Search This Blog

Monday, 2 September 2024

'महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


'महाराष्ट्र माझाछायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेत

सहभागी होण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम

मुंबई दि. 01 : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने  ही स्पर्धा  जाहीर केली आहे.महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित 'महाराष्ट्र माझाछायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ होती. सहभागासाठी मुदतवाढ देण्यात आली असून ही ताहरख आता १५ सप्टेंबर २०२४ अशी करण्यात आली आहे.

        'महाराष्ट्र माझा' या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचे कृषी, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, जलसंधारण, जलसंपदा, पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन आणि पर्यावरण, वने आदी योजनांशी संबंधित छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेसाठी पाठवता येतील.

         निवड झालेल्या छायाचित्र, रिल्स आणि लघुपटांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे २५ हजार रुपये, २० हजार रुपये आणि १५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान केले जाणार असून तीन हजार रुपयांची पंधरा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्राप्त झालेल्या छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच रिल्स आणि लघुपटांना शासनाच्या समाजमाध्यमांवरून प्रसिद्धी देण्यात येईल. राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची, प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे.


                                           
स्पर्धेची नियमावली
छायाचित्रण स्पर्धा :

* छायाचित्रे १८x३० इंच HD च्या मानक आकाराची असावीत.
*
छायाचित्राची संकल्पना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सुचविलेल्या संकल्पनेशी सुसंगत असावी.
*
छायाचित्र ही स्वतःची सर्जनशीलता असावी.
*
छायाचित्रांमध्ये कोणतेही अनुचित दृश्य नसावेत.
*
कोणतीही कॉपीराईट सामग्री वापरली जाऊ नये.
*
छायाचित्राचे तपशीलवार वर्णन अपेक्षित आहे.
*
स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे छायाचित्रांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे असतील.
रिल्स स्पर्धा
*
रिल्ससाठी वेळ मर्यादा कमाल १ मिनिटांपर्यंत असावी.
*
असभ्य भाषा, आक्षेपार्ह शब्द याचा वापर यामध्ये करता येणार नाही.
*
कोणतेही स्वामित्व अधिकारांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी.
*
एकाधिक नोंदींना परवानगी नाही.
*
स्पर्धा १८ वर्षे आणि त्यावरील सर्वांसाठी खुली असेल.
*
मानक रिल्स स्वरूप अपेक्षित आहे.
*
रिल्स नवीन असणे आवश्यक आहे आणि विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केले पाहिजे.
*
स्पर्धेत भाग  सादर केलेल्या रील्सचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे असतील.
लघुपट स्पर्धा
*
लघुपटाचा अवधी किमान ३ मिनिटे ते कमाल ५ मिनिटे इतका असावा.
*
या स्पर्धेत १८ वर्षावरील कुणीही भाग घेऊ शकतात.
*
लघुपट नवीन असणे आवश्यक आहे. लघुपट विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केलेला असावा.
*
अभद्र भाषा, हिंसा, आक्षेपार्ह अपशब्द वापरला जाणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.
*
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी महाराष्ट्र शासनाने नमूद केलेल्या संकल्पना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारे लघुपट सादर करणे आवश्यक आहे.
*
कोणतेही स्वामित्व अधिकाराचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी.
*
एकाधिक नोंदींना परवानगी नाही.
*
मानक व्हिडिओ स्वरूप MP HD १९२० * १०८० अपेक्षित आहे. स्वतंत्र YouTube स्वरूप / X स्वरूप असावे.
*
लघुपट मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत बनवला आहे, याची खात्री करावी.
*
लघुपट HD format मध्ये सबमिट करावा.

भाग घेतलेल्यांचे लघुपटांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे असतील.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी dgiprdlo@gmail.com या ई-मेल आयडीवर १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत  स्पर्धेनुसार छायाचित्र, रिल्व किंवा लघुपट पाठवावीत. सोबत आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाइल नंबर आणि छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे, याची माहिती देणे आवश्यक आहे.

