात वनराई बंधा-याच्या माध्यमातून 40 ते 45 हजार एकरवर सिंचन निर्मिती होण्यास मदत होईल. जिल्ह्यात विहिरींची संख्या कमी आहे आणि बोरवेलसाठी सुद्धा मर्यादा आहेत. त्यामुळे ठिबक सिंचनाचा लाभ पाहिजे त्या प्रमाणात देता येत नाही. त्यामुळे वनराई बंधाऱ्याचा पाण्याचा स्त्रोत असेल तर शेतकरी गटांना ठिबक सिंचनाचा लाभ देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने घेतला आहे.

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चंद्रपूर तालुक्यात 210 बंधारेबल्लारपूर 240, मुल 270, सावली 130, वरोरा 152, चिमूर 120, भद्रावती 145, नागभीड 180, ब्रह्मपुरी 215, सिंदेवाही 157, राजुरा 245, गोंडपिपरी 210, पोंभुर्णा 120, कोरपना 140 तर जिवती 70 असे एकूण 2604 बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे.

सहज बांधता येईल असा वनराई बंधारा :

12 मीटर पर्यंतचा वनराई बंधारा बांधण्यासाठी 700 ते 800 रिकामी पोतीघमेलीफावडा व प्रवाहाच्या आजूबाजूला असलेली माती एवढ्या गोष्टीची आवश्यकता असते. बांधकाम करताना भरलेल्या मातेच्या पिशव्या दोरीने शिवुन तयार कराव्यात. वनराई बंधारा बांधत असतांनाजागेची निवड करतांना ओढ्याची रुंदी कमी असावी. पाणी साठा भरपूर प्रमाणात होईल याची दक्षता घ्यावी. बंधाऱ्याचे दोन्ही काठ हे चांगल्या पद्धतीचे असले पाहिजे.

बंधारा बांधायला सुरूवात करण्यापूर्वी प्रवाहवरील दगड व गाळ काढून साफ करून घ्यावा. जेणेकरून बंधाऱ्याच्या खाली राहणाऱ्या मोकळ्या जागेतून पाणी वाहून जाणार नाही. 0.60 मीटर रुंदीच्या पोत्याच्या दोन रांगा प्रथम तयार कराव्यात. त्यांच्यामध्ये 0.30 मीटरचा गॅप ठेवावा. काही ऊंचीपर्यंत पोत्याचे थर तयार करावेतअशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली.

00000