Search This Blog

Monday, 7 September 2026

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष 9 सप्टेंबर रोजी चंद्रपुरात

 राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष 9 सप्टेंबर रोजी चंद्रपुरात

चंद्रपूर, दि. 07 : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर हे 9 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

9 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सफाई कर्मचा-यांच्या अडीअडचणी निवारणाकरीता आयोजित बैठकीस उपस्थिती, दुपारी 2 वाजता राखीव, दुपारी 3 वाजता चंद्रपूर महानगर पालिका येथे आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी 4.30 वाजता महानगर पालिका येथे पत्रकार परिषदेला उपस्थिती, सायंकाळी 5 वाजता सफाई कर्मचा-यांच्या वस्त्यांना भेट, सोयीनुसार गडचिरोलीकडे प्रयाण.

०००००००

No comments:

Post a Comment