Search This Blog

Thursday, 7 November 2024

10 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा

 10 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा

चंद्रपूरदि. 7 :  महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत 10 नोव्हेंबर 2024 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार असून चंद्रपूर जिल्ह्यात ही परीक्षा एकूण 17 केंद्रावर दोन सत्रामध्ये होणार आहे. जिल्ह्यातील 7890  उमेदवार ही परीक्षा देणार आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर -1 करीता 2914 उमेदवार व पेपर-2 करीता 4896 उमेदवार परीक्षा देणार असून परीक्षेची सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व दुपारी 2.30 ते सांय.5 वाजेपर्यंत आहे. परीक्षार्थ्यांना सकाळच्या पेपरला 10.10 वाजेपर्यंत पर्यंत तर दुपारच्या पेपरला 2.10 वाजेपर्यंत परीक्षा दालनात येण्याची परवानगी राहील.  सदर परीक्षेदरम्यान सी.सी.टी.व्ही. कॅमेरे राहणार आहे. कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार झाल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल. तसेच परीक्षेकरीता मुळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्यामध्ये आधार कार्डमतदान कार्डपॅन कार्डड्राव्हींग लायसन्स कोणतेही एक ओळखपत्र अनिवार्य राहील, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अश्विनी यांनी कळविले आहे.

००००००

मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर विविध पथकांद्वारे नियंत्रण


 मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर विविध पथकांद्वारे नियंत्रण

Ø जिल्हाधिका-यांच्या सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांना सुचना

चंद्रपूरदि. 7 : मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर सर्वसाधारण नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथके कार्यान्वित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांना पथकाबाबत पुर्तता करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

विधानसभा मतदारसंघाकरीता मतदारसंघ नियंत्रण कक्ष : प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना करणे. नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून एका अनुभवी वरिष्ठ अधिका-याची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करणे तसेच त्यांचे नाव, संपर्क क्रमांक, मेल आयडी जिल्हा नियंत्रण कक्षाकडे सादर करणे. सदर अधिका-याला जिल्हा नियंत्रण कक्षातील समन्वय अधिका-यांच्या संपर्कात राहण्याबाबत निर्देशित करणे. नियंत्रण कक्षाअंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरीता मतदानाच्या दिवशी सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरीता विविध पथकांची नेमणूक करणे.

संपर्क व्यवस्था पथक : पथक प्रमुख म्हणून एका जबाबदार अधिका-याची नेमणूक करावी. पथक प्रमुखांनी क्षेत्रीय अधिकारी व मतदान केंद्राध्यक्ष यांना संपर्क साधून आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे मतदानाची आकडेवारी व इतर अहवाल प्राप्त करून घेण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांनी नेमणूक करावी. या पथकास आवश्यक ते नमुने उपलब्ध करून द्यावे व कामकाजाबाबत आवश्यक प्रशिक्षण घ्यावे.

मुलभूत सोयी-सुविधा/ साहित्य समन्वय पथक : सदर पथक प्रमुखाने मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मुलभूत सोयीसुविधा, मतदानाशी संबंधित साहित्य/ ईव्हीएमची पुरेशी व्यवस्था असल्याबाबत खात्री करावी व ज्या सुविधा उपलब्ध नाहीत, त्या तात्काळ उपलब्ध करून घ्याव्यात. जेणेकरून मतदान प्रक्रियेमध्ये कोणताही खंड पडणार नाही. पथक प्रमुखांना या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याचा अहवाल मतदानाच्या चार दिवसांपूर्वी म्हणजे 16 नोव्हेंबर पर्यंत निवडणूक निर्णय अधिका-यांना सादर करावा.

वेबकास्टींग मॉनेटरिंग पथक : पथक प्रमुखांना सहाय्य करण्यासाठी वेबकास्टींग असणा-या प्रत्येक 40-50 मतदान केंद्राच्या मॉनेटरिंग करीता एका कर्मचा-याची नेमणूक करावी. मतदान केंद्रावर घडणा-या आक्षेपार्ह बाबी निदर्शनास येताच सदर बाब मतदान केंद्राचे नाव, नंबरसह संबंधित पथक प्रमुखांच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अवगत करावी.

जीपीएस मॉनेटरींग पथक : 8 ते 10 क्षेत्रीय अधिका-यांच्या मॉनेटरींग करीता एका कर्मचा-याची नेमणूक करावी. सर्व क्षेत्रीय अधिकारी फिरते राहतील तसेच कोणताही क्षेत्रीय अधिकारी मतदान केंद्र व्यतिरिक्त दुस-या ठिकाणी थांबणार नाही, याबाबत मॉनेटरींग करावे. कायदा सुव्यवस्था / मतदान केंद्रावरील तक्रारी / ईव्हीएमबाबत तक्रारी, संपर्क व्यवस्था पथकामधील नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्यास संबंधित क्षेत्रीय अधिका-यांना कळविण्याची कार्यवाही करावी.

