Search This Blog

Thursday, 24 June 2021

कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या संरक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 



कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या संरक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Ø 257 बालकांचे एक पालक तर 7 जणांचे दोन्ही पालक दगावले

चंद्रपूर,दि. 24 जून : कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांची काळजी व संरक्षण करण्याकरीता बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर,पोलिस उपअधिक्षक शेखर देशमुख,मनपा सहायक आयुक्त विद्या पाटील, बालकल्याण समिती अध्यक्ष अॅड.वर्षा जामदार, महिला व बालकल्याण अधिकारी रमेश टेटे, जिल्हा परिविक्षा अधिकारी श्री. दडमल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, स्थानिक गुन्हे शाखेच्या अपर्णा मानकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, पालक गमाविलेल्या सर्व बालकांची स्वतंत्र फाईल तयार करा. जेणेकरून परिपूर्ण प्रस्ताव तयार होऊन शासकीय योजनेचा लाभ देतांना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच प्रत्यक्ष भेटीदरम्यान निरीक्षणात आलेल्या बाबी, आर्थिक परिस्थिती, चर्चेतून मिळालेली माहिती फाईलमध्ये नोंदवून ठेवा. स्थावर मालमत्तेसंदर्भात ग्रामीण भागात ग्रामपंचायत तर शहरी भागात संबंधित नगर परिषदेला अधिकृतरित्या कळविणे गरजेचे आहे.  तसेच दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांच्या स्थावर व इतर मालमत्तेसंदर्भात जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

तर अपर जिल्हाधिकारी वरखेडकर म्हणाल्या, ज्या सात बालकांचे दोन्ही पालक कोव्हीडमुळे मृत्यु झाले आहे, त्यांच्या बँकेच्या व्यवहारासंदर्भात सदर बँकांना त्वरीत कळवा. तसेच एक पालक गमाविलेल्या कुटुंबाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया त्वरीत राबवा, अशा सुचना त्यांनी दिल्या.

कोव्हीडमुळे जिल्ह्यातील सात बालकांनी दोन्ही पालक गमाविले असून यात चंद्रपूरचे तीन बालके,चिमूर तीन आणि एक बालक सावली येथील आहे. तर एक पालक गमाविलेल्या बालकांची संख्या 257 आहे. तसेच बालकल्याण समितीसमोर 264 बालकांची यादी पुढील कार्यवाहीकरीता सादर करण्यात आली आहे. यापैकी सद्यस्थितीत संजय गांधी निराधार योजनेसाठी मंजूर प्रकरणाची संख्या 32 असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

00000

गुरुवारी बाधितांपेक्षा बरे होणारे पाच पटीने जास्त

 

गुरुवारी बाधितांपेक्षा बरे होणारे पाच पटीने जास्त

Ø 24 तासात 65 कोरोनामुक्त, 13 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु

चंद्रपूर,दि. 24 जून :  जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या तब्बल पाच पटीने जास्त होती. गत 24 तासात जिल्ह्यात 65 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 13 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.

            आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 13 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 7, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 1, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभिड 0, सिंदेवाही 0, मूल 2, सावली 0,  पोंभूर्णा 1,  गोंडपिपरी 1,  राजूरा 1, चिमूर 0 , वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.  आज मृत झालेल्यांमध्ये सिंदेवाही तालुक्यातील 1 महिला तर वणी-यवतमाळ येथील 1 महिलेचा समावेश आहे.

            जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 605 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 539 झाली आहे. सध्या 542 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 45 हजार 234 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 57 हजार 812 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1524 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Wednesday, 23 June 2021

ओबीसी व्हीजेएनटीच्या न्याय हक्कासाठी लोणावळयात ओबीसींच्या प्रश्नांवर होणार चिंतन शिबीर ....

 


ओबीसी व्हीजेएनटीच्या न्याय हक्कासाठी

  लोणावळयात ओबीसींच्या प्रश्नांवर होणार चिंतन शिबीर ....

मुंबईदि. २३ :  ओबीसींच्या  प्रश्नांवर चिंतन व मंथन  करण्यासाठी शनिवार व रविवार   दिनांक  २६ आणि २७  जून रोजी  ओबीसी चिंतन‍ शिबीर लोणावळयात  आयोजित करण्यात आले आहे.

          नागरी पुरवठा मंत्री  मा. ना. श्री. छगन भुजबळ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे. दोन दिवसीय  चालणाऱ्या या शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेमाजी मंत्री एकनाथ खडसेमाजी मंत्री बबनराव ढाकणेमाजी आमदार नारायण मुंडेमाजी मंत्री पंकजा मुंडेमाजी मंत्री अण्णा डांगेमंत्री दत्त्तात्रय भरणे,  मंत्री सुनिल केदारमाजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेमाजी मंत्री संजय राठोड,  माजी मंत्री माणिकराव ठाकरे,   खा.  बाळू  धानोरकर माजी मंत्री परिणय फुकेआमदार विकास ठाकरेआमदार महेंद्र दळवी,  याव्यतिरिक्त  विविध राजकीय पक्षातील  व वविध  ओबीसी चळवळीतील आजी माजी खासदार व संघटनांचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि कार्यकर्ते या शिबिरात सहभागी होणार आहेत.