००००० 

Sunday, 1 September 2024

रुग्णसेवेचे कार्य आयुष्यात सर्वोपरी - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार






 

रुग्णसेवेचे कार्य आयुष्यात सर्वोपरी - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø दुर्गापूर येथे निःशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन

चंद्रपूर,दि.०१- माणूस कितीही मोठा धनवान असू देतताप आल्यावर अन्न सुद्धा कडू लागतं. नोटा आणि सोने पुढे ठेवले म्हणजे प्रकृती बरी होत नाही. त्यासाठी प्रकृती ठणठणीत ठेवण्याशिवाय पर्याय नाही.आरोग्य सुदृढ ठेवायला अशी शिबिरे आणि डॉक्टरांचे मार्गदर्शनच महत्वाचे आहे. आपले अध्यात्म आणि आपली संस्कृती आपल्याला रुग्ण सेवेचीच शिकवण देतो. त्यामुळे आयुष्यात रुग्णसेवेचे कार्य सर्वोपरी आहेअसे प्रतिपादन राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (रविवारी ) केले.

दुर्गापूर येथील सेंटमेरी हायस्कुल येथे निःशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री. मुनगंटीवार बोलते होते. व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारेआशा हॉस्पिटलचे डॉ. सौरव अग्रवालओसेसर कँसर हॉस्पिटलचे डॉ. भोयरशंकरा सुपर हॉस्पिटलचे डॉ. जितेंद्र यादवआशा हॉस्पिटलचे जयहरी सिंग ठाकूरकारमेल अकादमीचे प्रिन्सिपल फादर जॉयसेनसेंट मेरीच्या सिस्टर टॉम्सीवैद्यकीय अधिकारी कोमल मुनेश्वरशासकीय कर्मचारी आदी उपस्थित होते. 

आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर मिळणारा आनंद कुठल्याही आनंदापेक्षा मोठा आहे. रुग्णांद्वारे मिळणाऱ्या आशिर्वादातून जन्मोजन्मीची शक्ती प्राप्त होते. रुग्णसेवेचे हे पुण्य पुढचे अनेक जन्म कामी येईलअशी भावनाही श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

जातीच्यावंशाच्यारंगाच्या पलीकडे जाऊन रुग्णसेवा केल्यास त्याचे कायम स्मरण राहते. ही सेवा आपल्या आयुष्यात बोनस पॉईंट ठरते. अशा सेवेसाठी आम्ही कायम पुढे असतो. या मतदारसंघात आरोग्य शिबीरदिव्यांगांसाठी कार्यक्रमगोर गरिबांची सेवा सातत्याने सुरु असते. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदानही मी दुप्पट केले आहे,’ असे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राज्यातील २ कोटी ४८ लाख माता-भगिनींच्या खात्यात थेट 1500 रुपये जमा होत आहेत. या बहिणींचीत्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून उत्पन्नाची अट देखील नाही. जीवनदायी योजनेमध्ये त्यांचा खर्च उचलण्याचा संकल्प आपण केला. शासनाच्या अशा कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील 'स्त्री'ला कुणासमोर हात पसरायची वेळ आता येणार नाही. ती हिमतीने समाजात उभी राहू शकेल. आम्ही कधीजातीधर्म वंश पहिला नाही. आपला धर्म हा मानवतेचा धर्म असला पाहिजे,’ असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

जिल्ह्यात कर्करोग रुग्णालय

जिल्हात आपण १४० खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारत असून याचा उपयोग जिल्ह्यातील रुग्णांना होईल. एक धर्मशाळा देखील उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. केवळ चंद्रपूर नव्हे तर परिसरातील प्रत्येकाला हे आरोग्य मंदिर वाटेलअशी त्या मागची संकल्पना आहेअसेही ते म्हणाले.

दिव्यांगनेत्र रुग्णांची सेवा

मनापासून सेवा करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले. परिवारातील सदस्यांप्रमाणे रुग्णांची सेवा करत आहे. यापूर्वी,नेत्र चिकित्सा शिबिरातून ५० हजार रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. ५ हजारांपेक्षा जास्त मोतीबिंदू ऑपरेशन केले. ३५ हजारांहून अधिक जास्त चष्मे दिलेअसेही ते आवर्जून म्हणाले.

मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया

लहान मुलांच्या हृदय शास्त्रक्रियेकरिता खाजगी रुग्णालयात १० लाख रुपये लागत असताना या शस्त्रक्रिया मुंबईतील फोर्टीज हॉस्पिटलच्या चमूद्वारे मोफत करून देण्यात आल्या. २ ते १० वर्षांपर्यंतच्या ६० लहान मुलांचे ऑपरेशन करण्यात आलेयाचाही त्यांनी उल्लेख केला. ऑपरेशननंतर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान देणारा होता.अशी भावनाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

रामपाल सिंगहनुमान काकडेअनिता भोयरकेमा रायपुरेरोशनी खानसर्व माजी जिल्हा परिषदपंचायत समिती सदस्य आदी उपस्थित होते.

00000000

वन विभागाला प्रत्येक क्षेत्रात ‘नंबर वन’ करा!

 





वन विभागाला प्रत्येक क्षेत्रात 
नंबर वन’ करा!

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

Ø नागपूरमध्ये महिला वन कर्मचारी व अधिकारी परिषदेचे आयोजन

चंद्रपूर,दि.१ : राज्यामध्ये असलेल्या एकूण सर्व विभागांपैकी सर्वात मोठी जबादारी वन विभागावर आहे. देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत वन विभागाचे सर्वाधिक बजेट महाराष्ट्राचे आहे. वन संवर्धनसंरक्षण हे ईश्वरीय कार्य आहेयामध्ये आई’ प्रमाणे अत्यंत निष्ठेने आणि जबाबदारीने काम करणाऱ्या महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांचा अभिमान वाटतो. आता प्रत्येक क्षेत्रात वन विभागाला नंबर वन करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे याअसे आवाहन राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सदर (नागपूर) येथील नियोजन भवन सभागृहात आयोजित महिला वन कर्मचारी व अधिकारी परिषदेत ते बोलत होते. वन विभागाद्वारे आयोजित महिला अधिकारी कर्मचारी यांच्या परिषदेला उपस्थित प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता विश्वासप्रधान मुख्य वन संरक्षक एम.श्रीनिवास रावमुख्य महाव्यवस्थापक एफडीसीएम संजीव गौडअतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाणनरेश झुरमुरेकल्याणकुमारमुख्य वन संरक्षक अमरावती ज्योती बॅनर्जीमुख्य वन संरक्षक नागपूर श्री लक्ष्मी एवनसंरक्षक यवतमाळ वसंत घुलेफिल्ड डायरेक्टर आदर्श रेड्डीविभागाचे अधिकारीमहिला अधिकारी व कर्मचारी आदींची यावेळी उपस्थिती होती.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, ‘महाराष्ट्र शासनामध्ये प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. वनविभागाच्या प्रमुख पदीदेखील शोमिता विश्वास असल्याबाबत नामोल्लेख केला. याचा मनापासून आनंद झाला. महाराष्ट्र हा देशात सर्वाधिक हरितक्षेत्र असलेला प्रदेश असल्याचा अभिमान आहे. यासाठी आपल्यासारख्या महिला अधिकाऱ्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. वृक्ष लागवड असोवन्यजीव संरक्षण असो कि मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचे आव्हान वनविभागातील महिला अधिकारी आणि कर्मचारी कुठेही कमी पडलेल्या नाहीत. महिला म्हणून विशेष सवलत मिळविण्यापेक्षा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच गतीने काम करणाऱ्या वन विभागातील महिला कर्मचारी आणि अधिकारी निश्चितच सर्वांसाठी आदर्श आहेत.

हे तर ईश्वरीय कार्य

वनविभागाचे कार्य हे ईश्वरीय कार्य आहे. वनविभाग हा आमच्यासाठी एक केवळ विभाग नसून ही एक फॅमिली आहे. सर्वांनी परिवार समजून कार्य केलं पाहिजे. महिला अधिकारी आणि कर्मचारी परिषदेमधून चर्चा आणि संवाद वाढावा यासाठी दरवर्षी अशा परिषदेचे आयोजन करावे. सोबतच महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी विभागीय स्तरावर व राज्यस्तरावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावेअशा सूचनाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

0000000