मिडीया मॉनेटरींग पथक : पथक प्रमुख म्हणून एका जबाबदार अधिका-याची नेमणूक करणे व त्यास सहाय्य करण्यासाठी पुरेशा कर्मचा-यांची नियुक्ती करणे. मतदानाच्या दिवशी संबंधित विधानसभा मतदार संघामध्ये प्रसारीत होणा-या बातम्या तात्काळ संबंधित निवडणूक निर्णय अधिका-यांच्या निदर्शनास आणून देणे. मतदानासंबंधित बातम्यांचे निरीक्षण करण्याकरीता स्थानिक केबल नेटवर्कसह राज्य/राष्ट्रीय पातळीवरील बातम्या प्रसारीत होणारे चॅनल्स व टीव्हीसंच उपलब्ध करून द्यावेत.

 जलद प्रतिसाद पथक : पथक प्रमख म्हणून तहसीलदार यांची नेमणूक करावी. मतदान केंद्राचे भौगोलिक दृष्ट्या स्थान व मतदान केंद्रावर तात्काळ पोहचणारे दळणवळणाचे मार्ग गृहीत धरून आवश्यक तेवढ्या जलद प्रतिसाद पथकाची नेमणूक करणे. सदर पथकामध्ये मतदान प्रक्रियेबाबत जाणकार व ईव्हीएम- व्हीव्हीपॅट कार्यप्रणाली अवगत असणा-या कर्मचा-याची नेमणूक करावी. आवश्यकतेच्या वेळी सदर पथक आवश्यक त्या ठिकाणी / मतदान केंद्रावर पोहचून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विषयाची हाताळणी करण्याबाबत नियेाजन करावे.

            मतदानाच्या दिवशी नियंत्रण व नियोजनाबाबत सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिका-यांनी योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.

०००००

Wednesday, 6 November 2024

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- हिर्देशकुमार

 विधानसभा निवडणूक २०२४





निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- हिर्देशकुमार

Ø पूर्वतयारी आढावा बैठकीत आयोगाचे निर्देश

छत्रपती संभाजीनगरदि.६ (जिमाका):- निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये याची खबरदारी  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावेअसे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त  हिर्देशकुमार यांनी आज निवडणूक यंत्रणांना दिले.

येथील स्मार्ट सिटी कार्यालयात छत्रपती संभाजीनगरनागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगमअति.मुख्य निवडणूक अधिकारी बी. प्रदीपकुमारउपसचिव सुमनकुमारसंजयकुमारअभिलाष कुमारअनिलकुमारअविनाशकुमार तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडेमनपा आयुक्त जी.श्रीकांतजिल्हाधिकारी दिलीप स्वामीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीनाछत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रापोलीस आयुक्त प्रविण पवारपोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते.

प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता जपा

प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणूक निर्णय अधिकारी यांनाच सर्व प्रक्रिया राबवावयाची आहे. राबवित असलेल्या निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षउमेदवार यांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी व प्रक्रिया राबवावी. त्याचे दस्तऐवजीकरण करावे. त्यांचे शंकानिरसन करावे. निवडणूक प्रक्रिया राबवितांना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,असे हिर्देशकुमार यांनी सांगितले.

मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवा

मतदार याद्यांबाबतही योग्य ती काळजी घेऊन त्या याद्या अधिक बिनचूक असाव्यात. प्रत्येक मतदारापर्यंत मतदान चिठ्ठ्या वेळत पोहोचतील याचे नियोजन करा. मतदार याद्यांविषयी असलेल्या तक्रारींबाबत तात्काळ दखल घ्यावी.  मतदान केंद्रांबाबतही सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. प्रत्येक मतदान केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्थातात्पुरत्या मतदान केंद्रांची मान्यता घेणेमतदान केंद्राचे ठिकाण बदलले असल्यास त्याबाबत मतदारांपर्यंत माहिती पोहोचविणेत्याची प्रसिद्धी करणेविशेष मतदान केंद्रांची निर्मिती करणे जसे. पर्यावरणपूरकमहिलांनीदिव्यांग कर्मचाऱ्यांनी संचलित केलेले इमतदान केंद्रांवर पिण्याचे पाणीरॅम्पसावली इ. सुविधांची निर्मितीतसेच वेब कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेरे लावून मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करणेमतदान केंद्राच्या बाहेर व आत कॅमेरे लावावे इ. सुचना दिल्या. तसेच या सर्व सुविधांची पूर्तता झाल्याबाबत व आवश्यकतांबाबत स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारीपोलीस अधीक्षकपोलीस आयुक्त यांनी स्वतः पाहणी करुन खातरजमा करावी,असे निर्देशही देण्यात आले.

