Search This Blog

Monday, 27 April 2020

कोरोना संकटात जिल्ह्यातील पीक संरचनेत बदल करा : पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचे आवाहन


जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
चंद्रपूर, दि. 27 एप्रिल : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्याची अर्थव्यवस्था केवळ शेतीपूरक उपाययोजनांवर टिकणारी असणार आहे. त्यामुळे या परिस्थितीत पीक रचनेतील बदल व शेतीपूरक व्यवसायाला पूरक अशा उपाययोजना शेतकऱ्यांसाठी तयार करण्याची सूचना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे
        चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री यांच्यासह खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकरजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले,आमदार सुभाष धोटेकिशोर जोरगेवारकीर्तीकुमार भांगडियाप्रतिभाताई धानोरकर,जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील आदींसह कृषी विभाग व अन्य विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
        कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. याचा परिणाम स्थानिक प्रशासनापासून तर राज्य शासनापर्यंत सर्वांवरच होणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कृषी-आधारित मजबूत अर्थव्यवस्था कशी निर्माण होईलयाकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीमध्ये कोणते पीक घेतले पाहिजेत्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजेकमी मनुष्यबळात यांत्रिक शेतीचा कसा वापर केला पाहिजेतसेच शेतीपूरक जोड धंद्यांना प्रत्येक घराघरातून कशी चालना मिळाली पाहिजेयाकडे लक्ष वेधले जाईल अशा पद्धतीचे नियोजन खरीप हंगामासाठी करण्याचे त्यांनी कृषी विभागाला निर्देशित केले.
     यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी महत्वपूर्ण  सूचना केल्या. यामध्ये प्रामुख्याने कापूस उत्पादक भागामध्ये बोगस बीटी बियाणे नियंत्रित करणेकापसावरील फवारणी दरम्यान विषबाधा होऊ नये यासाठी सेफ्टी किट वापरणे,  तशा सूचना औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांना देणेआवश्यकतेनुसार स्थानिक स्तरावर देखील त्यासाठी निधी राखून ठेवणेराष्ट्रीयकृत बँकांमार्फत विनाअडथळा शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणेजिल्ह्यातील जमिनीची पत तपासणी अर्थात मृदा सर्वेक्षण योग्य पद्धतीने करणेशेतकऱ्यांना आवश्यक वीज जोडणी उपलब्ध करणेखत तुटवडा होणार नाही याची काळजी घेणेसध्याच्या परिस्थितीत योग्य ठरेल अशा पद्धतीचा पीक पॅटर्न शेतकऱ्यांना कार्यशाळांमार्फत सांगणेअशा सूचना करण्यात आल्या.
         सन 2020 मध्ये खरीप हंगामाकरिता 4 लक्ष 68 हजार 900 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये भात 1 लक्ष 80 हजारसोयाबीन 55 हजारकापूस 1 लक्ष 80 हजारतूर 44 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता जिल्ह्यात विविध पिकाकरिता एकूण 70 हजार 803 क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यास खरीप हंगामाकरिता 1 लक्ष 33 हजार 110 मेट्रीक टन रासायनिक खतांची आवश्यकता आहे. 25 एप्रिल जिल्ह्यात 7 हजार 457 मेट्रीक टन खत प्राप्त झाले आहे. 4 हजार 444 मेट्रीक टन खताची आतापर्यंत विक्री झालेली असून 24 हजार 802 मेट्रीक टन रासायनिक खत शिल्लक आहे.
उपस्थित आमदारांनी यावेळी शेतकऱ्यांना यावर्षी होणारा पतपुरवठागेल्या वर्षातील कर्जमाफीमध्ये मागे राहिलेले शेतकरीत्यांना पुरवण्यात येणारे कर्जत्यासाठीचे अडथळे यावर देखील चर्चा केली.
बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या काळामध्ये शेतकऱ्यांना सन्मानजनक वागणूक देत पुढील हंगामासाठी कर्ज वितरित करावेजिल्ह्यात मागेल त्याला ट्रॅक्टर योजना सुरू करावीअशी सूचना यावेळी खासदार सुरेश धानोरकर यांनी केली.आमदार सुभाष धोटे यांनी वैरण विकासदुध उत्पादन व पशु संवर्धन यासंदर्भात नियोजन करण्याची सूचना केली. आमदार किशोर जोरगेवारआमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी शेतकऱ्यांच्या छोट्या छोट्या गटांना प्रशिक्षण व अर्थार्जन करणाऱ्या पीक पद्धतीला चालना देण्याची सूचना केली.
आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा या भागात राबविण्यात आलेल्या महिलांची शेतीशाळा मोहीम जिल्हाभरात राबविण्याची मागणी केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी वर्षभराचे नियोजन सादर केले. यावेळी अतिशय मर्यादित स्वरूपात आवश्यक विभाग प्रमुख उपस्थित होते.
0000

Sunday, 26 April 2020

जिल्ह्यात 99 टक्के नियमित धान्य वाटप


Ø  केशरी शिधापत्रिका धारकांना 390 क्विंटल अन्नधान्य वाटप
Ø  शिवभोजन योजनेअंतर्गत 2738 थाली वाटप
Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø  इन्स्टिट्यूशन क्वॉरेन्टाईन मध्ये 110 नागरिक
Ø  247 प्रकरणात 13 लाखांवर दंड वसूल
चंद्रपूरदि.26 एप्रिल: चंद्रपूर जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वाटप या काळात पूर्ण झाले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभ योजनेअंतर्गत नियमित अन्नधान्य वाटप 99 टक्के पूर्ण झाले आहे. तर वरील योजनेतील नागरिकांना मानसी पाच किलो तांदूळ वाटपाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत जवळपास 17 लाख लोकांना अन्नधान्याचे वाटप आतापर्यंत करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 3 लक्ष 93 हजार 656 कार्डधारक असून जवळपास 17 लाख लोकांपर्यंत शासकीय अन्नधान्य पुरवठा वितरण व्यवस्थेतून हे वितरण केले जाते. या सर्व नागरिकांना एप्रिल महिन्याचे अन्नधान्य वाटप पूर्ण झाले आहे.
दरम्यानराज्यशासनाच्या शिव भोजन योजनेअंतर्गत जिल्ह्यात 16 ठिकाणी असाह्य ,विमनस्कनिराधार ,बेघर लोकांना तयार अन्नाचे वाटप केले जात आहे. उन्हाळ्यामध्ये चांगले अन्न देण्याबाबत शिव भोजन देणाऱ्या कंत्राटदारांना बजावण्यात आले असून तक्रार आल्यास कार्यवाही करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या चंद्रपूर येथे 6, वरोरा 2, भद्रावती बल्लारपूर मुल गोंडपिंपरी राजुरा सावली चिमूर ब्रह्मपुरी या तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी एक एक असे एकूण 16 केंद्र आहेत. या ठिकाणावरून जवळपास 3 हजार थाळी केवळ 5 रुपये किमतीमध्ये दिल्या जाते.
जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 110 आहे.कोरोना संसर्ग संशयित म्हणून 96 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील  88  स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 80 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 8 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातूनराज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 32 हजार 165 आहे. यापैकी 2 हजार 610 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 29 हजार 555 आहे.
नियमांचे पालन न झाल्यास होणार कारवाई:
नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 247 प्रकरणात एकूण 13 लाख 37 हजार 70 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या  58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 749 वाहने जप्त केली आहेत.प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील संपर्कासाठी अधिकृत दूरध्वनी क्रमांक:
जिल्ह्यातील नागरिकांनी कम्युनिटी किचनजेवणाची व्यवस्थासार्वजनिक स्वच्छता व सामान्य चौकशीसाठी महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार,अडचणी माहिती इत्यादींसाठी 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचारसमुपदेशनपाठपुरावाअॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्णप्रवाशांची चौकशीशहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता व सामान्य चौकशीसाठी  07172-251597, तसेच टोल फ्री क्रमांक 1077 यावरसुध्दा चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर संपर्क करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा 155-398 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000

Saturday, 25 April 2020

पुढील आदेश येईपर्यंत विनापरवाना कोणतीही दुकाने उघडू नका : जिल्हाधिकारी खेमनार


3 मे पर्यंत लॉकडाऊन काटेकोर पाळण्याचे प्रशासनाचे आदेश
Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø  80 नागरिकांचा अहवाल निगेटीव्ह
Ø  ज्यांना परवानगी तीच दुकाने उघडावी
Ø  धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली जमाव नको
Ø  मनपाच्या परवानगीशिवाय अन्नधान्याचे वाटप नको
चंद्रपूर, दि. 25 एप्रिल : जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. तसेच केंद्रीय गृह विभागाने काही सूचना दिल्या असल्यामुळे लॉकडाउनमध्ये शिथीलता आली,असे समजायचे कारण नाही. राज्य शासनाकडून अधिकृत आदेश आल्याशिवाय ज्यांना लिखित परवानगी दिलेली नाही. अशा कोणतेही व्यापारी प्रतिष्ठाने उघडू नये. जिल्ह्यातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत कायम आहेअसे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांसाठी जारी केलेल्या आजच्या व्हिडीओ संदेशमध्ये काही ठिकाणी परस्पर दुकाने उघडण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथिलता दिल्या गेलेली नाही. त्यामुळे लिखित परवानगी दिल्या गेलेल्या व्यापारी प्रतिष्ठानाशिवाय अन्य दुकाने उघडण्यात येऊ नये. राज्य शासनाकडून अधिकृत निर्णय आल्यानंतर व जिल्हा प्रशासनाने त्या संदर्भात लेखी आदेश दिल्यानंतरच याबाबतचा निर्णय घ्यावाअसे आवाहन त्यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र, नागपूर व यवतमाळ या 2 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील असून कोणीही प्रवेश केल्यास 14 दिवस कॉरेन्टाईन करण्यात येत आहे. त्यामुळे यातल्या प्रत्येक नागरिकांनी प्रशासनासोबत डोळ्यात तेल घालून यामध्ये एकही चूक होणार नाही. याकडे लक्ष वेधण्याचे स्पष्ट केले आहे.
 गावामध्ये अचानक साथ उद्भवल्यास काय करायचेकशा पद्धतीने व्यवस्था करायचीयासाठी आज चंद्रपूर शहरातील तीन प्रभागांमध्ये रंगीत तालीम करण्यात आली. याशिवाय जिल्ह्याच्या विविध भागात देखील मॉक ड्रिल अर्थात रंगीत तालीम करण्यात आली. यामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले होते. मात्र शहरात रुग्णांची वाढ झाल्याची अफवा काहींनी पसरवली असून अशा लोकांवर देखील कारवाई करण्यात येईलअसेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 शासनामार्फत निराश्रितनिराधार लोकांना जेवण पुरविल्या जाते. शिवभोजन योजनेची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.सोबतच आता केशरी शिधाकार्ड असणाऱ्या जनतेलाही अन्नधान्य पुरविल्या जात आहे. शहरात कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. मात्र, तयार अन्न किंवा अन्नधान्याची किट वाटप करण्याचे अधिकार फक्त महानगरपालिकेला शहरात दिले असून अन्य ठिकाणी राज्य शासनाचे कर्मचारी याबाबत काम करीत आहे. त्यामुळे कोणत्याही स्वयंसेवी संस्थेने यासाठी गोंधळ घालू नयेशहरात संचारबंदी सुरू असून अशा वेळी संचारबंदीचे नियम तोडल्यास आवश्यक कलमान्वये गुन्हे दाखल केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका व शासनाच्या यासंदर्भातील दूरध्वनीवर माहिती देण्याचे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यात या काळातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे ही त्यांनी सांगितले. कोरोना आजार संपर्कातून येतो त्यामुळे शारीरिक दूरी ठेवणे अतिशय अनिवार्य आहे. त्यादृष्टीने सण उत्सव साजरे करताना लक्ष ठेवावे. मेपर्यंत लॉकडाऊन कायम असून आतापर्यंत  जनतेने अतिशय संयमाने सहकार्य केले असून यापुढे देखील अशीच अपेक्षा राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही :
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार 25 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 96 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील  88  स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 80 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 8 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातूनराज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 32 हजार 13 आहे. यापैकी 2 हजार 535 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 29 हजार 478 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 106 आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन वेळोवेळी नागरिकांना सूचना देत आहे.दिलेल्या सुचनांचे पालन न करणाऱ्यांविरुध्द प्रशासन कडक कारवाई करत आहे. या कारवाईमध्ये जिल्ह्यातील 236 प्रकरणात एकूण 13 लाख 5 हजार 770 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या  58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 741 वाहने जप्त केली आहेत.
प्रशासनाने जारी केलेले नियम व सुचनांचे उल्लंघन केले तर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
            जिल्ह्यातील नागरिकांनी कम्युनिटी किचनजेवणाची व्यवस्थासार्वजनिक स्वच्छता व सामान्य चौकशीसाठी महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार,अडचणी माहिती इत्यादींसाठी 07172-25327507172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचारसमुपदेशनपाठपुरावाअॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्णप्रवाशांची चौकशीशहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता व सामान्य चौकशीसाठी  07172-251597तसेच टोल फ्री क्रमांक 1077 यावरसुध्दा चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर संपर्क करावा तसेच पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा 155-398 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल हे फेसबुक पेज तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000

जनआरोग्य योजनेतून आता कोविड ग्रस्त रुग्णांनाही लाभ रुग्णालयांनी ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज


चंद्रपूरदि. 25 एप्रिल: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्हातील गरजू,गरीब लाभार्थी रुग्णांकरिता जास्तीत जास्त लाभ देता यावा तसेच भविष्यात कोविड-19 ने ग्रस्त रुग्ण जिल्ह्यात आढळल्यास त्या योजनेचा लाभ देता यावा. या अनुषंगाने जास्तीत जास्त रुग्णालयाने योजनेत सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि महाराष्ट्र शासनाची महत्वाकांशी योजना अजूनमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत निवडक गंभीर आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया अंगीकृत रुग्णालयाच्या मार्फत पुरविण्यात येते. या योजनेअंतर्गत पिवळे, केशरी, अंत्योदय तथा अन्नपूर्णा राशन कार्ड धारक लाभार्थी कुटुंब असुन त्याकरिता योजनेच्या माध्यमातून प्रती वर्ष प्रती कुटुंब रूपये 1.50 लक्षापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपचार मोफत पुरविण्यात येते.
त्याचप्रमाणेआयुष्मान भारत -प्रधानमंत्री  जन आरोग्य योजना हि केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून याअंतर्गत लाभार्थी कुटुंबास प्रती वर्ष 5 लक्षापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण पुरविण्यात येते. या योजनेकरिता सामाजिक,आर्थिक व जातनिहाय जनगणना-2011 अंतर्गत यादीत समाविष्ट कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत. तरी,महाराष्ट्र शासनाने एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात रावविण्यात येते आहे. या योजनेअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तथा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील समाविष्ट लाभार्थीकरिता 996 व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाभार्थ्याकरिता 213 उपचारशस्त्रक्रियेचा असे एकूण 1209 उपचार तथा शस्त्रक्रियेचा समावेश विविध 34 स्पेशालिटी अंतर्गत योजनेत करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणेयोजनेअंतर्गत नव्याने समाविष्ट होणाऱ्या रुग्णालयांकरिता काही अटी शिथिल करण्यात आलेल्या अजून त्यात रुग्णालयास 30 बेड व आयसीयू आवशक्यता असून दुर्गम भागाकरिता 20 बेड विथ आयसीयू ‌ असणाऱ्या रुग्णालयाला सुद्धा समाविष्ट करण्यात येत आहेत. तसेचनव्या नियमानुमाररुग्णालयाची विभागणी ही फक्त 3 विभागात करण्यात येणार आहे. तरीइच्छुक रुग्णालयांनी  www.jeevandayee.gov.in या वेबसाईटवर योजनेत समाविष्ट होण्याकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करावेत. इच्छुक रुग्णालयांनी  ऑनलाइन अर्ज करतांना बॉम्बे नर्मिग होम ॲक्‍ट (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) महाराष्ट्र पोलूशन कंट्रोल बोर्ड (एमपीसीबी) तथा फायर सेफ्टी सर्टिफिकेट (फायर एनओसी) असणे आवश्यक आहे.