ओबीसी आरक्षणातील अनेक समस्याओबीसी व्हीजेएनटीतील जिल्हावार नोकरीतील कमी झालेलं आरक्षणओबीसीची स्वतंत्र जनगणना यासह अनेक विषयावर  शिबिरात मंथन करण्यात येणार असून शिबिरातील तज्ञ्मार्गदर्शकयांच्याकडून संकलित होणाऱ्या  माहीतीवर चिंतन होऊन अभ्यासपूर्वक अजेंडा तयार करून ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र व राज्य शासनास ओबीसींची भूमिका  यावेळी सादर केली जाणार आहे. या बैठकीस राज्यातील तज्ञ्ओबीसी अभ्यासकसंवैधानिक अभ्यासक मार्गदर्शन करणार असून दोन दिवसाच्या सहा सत्रात हे शिबीर संपन्न होणार आहे. 

राज्यातील ६ जिल्ह्यातील रदद झालेले राजकीय आरक्षण व लागलेली निवडणूक स्थगित करण्यात यावी यासह १२ बलुतेदार १८ अलुतेदार यांच्या उत्थानासाठी शासनास प्रस्ताव सादर करून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये विकासनिधी देण्यात यावापदोन्नतीमध्ये ओबीसीना आरक्षण देण्यात यावेतसेच  लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभा व विधानसभेत प्रतिनिधित्व देण्यात यावं या विषयावर लोणावळ्याच्या चिंतन आणि मंथन शिबिरात चर्चा होणार आहे. यावेळी उपस्थित प्रतिनिधींकडून ज्या सूचना येतील त्यांचा समावेश मागणीपात्रात केला जाईल आणि या शिबिरामध्ये झालेला ठराव हा ओबीसींचा अजेंडा असेल.  अशी माहिती ओबीसीव्हीजेएनटी जनमोर्चा अध्यक्ष बाळासाहेब सानपराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी प्रदेशाध्यक्ष  मा. ईश्वर बाळबुधे,  राष्ट्रीय ओबीसी महासंघ महासचिव सचिन राजूरकरओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा राज्य समन्वयक तथा उपाध्यक्ष अरुण खरमाटेश्री. राजू साळुंके महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बेलदार समाज यांनी दिली.

000000


मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरी तालुका क्रीडा संकुलासाठी 21 कोटीच्या निधीस तत्वतः मान्यता


 

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरी तालुका क्रीडा

संकुलासाठी 21 कोटीच्या निधीस तत्वतः मान्यता

क्रीडामंत्री सुनील केदार यांची मान्यता

मुंबईदि२३ : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याकरिता व त्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याकरिता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  वडेट्टीवार यांनी आग्रहाची भूमिका घेतली. त्यांनी केलेल्या मागणीला क्रीडामंत्री सुनील केदार यांनी  २० कोटी १६ लक्ष रुपयाच्या कामास तत्वतः मान्यता दिली असून या कामाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा असे निर्देश क्रीडा आयुक्तांना दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुका क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा  याबाबत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली व मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झालीत्यावेळी ते बोलत होते. क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासह  क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले की,  ब्रम्हपुरी येथे हॉकी या खेळाचे राष्ट्रीयराज्य खेळाडू असून बऱ्याच ठिकाणी स्पर्धा होत असतात. या खेळाचे राज्यराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या कृत्रिम मैदानावर होत असल्याने या भागातील खेळाडूंना अशा मैदानावर खेळण्याचा सराव होण्याच्या व अनुभव मिळण्याच्या दृष्टीने  अशा प्रकारचे मैदान होणे अपेक्षित आहे.   तालुका क्रीडा संकुलब्रम्हपुरी येथे सद्यस्थितीत असलेली जागा अद्यावत क्रीडा सुविधांच्या विस्तारीकरणा करिता अपूरी असल्याने तालुका क्रीडा संकुलाचे विस्तारीकरिता अंतर्गत मौजा बोंडेगांव येथील भुमापन क्रमांक ४०५ मधील ४.८५ हे. आर जागा खेळाचे मैदानाकरीता राखीव ठेवण्यात आलेली आहे. सदरच्या जागेवर अद्यावत क्रीडा सुविधा निर्मीती करणे शक्य होणार असून मौजा बोंडेगांव येथील नव्याने निर्माण करावयाच्या अद्यावत क्रीडा सुविधांचे रु. २०कोटी १६ लक्ष चे अंदाजपत्रक समितीचे वास्तुशिल्पतज्ञ यांनी तयार केलेले असून सदरचे अंदाजपत्रक संबंधित विभागास सादर करण्यात आले आहे.  प्रस्ताव मंजूर करण्यासंदर्भात आज दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली होती.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे अद्ययावत क्रीडा संकुल  बांधण्यासाठी नगरविकास विभागाने प्रस्तावित जागा क्रीडा विभागास तत्काळ हस्तांतरित केल्यास विविध सुविधा उपलब्ध करून देणे सुकर होईल अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.

00000

जिल्ह्यात 24 तासात 28 कोरोनामुक्त

 

जिल्ह्यात 24 तासात 28 कोरोनामुक्त, 18 पॉझिटिव्ह तर 3 मृत्यु

चंद्रपूर,दि. 23  जून :  गत 24 तासात जिल्ह्यात 28 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 18 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.  तसेच 3 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 18 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 7, चंद्रपूर तालुका 2, बल्लारपूर 1, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0 , नागभिड 0, सिंदेवाही 1, मूल 1, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 1, राजूरा 0, चिमूर 1 , वरोरा 2, कोरपना 2, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

आज मृत झालेल्यांमध्ये बल्लारपूर तालुक्यातील 1 पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील 1 पुरुष तर वरोरा तालुक्यातील 1 पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 592  वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 474 झाली आहे. सध्या 596  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 42 हजार 206 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 55 हजार 228 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1522 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000