यंदा मतदान हे नोव्हेंबर महिन्यात असून आता सुर्यास्त लवकर होईलअशा वेळी सायंकाळी मतदान केंद्रांवर पुरेशा प्रकाशासाठी दिवे लावण्याची सुविधा करावी,अशी सुचना देण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्रात मोबाईल नेता येणार नाहीयाबाबत योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. टपाली मतदान व गृह मतदान प्रक्रियेबाबतही यंत्रणांनी पूर्ण प्रक्रिया व्यवस्थित राबवावी. गृह मतदान कार्यक्रम अगोदर जाहीर करावा. त्याबाबत उमेदवारांना कळवावे.

मतदान कर्मचाऱ्यांसाठी सुविधा द्या

निवडणूक कामकाजासाठी लागणारे पुरेस मनुष्यबळ उपलब्ध असल्याची खात्री करावी. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जेवणपिण्याचे पाणीकामकाजाची सुविधामतदान केंद्रांवर गेल्यावर मुक्काममुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतासुरक्षितताभोजनपाणी याबाबतची व्यवस्था पुरविण्यात यावी. महिला कर्मचाऱ्यांना विशेष सुरक्षा व सोयी सुविधा द्याव्या. निवडणूक कामकाजात कर्मचाऱ्यांना अचानक उद्भवणाऱ्या आजारांसाठी तात्काळ वैद्यकीय सेवा देण्याचे नियोजन असावे. त्यासाठी स्थानिक पातळीवर रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवाव्या. प्रत्येक निवडणूक कर्मचाऱ्याची योग्य काळजी घेतली जाईलयाची खबरदारी घ्यावी.

सी व्हिजील वरील तक्रारींचे तात्काळ निराकरण करा

प्रत्येक जिल्ह्यात व विधानसभा क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी  सर्व संलग्न जिल्ह्यांच्या पोलीस यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवावा. मद्यअंमलीपदार्थमौल्यवान वस्तूरोकड यांच्या अवैध वाहतुकीवर नजर ठेवून कारवाई करावी. याबाबत सी व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करावी. या तक्रारींचे तात्काळ निराकरण  झाले पाहिजेयाबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले.

फेक न्यूजला तात्काळ पायबंद

निवडणूक काळात माध्यमांमध्ये येणाऱ्या बनावट बातम्याफेक न्यूज अर्थात खोट्या माहितीचे प्रसारण तात्काळ रोखावे. खोटी माहिती असल्यास तिचे प्रसारण रोखून सत्य माहितीचे तात्काळ प्रसारण करावे.  याबाबत या विभागाशी संबंधित बातम्या असतील त्यांनी तात्काळ योग्य माहिती पुरवावी व वस्तूस्थिती जनतेसमोर मांडावीजेणेकरुन निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होणार नाही व त्याबाबत गैरसमज निर्माण होणार नाही.

मतदार जनजागृतीवर भर द्या

मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी आयोगामार्फत लवकरच स्विप’ उपक्रम मोठ्याप्रमाणावर राबविले जाणार आहेत. ते सर्व उपक्रम आपल्या विधानसभा क्षेत्रात राबवावे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करावे. मतदारांना मतदान करणे सोईचे व सुलभ व्हावे यासाठी उपाययोजना राबवाव्या.

अचूक आकडेवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी

मतदानाचे प्रमाण नेमके कळावे व त्यातील आकडेवारीत अधिक अचूकता यावी यासाठी या निवडणूकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी विधानसभा मतदार संघस्तरावरजिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर नेमण्यात येणार आहे. मतदान टक्केवारीची आकडेवारी बुथनिहाय पडताळणी करुन मतदान टक्केवारी अचूक देण्यात येईल यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचेही निवडणूक उपायुक्त यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस. चोकलिंगम म्हणाले कीराजकीय पक्ष उमेदवारांना वेळोवेळी अद्यावत निर्णय व माहिती देऊन अवगत करावे.मतमोजणी साठी मतमोजणी केंद्राच्या पुनर्रचनेचा आराखडा नव्याने मंजूर करावयाचा असल्यास त्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावे. टपाली मतमोजणीबाबतच्या व्यवस्थेसह आराखडा मंजूर करावा. निवडणूक कामकाजाविषयी सर्व अहवाल वेळेत व अचूक पाठविणे आवश्यक आहे. त्यात कोणतीही दिरंगाई व हयगय खपवून घेतली जाणार नाही. सर्व आकडेवारी अचूक पाठवावी. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आपल्या अंतर्गतअसलेल्या सर्व विधानसभा क्षेत्रातील कामकाजावर लक्ष ठेवावे. पैशांचा वापर. माध्यमांमध्ये येणारी माहितीआणि असामाजिक तत्वांचा वावर याबाबत सजग राहून वेळीच कारवाई करावी.

