Search This Blog

Wednesday, 2 September 2026

चंद्रपूर जिल्ह्यातील 16 ताडी दुकानांचा 18 सप्टेंबरला ई-लिलाव

 चंद्रपूर जिल्ह्यातील 16 ताडी दुकानांचा 18 सप्टेंबरला ई-लिलाव

Ø ई-लिलाव-नि-निविदा पद्धतीने ताडी अनुज्ञप्ती मंजूर होणार

चंद्रपूर, दि. 2 : चंद्रपूर जिल्ह्यातील 16 ताडी दुकानांच्या ताडी वर्ष 2026-27 करिता अनुज्ञप्ती मंजूर करण्यासाठी जाहीर ई-लिलाव-नि-निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबत निविदा शासनाच्या अधिकृत महाटेंडर्स संकेतस्थळावर दि. 1 सप्टेंबर 2026 पासून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांच्या कार्यालयांतर्गत असलेल्या या 16 ताडी दुकानांचा जाहीर लिलाव ऑनलाईन ई-लिलाव-नि-निविदा पद्धतीने दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात येणार आहे.

ई-लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक अटी व शर्ती, प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती शासनाच्या महाटेंडर्स (www.mahatenders.gov.in) या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत याबाबतची अधिक माहिती प्राप्त करता येईल.

जिल्ह्यातील संबंधित ताडी दुकानांच्या ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी याची नोंद घेऊन विहित प्रक्रियेनुसार ऑनलाईन सहभाग नोंदवावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment