Search This Blog

Friday, 27 May 2022

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि. 27 : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे 29 मे 2022 रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दि. 29 मे रोजी स. 10.30 वाजता हरंबा (ता. सावली) येथे आगमन व मातोश्री ग्राम समृध्दी शेत पांदन रस्ते योजनेंतर्गत पांदन रस्त्याच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, स. 11.15 वा. सावली येथे राकेश गड्डमवार यांच्याकडे सांत्वनपर भेट, स. 11.45 वा. जिबगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आणि पांदन रस्त्याच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12.45 वा. मोखाळा येथे श्री. नागोसे यांच्याकडे सांत्वनपर भेट, दु.1वा. व्याहाड खुर्द येथे आदिवासी सामाजिक प्रबोधन मेळाव्यास उपस्थिती, दु. 2 वा. व्याहाड खुर्द येथून गडमोशी (ता. सिंदेवाही) कडे प्रयाण. दु. 3 वा. तांबेगडी मेंढा (ता. सिंदेवाही) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, दु. 3.30 वा. गडमोशी येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भुमिपूजन, सायंकाळी 4 वा. कच्चेपार येथे पांदन रस्त्याचे भुमिपूजन व कॅनाल क्रॉसिंग पुलाचे लोकार्पण, सायं 4.30 वा. सिंदेवाही तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी, सायं 5 वा. किन्ही येथे पांदन रस्त्याचे भुमिपूजन, सायं. 5.30 वा. मुरमाडी येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भुमिपूजन, सायं. 6.15 वा. मोहाडी येथे 33 केव्ही सबस्टेशनची पाहणी, सायं. 6.30 वा. मोहाडी येथे पांदन रस्त्याचे भुमिपूजन, सायं. 6.45 वा. वाघमारे यांच्याकडे सांत्वनपर भेट, सायं. 7 वाजता कोराडी (नागपूर) कडे प्रयाण. *******

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 31 मे रोजी पंतप्रधानांचा लाभार्थ्यांशी संवाद

 



स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 31 मे रोजी पंतप्रधानांचा लाभार्थ्यांशी संवाद

Ø प्रियदर्शनी सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 27 : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र शासनाच्या वतीने देशभरात विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. देशातील कोणताही नागरिक विकासापासून वंचित राहू नये व त्याच्या विविध गरजा सर्वसमावेशक आणि एकत्रितपणे पूर्ण होण्यासाठी शासनाने लाभार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. याच अनुषंगाने 31 मे 2022 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिमाचल प्रदेशातील शिमला येथून आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील प्रियदर्शनी सभागृहात करण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या शिमला येथील कार्यक्रमाशी जिल्ह्याला जोडले जाणार असून पंतप्रधानांचा परिसंवाद कार्यक्रम दोन भागांमध्ये आयोजित केला जाईल. संवादाचा पहिला भाग जिल्हा कार्यक्रमाच्या स्वरुपात सकाळी 10.15 वाजता सुरू होऊन सकाळी 10.50 वाजता समारोप होईल. या प्रसंगी पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता देखील लाभार्थ्यांना हस्तांतरीत केला जाईल. संवादाच्या दुस-या भागात निवड केलेल्या जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांशी पंतप्रधान व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आभासी संवाद साधतील.

या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण व शहरी), जलजीवन मिशन आणि अमृत योजना, प्रधानमंत्री स्व निधी योजना, एक राष्ट्र एक राशनकार्ड योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्यमान भारत पीएम जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटर आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा समावेश आहे.

००००००

Thursday, 26 May 2022

आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे - डॉ. दिप्ती सुर्यवंशी

 

आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणानी सज्ज राहावे - डॉ. दिप्ती सुर्यवंशी

चंद्रपूर, दि. 26 : मान्सून पूर्व तयारीचा आराखडा तयार करणे व आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनेसंदर्भात बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व यत्रंणेचा आढावा घेण्यात आला.

पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी आवश्यक उपायोजना कराव्यात व त्याची तात्काळ अमलबजावणी करावी, असे निर्देश डॉ. सुर्यवंशी यांनी दिले. यात सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची डागडुजीआरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा व तर सामग्रीनगर परिषदने नालेसफाईब्लिचिंग पाडरमहाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्तीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी स्वच्छ पाणीपुरवठापुरवठा विभागाने दरवर्षी पूर येणा-या गावांना दोन महिन्यांचे आगाऊ धान्य वाटप करण्याच्या सूचना तहसीलदार संजय राईंचवार यांनी दिल्या.

यावेळी प्रभारी ठाणेदार श्री. मुलानीविस्तार अधिकारी अनिरुद्ध वाळके, नायब तहसीलदार सतीश साळवे, वनपरिक्षेत्राधिकारी संतोष थिपे यांच्यासह तालुक्यातील  बिल्ट, बामणी प्रोटिन्सचे प्रमुखवेकोलीचे प्रतिनिधी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००००००

पावसाळ्यापूर्वी चिचडोह बँरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार

 

पावसाळ्यापूर्वी चिचडोह बँरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार

Ø नागरिक व गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन

                  चंद्रपूर, दि. 26 मे : यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2022 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून नदीलगतच्या सर्व गावांना व ग्रामपंचायतींनी सतर्क राहावे. नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्कता बाळगावी. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरु नदीवर आंघोळ करतांना, मासेमारी करणारे, नदी घाटातून रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणारे, बॅरेज परिसरातील गावकऱ्यांनी व नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सतर्क रहावे, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आलेले आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी असलेला चिचडोह बॅरेज प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीवर उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आहे. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचाच नव्हे तर शेतीच्या सिंचनाचाही प्रश्‍न सुटला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर, चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम पूर्ण झाले असून सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरचे बाजूस 4 किलोमीटर वर आहे. बॅरेजची एकूण लांबी 691 मीटर असून 15 मीटर लांब × 9 मीटर उंचीचे 38 लोखंडी दरवाजे बसविण्यात आलेले आहे. दि. 15 ऑक्टोबर 2021 पासून संपूर्ण दरवाजे बंद करण्यात आले होते.

००००००

बियाणे /खतांच्या गुणवत्ता नियत्रंणासाठी व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन

 

बियाणे /खतांच्या गुणवत्ता नियत्रंणासाठी व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन

Ø सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असणार कार्यरत

चंद्रपूर, दि. 26 मे : जिल्ह्यात 2022-23 चा खरीप हंगाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कीटकनाशके मिळणे व त्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बियाणे, खते व इतर बाबींचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी थेट नियंत्रण कक्षात तक्रार द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. नियंत्रण कक्ष सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यरत असणार आहे.

बियाणे खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर अडचणी येतात. या अडचणींचा विचार करून अशा अडचणी ऑन कॉल व प्रत्यक्षरीत्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) काम करणार आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे व कीटकनाशकांच्या येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींबाबत शेतकऱ्यांना यामधून तक्रार करता येणार आहे.

शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची गुणवत्ता व इतर बाबी संदर्भात काही तक्रार/अडचण असल्यास नियंत्रण कक्षातील मोबाईल क्रमांक 8788574490 यावर सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संपर्क करून आपले अडचणीचे समाधान करून घेता येणार आहे. तसेच आपली तक्रार देखील नोंदविता येणार आहे. जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष कृषी विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे कार्यरत असणार आहे.

जे शेतकरी आर.आर.बीटी बियाण्याला बळी पडतात व त्यांच्याकडे बियाणाचे पक्के बिल नसल्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागते त्यामुळे आर.आर.बीटीच्या संदर्भातील तक्रारीसुद्धा नियंत्रण कक्षात मांडता येणार आहे.

 

 

 

तरी, शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी व तक्रारी संदर्भात नियंत्रण कक्षाशी संपर्क करून आपली तक्रार नोंदवावी व असलेल्या अडचणीचे निराकरण करून घ्यावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे तसेच जिल्हा परीषदेचे कृषि विकास अधिकारी श्री. दोडके यांनी केले आहे.

00000