यांची होती उपस्थिती

बैठकीस नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकरलातूरचे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे,नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत  राऊतपरभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेबीड जिल्हाधिकारी अविनाश पाठकलातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे,चंद्रपूर जिल्हाधिकारी . विनय गौडा जी सीगोंदिया जिल्हाधिकारी प्राजित नायरभंडारा जिल्हाधिकारी संजय कोलतेवाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी.एसवर्धा जिल्हाधिकारी राहूल कर्डिलेगडचिरोलीजिल्हाधिकारी संजय दैनेहिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयलधाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओबांसेलातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरेनागपुरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल तसेच बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सलनांदेड पोलीस अधीक्षक अबिनाश कुमारधाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव,गोंदिया पोलीस अधीक्षक  गोरख भामरे,चंद्रपूर पोलीस अधीक्षक रिना जानबंधू,लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंढेगडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पलपरभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी,  हिंगोली पोलीस अधीक्षक एस. डी. कोकाटेभंडारा पोलीस अधीक्षक नुरुल हसनवर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन  तसेच दुरदृष्य पद्धतीने  सर्व जिल्ह्यातील अधिकारी व या निवडणूकीसाठी नेमलेले निवडणूक आयोगाचे निरीक्षक सहभागी झाले होते..

00000000

निवडणूक आयोगाने घेतला जिल्हानिहाय पूर्वतयारीचा आढावा


 

निवडणूक आयोगाने घेतला जिल्हानिहाय पूर्वतयारीचा आढावा

Ø छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिका-यांची उपस्थिती

Ø ऑनलाईन पध्दतीने निवडणूक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित

चंद्रपूरदि. 6 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पुर्वतयारीचा जिल्हानिहाय आढावा आज (दि. 6) छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपआयुक्त हिर्देश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील प्रत्येक जिल्ह्याचा यावेळी आढावा घेण्यात आला. या बैठकीस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगमअति.मुख्य निवडणूक अधिकारी बी. प्रदीपकुमार यांच्यासह चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आदी उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये, याची खबरदारी  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावेअसे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांनी निवडणूक यंत्रणांना दिले.

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्य प्रणालीद्वारे सामान्य निवडणूक निरीक्षक संजयकुमार, आर. मुत्यालाराजु रेवुसंगिता सिंग, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक अवधेश पाठक, खर्च पथक निवडणूक निरीक्षक आदित्य बी. आणि धमेंद्र सिंह यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र माने (70-राजुरा), संजय पवार (71-चंद्रपूर), अजय चरडे (72- बल्लारपूर), पर्वणी पाटील (73-ब्रम्हपुरी), किशोर घाडगे (74- चिमूर) आणि दोन्तुला जेनित चंद्रा (75-वरोरा), उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.

यावेळी चंद्रपूर जिल्ह्याची संक्षिप्त माहिती, विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या (स्त्री, पुरुष व इतर), मतदान केंद्रांची माहिती, मतदान केंद्रावर पुरविण्यात येणा-या किमान मुलभूत सुविधा, सहाही मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार, जिल्ह्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची उपलब्धता, निवडणुकीसाठी उपलब्ध असलेले मनुष्यबळ, त्यांचे प्रशिक्षण, वाहतूक व्यवस्था आराखडा, वाहनांची उपलब्धता, विधानसभानिहाय करण्यात येणारे वेबकास्टींग, कायदा व सुव्यवस्था आदीबाबत माहिती देण्यात आली.

००००००


Saturday, 2 November 2024

वरोरा मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर रोजी

  

वरोरा मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर रोजी

Ø उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 2 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने 75 - वरोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. सदर खर्च तपासणी वेळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार प्रथम खर्च लेखा तपासणी शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी सोमवार दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपकोषागार अधिकारी कार्यालय, वरोरा येथे करण्यात येईल.

75- वरोरा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक धर्मेंद्र सिंग हे वरील दिनांकास व वेळेस उपकोषागार अधिकारी कार्यालय, वरोरा येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे वरोराचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दोन्तुला जेनित चंद्रा यांनी कळविले आहे.

००००००