Search This Blog

Thursday, 24 September 2026

रब्बी हंगामात बियाणांकरीता महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन


 रब्बी हंगामात बियाणांकरीता महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.24 : जिल्हयातील शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि कडधान्य, तेलबिया, पौष्टिक तृणधान्य व भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी रब्बी हंगामात हरभरा, मसूर, करडई, ज्वारी व मका पीक प्रात्यक्षिक तसेच प्रमाणित बियाणे वितरण घटक 100% अनुदानावर राबविण्यात येत आहे.

पात्रता : नोंदणीकृत शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी / कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था (आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जिवनोन्नती  अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इत्यादी.

प्रमाणित बियाणे वितरण अनुदानाचे स्वरूप : 1)  हरभरा : 5 वर्षाआतील वाणाकरीता 75 टक्के अनुदान, 5 वर्षावरील परंतु 10 वर्षाआतील वाणाकरीता 50 टक्के अनुदान,2) मसूर : 5 वर्षाआतील नवीन वाणाकरीता बियाणे किमतीच्या 100 टक्के अनुदान, 5 वर्षावरील परंतु 10 वर्षाआतील वाणाकरीता बियाणे किमतीच्या 50 टक्के अनुदान, 3) करडई 100 टक्के अनुदानावर उपलब्ध, 4) मका 10 वर्षाआतील वाणाकरीता 50 टक्के अनुदान 5) ज्वारी 10 वर्षाआतील वाणाकरीता 33 टक्के अनुदान, व 10 वर्षावरील 17 टक्के अनुदान.

वरील सर्व बियाणे बाबीचा लाभ घेण्याकरीता शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर यांचे मार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या क्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा मंडळ कृषी अधिकारी /सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

०००००००

No comments:

Post a Comment