योजनेत समाविष्ट होण्याकरिता इच्छुक रुग्णालयांनी अधिक माहिती करीता कोविड-19 चे नोडल अधिकारी तथा इन्सिडन्स कमांडर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.बी. राठोड तथा विभागीय व्यवस्थापकजन आरोग्य योजना डॉ.सुमित भगत (मो.8275095808)  यांच्याशी संपर्क साधावा.
00000

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी राखून ठेवलेल्या सोयाबीन बियाण्यांचा वापर पेरणीसाठी करावा : डॉ.उदय पाटील

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी राखून ठेवलेल्या
सोयाबीन बियाण्यांचा वापर पेरणीसाठी करावा:डॉ.उदय पाटील
चंद्रपूर,दि.25 एप्रिल : शेतकऱ्यांनी  स्वतःकडे बियाणे योग्य पद्धतीने साठवणूक करून ठेवल्यानंतर स्व:उत्पादित बियाण्याचा खरीप हंगामात पेरणीसाठी वापर केल्यास खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची उपलब्धता वाढून पेरणीसाठी बियाण्याचा तुटवडा निर्माण होणार नाही. यासाठी शेतकऱ्याने पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.
शेतकऱ्याने व उत्पादित सोयाबीन बियाण्याचा पेरणीसाठी वापर करण्यासाठी पुढील बाबी विचारात घ्याव्यात.
सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असल्याने या पिकाचे बियाणे  सरळ वाणाचे असतात त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता  नाही.मागील 2 वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणिक बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो व शास्त्रीय दृष्ट्या असे बियाणे पेरणीसाठी वापरता येते.
प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित बियाण्याची चाळणी करून चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची निवड करावी. सोयाबीन बियाण्याचे बाह्यवरण नाजूक व पातळ असल्याने त्याची हाताळणी काळजीपूर्वक करावी. साठवणूक केलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या पोत्यांची हाताळणी व वाहतूक काळजीपूर्वक करावी. पोती उंचावरून आदळली जाणार नाहीत याची काळजी  घ्यावी.
प्रत्येक कृषी सहाय्यकाने आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये खरीप हंगामातील सोयाबीन पिकांचे अपेक्षित क्षेत्रात 70 टक्के बियाण्याची गरज त्यात गावातील निवडक शेतकऱ्यांच्या स्वतःच्या उत्पादित बियाण्यातून भागविण्यात येईल असे नियोजन करावे.
ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात प्रमाणित सोयाबीन बियाणे पेरले होते अशा शेतकऱ्यांकडील उपलब्ध बियाण्याची माहिती संकलित करावी. व हे बियाणे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बियाणे म्हणून पेरणीसाठी वापरण्यास प्रवृत्त करावे.
शेतकऱ्यांनी स्वतःकडील राखून ठेवलेल्या सोयाबीन बियाण्याचा पेरणीसाठी वापर करण्यापूर्वी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.
पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमतेची तपासणी/ चाचणी करणे फार गरजेचे असते. त्यावरून चांगल्या उगवणक्षमतेची खात्री पटू शकते. पेरणी करतेवेळी बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे याबद्दल अंदाजही येऊ शकतो. उगं क्षमतेची तपासणी घरच्या घरी करता येते व ही पद्धत अतिशय सोपी आहे.
सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता घरच्या घरी कशी तपासावी याबाबतची माहिती
शेतकऱ्यांनी स्वतः कडे असलेले सोयाबीन बियाण्याची चाळणी करून त्यामधील काडीकचराखडेलहान/ खूरटलेले बियाणे वेगळे करावे. फाळणीनंतर स्वच्छ झालेले एका आकाराची बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी निवडावे. वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याला चार घड्या पाडाव्यात त्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा.
प्रत्येक 10 बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशा रीतीने शंभर बियांच्या दहा गुंडाळ्या तयार कराव्यात नंतर या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत चार दिवस कशा ठेवाव्यात चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बिजाकृत झालेल्या बिया मोजाव्यात. जर ती संख्या 60 असेल तर उगवण क्षमता 60 टक्के आहे असे समजावे. जर ती संख्या 80 असेल तर उगवणक्षमता 80 टक्के आहे असे समजावे.
अशा पद्धतीने घरच्या घरी उगवण क्षमतेचा अंदाज घेता येतो. सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चांगली म्हणजे 70 टक्के पेक्षा जास्त असेल तर शिफारस केलेल्या मात्रेनुसार पेरणीसाठी प्रति हेक्‍टर 75 किलो बियाणे वापरावे.
शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता उपरोक्त पद्धतीने घरच्या घरी तपासून नंतरच अशा बियाण्यांची पेरणी करावी. उगवण क्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास त्याचे त्याप्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.
सोयाबीन उगवणक्षमतेनुसार पेरणीसाठी आवश्यक बियाण्यांची उगवणक्षमता 70 टक्के असल्यास पेरणीसाठी आवश्यक बियाणे 30 किलो प्रती एकरसाठी वापरावे. उगवणक्षमता 69% असल्यास पेरणीसाठी 30.5 किलो/ एकर बियाणे वापरावे. उगवनक्षमता 68 टक्के असल्यास पेरणीसाठी 31 किलो/ एकर बियाणे वापरावे.
उगवण क्षमता 67 टक्के असल्यास पेरणीसाठी 31.5 किलो/ एकर बियाणे वापरावे. उगवण क्षमता 66% असल्यास पेरणीसाठी 32 किलो/ एकर बियाण्यांचा वापर करावा. उगवण क्षमता 65% असल्यास पेरणीसाठी 32.5 किलो/ एकर बियाणे वापरावे. उगवण क्षमता 64% असल्यास पेरणीसाठी 33 किलो/ एकर बियाण्यांचा वापर करावा. उगवण क्षमता 63 टक्के असल्यास पेरणीसाठी 33.5 किलो/ एकर बियाणे वापरावे.
उगवणक्षमता 62%, 61%, व 60 टक्के असल्यास 34 किलो/ एकर,34.5 किलो/ एकर व 35 किलो/ एकर बियाण्यांचा वापर पेरणीसाठी करावा.
रायझोबियम व पीएसबी या जिवाणूसंवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीज प्रक्रिया करून असे बियाणे सावलीत वाळवावे.
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बुरशी रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.
75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.बियाण्याची पेरणी पुरेशी ओलिवर आणि तीन ते चार सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी.पेरणीसाठी प्रति हेक्‍टरी दर 70 किलो भरून 50 ते 55 किलो आणण्यासाठी सोयाबीन बियाणे टोकण पद्धतीने किंवा प्लॅटरच्या सहाय्याने रुंद वरंबा सरी पद्धत( बी. बी. एफ) यंत्राने पेरणी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.
पेरणीपूर्वी सोयाबीन उगवणक्षमता बीज प्रक्रिया इत्यादी प्रात्यक्षिके प्रत्येक गावात आयोजित करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.
00000